फोटो - मुस्तांग
इफ्फी चित्रपट महोत्स्वाच्या चवथ्या दिवशी तुर्कीस्तानचा मुस्तांग या चित्रपटात मुस्लिम देशातील नवतरुण-तरुणींची मानसिकता बदलत असल्याच्या कथनकासभोवती फिरणारी गोष्ट आहे. फ़क्त आयुष्य जगायचे या विचाराच्या पाच बहिणींची ही कहाणी आहे. घरात मोठ्यांच्या सांगण्यापोटी दोन बहिणींची लग्ने झाल्यावर धाकटी लैला वैतागते, या सगळ्या बहिणींची घुसमटतीला प्रकर्षाने जाणवते, तीच्या तिसऱ्या बहिणीने आत्महत्या केल्यावर लैलाची अधिकच तड़फड़ होवू लागते, शिक्षण आणि आयुष्य सरलमार्गी जगायची इच्छा असलेली लैला तुरुंगयुक्त घरातून पळून इस्तनाबुलमधे आपल्या शिक्षिकेचे घर गाठते हे पहायला मिळते, देनीज़ ग़म्ज़े एरगुवेन दिग्दर्शित या चित्रपटाद्वारे, समस्त मुस्लिम देशातील स्त्रियांची घुसमट दाखवण्याचा उत्तम प्रयत्न केला आहे. घरात बसून इंटरनेटवर जग पाहणाऱ्यांची संख्या कमी नाही, मात्र त्यामधून आपले स्वप्न जगण्याची प्रेरणा फार कमी जण घेतात हा सन्देश द्यालय देखील दिग्दर्शक विसरत नाही.द फेंसर या एस्टोनियाच्या चित्रपटात रशियातील तलवारबाज़ खेलाडू ची कहानी पहायला मिलते.काही ईरानी दिग्दार्शकानी लहान मुलाना घेवुन केलेल्या चित्रपटामुले ईरानीे सिनेमा जागतीक सिनेमाच्या प्रकाश झोतात आला खरा, पण तो अणि तसा दर्जा फार कमी लोकाना राखता येणे जमते. असेच काहीसे अली घवितन दिग्दर्शित माय मदरस ब्लू स्काई या चित्रपटाबाबत घडताना दिसते.
No comments:
Post a Comment