दिवाळीमधिल बॉक्स ऑफीस धमाका
कटयार काळजात घुसली हा चित्रपट नाटकावर आधारीत आहे. सुबोध
भावे दिग्दशित या चित्रपटात शास्रीय संगीतावर आधारीत कथानक पहायला मिळते. आधुनिक
काळात संगीतावर अधारीत कथानकाला तरुण प्रेक्षक मिळणे कठीण असेल परंतु शास्रीय
संगीताची आवड असलेल्यांना हा चित्रपट नक्कीच आवडेल. सचिन पिळगावकर, शंकर महादेवन
आणि सुबोध भावे यांची अदाकारी चित्रपटाची जमा बाजु ठरलीय.
प्रेम रतन धन पायो या चित्रपटात सलमान खान याला प्रेम
म्हणुन पाहता येणार आहे. राज और रंग या चित्रपटावर आधारीत या चित्रपटात राजघराण्यातील
वैर आणि प्रेम पाहता यावर आधारीत कथानक पहायला मिळते. दिग्दशक राजकुमार ब़डजात्या
यांनी लिहीलेली चित्रपटाची संहीत बरयापैकी कमकुमवत दिसुन येते. तसेच अनेक दृष्ये
हि धीमी आणि प्रेडीक्टेबल झाली आहेत. कलाकारात सलमान खान हा कलाकारच चित्रपटभर
लक्षात राहतो. सोनम आणि सलमानची जोडी बरयाच प्रमाणात विजोड वाटते ते सोनमच्या
अभिनयक्षमतेच्या कमतरतेमुळे. गाण्यांमध्ये शिर्षक गीत वगळता गाणी लक्षात राहत
नाहीत.
एकंदरीत, सर्व स्तरातील प्रेक्षकासाठी विवीध विषयांचे
चित्रपट या दिवाळीत प्रदशित झाले आहे. एक गोष्ट मात्र नक्की, हि दिवाळी मराठी
चित्रपटांना नक्कीच धमाकेदार जाणार आहे यात वाद नाही
No comments:
Post a Comment