प्रेम रतन धन पायोचे
दिवाळी सॅलीब्रेशन
- हर्षदा वेदपाठक
चित्रपटसृष्टीतील अनेक
कलाकारांचे मोठे चित्रपट हे सणाचे निमीत्त साधुन प्रदर्शित होतात. दिवाळीच्या या
आठवडयात प्रदर्शित होणारा प्रेम रतन धन पायो हा असाच एक चित्रपट आहे. राजा और रंक
या चित्रपटावर आधारीत असलेल्या या चित्रपटात सलमान खान, सोनम कपुर आणि निल नितीन
मुकेश यांच्या प्रमुख भुमिका आहेत. दिवाळी दरम्यान प्रद्रशित होणारया या
चित्रपटाबद्दल मेहबुब स्टुडीयोत ऐका औपचारीक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.
राजश्री फिल्म हे चित्रपटसृष्टीत एक परिवार म्हणुन ओळखले जातात, त्यामुळे
त्यांच्याबरोबर या चित्रपटात काम करणे हा अविस्मरणीय अनुभव मानायला हरकत नाही हे
सोनम कपुरनं सांगीतलं. तर चित्रपट प्रदर्शित व्हायला अवघे तिन दिवस राहीले आहेत
आणि या चित्रपटाद्वारे प्रेक्षकांचे जिवन बदलु शकेल असा विश्वास दिग्दशक सुरज
बडजात्या व्यक्त करतात. तर सोळा वर्षानंतर पुन्हा प्रेम रंगवताना समाधान वाटल्याची
बाब सलमान खान व्यक्त करतो. बालपणी हम आपके है कौन या चित्रपटासाठी पाचशे रुपयाचे
तिकीट घेताना घरी आईची बोलणी ऐकावी लागल्याची आठवण सांगताना, त्याच सलमान खानबरोबर
काम करत आहे है ऐकुन आईनं समाधान व्यक्त केल्याची माहीती निल नितीन मुकेश देतो.
सलमान खान हा मित्र आहे त्याला मी कोणत्याच बाबतीत नकार देत नसल्यानं प्रेम रतन धन
पायो हा चित्रपट स्विकारल्याची बाब अरमान कोहली व्यक्त करतो. एकंदरीत, या दिवाळीत
सगळ्या कुटुंबियांसमवेत पाहण्यासाठी असा हा उत्तम चित्रपट असुन त्याबद्दल
चित्रपटाची सगळी टिमच आशावादी असल्याचे दिसुन येत आहे. या चित्रपटाबरोबर दुसरा कोणताही
मोठा चित्रपट प्रदशित होत नसल्याचा फायदा चित्रपटाला मिळेल यात वाद नाही.
No comments:
Post a Comment