प्रत्येक प्रेमकहाणीला स्वताचे नशीब असते - दिपिका पदुकोने
- हर्षदा वेदपाठक
संजय भन्साली दिग्दर्शित बाजीराव मस्तानी या चित्रपटात दिपीका पडुकोण मस्तानी
या र्शिर्षक भुमिकेत दिसणार आहे. भुमिकेसाठी तिनं फार मेहनत केल्याची ती सांगते.
नुकतेच तिनं मस्तानीचे तिस फुट उंचीचे पोस्टर लॉन्च केले त्या दरम्यान तिच्याबरोबर
केलेली बातचित.....
मस्तानीबद्दल काय सांगशिल?
- ती प्रेमीका आहे, आई आहे आणि नवरयाबरोबर युद्ध भुमीवर जाणारी योद्धा आहे अश्या
या स्वरुपात ती बाजीराव मस्तानी या चित्रपटात पहायला मिळेल.
हा चित्रपट ऐतिहासिक आहे, त्यामुळे नुकत्याच प्रदर्शित झालेल्या बाहुबली या
चित्रपटाबरोबर त्याची तुलना होईल असे तुला वाटते काय?
- मला असं वाटतं की दोन्ही चित्रपट हे वेगळे आहेत. फक्त दोन्ही चित्रपट हे मोठे
आहेत. त्यामुळे त्यांची तुलना करणं चुकीचे ठरेल.
तु, मस्तानी बरोबर किती साम्यता मानतेस?
- प्रत्येक स्त्रीमध्ये आत्मसम्मान असतो. बहुतेक स्रीयां या मल्टीटास्कर असतात यास
माझा देखिल अपवाद नाही. मला वाटतं त्या काळात आणि आताच्या काळात स्त्रीयांमध्ये
फारसा काही फरक आलेला नाही.
मस्तीनी हि ऐक सशक्त व्यक्तीरेखा आहे, त्या भुमिकेची तयारी कश्याप्रकारे
केलीस?
- या चित्रपटाचे चित्रीकरण हे साधारण शंभर दिवसाचे होते. माझा प्रत्येक चित्रपट
हा माझ्या हृदयाच्या जवळचा वाटतो हे मी प्रत्येक मुलाखतीमध्ये सांगत आली आहे.
मात्र मस्तानी करताना मला भावनिक, शारीरीकरीत्या दमायला झाले हे मी कबुल करते.
त्यात शारीरीक प्रशिक्षण, मस्तानीच्या जिवनातील भावनिक चढ उतार याचा परिणाम असावा
असे मला वाटते.
हि भुमिका करण्यापुर्वी तु म्हणे रणवीर सिंग प्रमाणे एकांतवासात गेली होतीस
अशी चर्चा होती ती कितपत खरी आहे?
- ऐखादी भुमिका करण्यापुर्वी कलाकारानं त्या भुमिकेची तयारी कश्याप्रकारे करावी
हे तो स्वताच ठरवतो. त्यामुळे या भुमिकेची तयारी करताना मी एकांतवासात जाण्याचे
ठरवले. परंतु त्याखेरजी मला अधिक काही सांगता येणार नाही.
बाजीराव मस्तानी हि एक ऐतिहासिक प्रेमकहाणी मानली जाते, त्या दिशेनं तुझ्या लक्षात
राहीलेल्या इतर जोडया कोणत्या?
- प्रत्येक प्रेमकहाणीला स्वताचे नशिब असते असे मला वाटते. तसेच प्रत्येक कथेला
स्वताचा एक आत्मा असतो म्हणुन त्याची तुलना दुसरया कथेबरोबर होऊ शकत नाही. प्रेमात
स्त्री आणि पुरुष या दोघांनाही त्याग करावा लागतो त्यामुळे प्रेमात वरचढ कोण
याचाही विचार होऊ शकत नाही.
बाजीराव मस्तानी आणि दिलवाले हे दोन चित्रपट ऐकाच दिवशी प्रदर्शित होत आहेत.
शाहरुखने तुला आपला लकी चार्म म्हटले आहे. मग या दोन चित्रपटाबद्दल काय सांगशिल?
- शाहरुख खान हे दयाळु आणि दिलदार आहे. आम्ही चेन्नई ऐक्सप्रेस आणि हॅप्पी न्यु इ्अर
या चित्रपटात ऐकत्रित काम केले आहे. आपल्या सहकलाकाराला ते फार आपुलकीने वागवतात.
बॉक्स ऑफीसवर हे दोन्ही चित्रपट चालावेत असं मला वाटतं.
रणबीर कपुर आणि रणवीर सिंग बरोबर तुम्ही केमीस्टी नेहमीच चांगली राहीली आहे.
पैकी कोणाबरोबर काम करताना तुला सहजता वाटते?
- त्या दोघांबरोबरील केमीस्ट्री ही त्या प्रत्येक चित्रपटाच्या कथेवर अवलंबुन
असते, प्रेक्षकांना आम्हाला विवीधढंगी भुमिकेत बघायला आवडते हे आम्ही जाणतो. त्यायोग्य भुमिका आल्यात तर आम्ही स्विकारतोच.
बाजीराव मस्तानी मधिल ऐखादे दृष्य जे करताना तुला फार मेहनत करावी लागली असेल
त्याबद्दल काही सांगशिल काय?
- मी भरतनाटयम शिकली आहे. पण या चित्रपटात जेव्हा बिरजु महाराज मला कथ्थक शैलीतले मोहे रंगो लाल...हे नृत्य शिकवु
लागलेत तेव्हा मला ते फार कठीण गेले. त्याखेरीज, तलवार चालवणे, घोडेस्वारी याची तयारी
मी केली होती.
No comments:
Post a Comment