सेहेचालिसाव्या इफ्फिचे उद्घाटन
आज एका दिमाखदार सोहळ्यात सेहेचालिसाव्या इफ्फिचे उद्घाटन पार पडले. गोवा येथे आयोजित या चित्रपट महोस्तवात नव्व्द देशाचे २८९ चित्रपट पहायला मिळतील, अकरा दिवस चालणाऱ्या या महोस्तवात, संगीतकार इलायाराजा याना विशेष पुरस्काराने अभिनेता अनिल कपूर यांच्या हस्ते सम्मानित करण्यात आले. परीक्षक मंडळाचे अध्यक्ष दिग्दर्शक शेखर कपूर यानी इतर जूरी सदस्यांची भेट करवून दिली, एक हजार चित्रपटांसाठी पाच हजार गाण्यांचे दिग्दर्शन करणाऱ्या इलायाराजा यानी सत्कार भाषणात, समाजातील हिंसाचार मीटवायचा असेल तर प्रत्येक शाळा, कॉलेज मध्ये संगीत हा विषय शिकवला गेला पाहिजे हे नमूद केले, तर प्रमुख पाहुणे अनिल कपूर यानी हिंदी चित्रपटात काम मिळत नसल्याने तेलगु आणि कन्नड़ चित्रपटात काम करायला सुरवात केल्याचे सांगितले, आणि त्यांचा तो चित्रपट हा इलायाराजा यांच्या संगीतामुळे चालल्याची आठवन त्यानी या वेळी सांगितली,
No comments:
Post a Comment