शाहरुखची पन्नाशी
-हर्षदा वेदपाठक
वाईन जितकी जुनी होते तितकी ती
मुरत जाते असं म्हणतात, तसच काहीसं पन्नाशीमध्ये शाहरुखचं होत चाललय. तो अभिनेता,
बिजनेसमॅन आणि ऐक व्यक्ती म्हणुन समृध्द होताना दिसुन येतोय. त्याच्या वाढदिवस
निमित्तानं त्याच्याबरोबर केलेली चर्चा
पन्नासाव्या वर्षी काय
रेझॉल्युशन ठरवलं आहे...
या वर्षी मी वयाच्या
पंच्याहत्तरीपर्यंत प्रत्येक प्रश्नावर हसत
मात करायची असं ठरवलं आहे. मला वाटतं वयाची पन्नाशी गाठणं यानं आयुष्यात काही फरक
पडतो असं नव्हे. कारण मी वयाची नंबरी किंवा बॉक्स ऑफीस नंबरीवर विश्वास ठेवत नाही.
वाढतं वय या गोष्टीची तुला कधी
भिती वाटते काय....
पंचवीस वर्षाच्या कारकीर्दीनंतरही
मी आयुष्याबद्दल काही प्रमाणात समाधानी आहे. त्यात आलेले चांगले वाईट प्रसंग, चढ
ऊतार हेच तर आयुष्य आहे असं मी मानतो.
तुम्ही कलाकार आणि स्ट्रार
आहात, या दोन स्टेटसपैकी तुम्हाला कश्यात समाधान लाभते...
आजपर्यत मी अनेक चित्रपटांत काम
केले आहे, मात्र मी ऐका चित्रपटाची तुलना दुसरया चित्रपटाबरोबर कधीच केलेली नाही.
परंतु तुम्ही फॅन या चित्रपटाचं म्हणाल तर तो चित्रपट माझ्यासाठी खास आहे. माझ्या
जमा चित्रपटपुंजीपैकी तो ऐक चित्रपट आहे.
वयाच्या या टप्यात तुमच्यासाठी
आयुष्याचा कोणता कालावधी महत्वाचा वाटतो तुम्हाला...
माझे आईबाबा वारले, ते निघुन
गेलेत माझ्या आयुष्यातुन. मात्र ते गेल्यावर माझ्या आयुष्यात आलेल्या माझ्या तिन
मुलांनी माझ्या आयुष्याची कसर भरुन काढली. या दोन टप्यांखेरीज, मला वाटते मी आताच
कोठे कामाला सुरवात केली आहे, अजुन बरच काही गाठायचे आहे.
आता तुम्ही म्हणे वर्षागणिक
तिनच चित्रपट करणार आहात अशी चर्चा आहे, ती कितपत खरी आहे...
मीच तसं सांगत आलो आहे. कारण
मला बराचसा वेळ माझ्या मुलांबरोबर घालवायची इच्छा होते. दुसरी गोष्ट म्हणजे,
वयाच्या पन्नाशीनंतर जे काम मला आवडंत, ज्यामध्ये माझं मन रुळतं तेच काम मी करायला
पाहिजे असं मला वाटतं. आणि मी त्या पध्दतीनं मिळणारं काम ऐन्जॉय करत आहे.
तम्हाला जर बालपणीच्या काळात
परत जाता आलं तर कोणत्या कालावधीमध्ये आणि जागेत तुम्ही स्थिरावाल...
माझं सगळं बालपण दिल्लीत गेलं
आहे त्यामुळे ती जागा अजुनही माझ्या मनावर रुंजी घालत आहे. पुराना किला या परिसरात
माझे वडील कॅन्टीन चालवत होतेत. तेथे अभिनय गुरु
अल काजी अभिनय प्रशिक्षण शाळा चालवायचे, ती पाहता मला अभिनेता व्हायची
आसक्ती लागली. डी.डी.ऐ. क़ॉलनी जवळ माझे घर होते. काही वर्षापुर्वी मी माझ्या
मुलांना मध्यरात्री तेथे नेलं आहे.
तुम्ही चित्रपटाता बदलता काळ
जवळुन पाहिला आहे...
बदलत्या काळासमवेत बदलणे फार
गरजेचे असते, आता चित्रपटाची भाषा फारच बदललेली दिसुन येतेय. त्यामुळे आता मी
जेव्हा चित्रपट निवडतो ते नविन लोकांबरोबर कारण ते नविन तंत्राचा वापर करीत आहेत.
सोबत माझे विचार देखिल त्यांच्याबरोबर जुळणे गरजेचे आहे. जे दिग्दर्शक मला ऐक
कलाकार म्हणुन नविन काही करवुन घेण्याची सक्ती करतात त्यांच्याबरोबर मला काम
करायला आवडते. आणि मला माझे जुने चित्रपट रिक्रीयेट करण्यापेक्षा नविन काही तरी
करायला आवडेल.
तुम्ही सोशल मिडीयाबर खुप
सक्रीय आहात, तुमच्या फॅन क्लबला काय सल्ला दयाल..
सोशल मिडीयावर शिव्या देण्याचे
प्रकार करु नयेत. शिव्या दयायच्या असतील तर तोंडावर दया. तर काही लोकं माझ्या
कुटुंबियांबद्दल सोशल मिडीयावर गरळ ओकत असतात. ते त्यांनी थाबवावे, या सगळ्या फॅन
लोकांना मी माझे मित्र मानतो हे त्यांनी विसरु नये.
पुरस्कार परत करण्याची, कल्चरल
इनटॉलरन्सबददल एक लाट ऊसळु लागली आहे त्याबदद्ल काय सांगाल...
या सगळ्या मुद्यावर मी गप्प
बसणं पसंद करतो. नाहीतर वादंग माजण्याची शक्यताच अधिकच असते. मला असं वाटतं की,
सांस्ककृतिकतेला कोणत्याही वादात आणु नये. कारण कलेला जातपात कधीच नसते. तसेच कला
हि कलाकारापेक्षा फार मोठी असते. दुरावा किंवा काही वादंग असेल तर तो कलेच्या
माध्यमातुन मिटवता येतो. आपण कलेच्या माध्यमातुन पुढे जाण्याऐवजी मागे जात आहोत
असे मला वाटते.
मला जर का पुरस्कार परत दयायचे
नसतील तर ते कोणीच माझ्याकडुन हिसकावुन घेणार नाही असं मला वाटते. पुरस्कार परत
करण्याऐवजी जर ऐखादया मुद्यावर आपला स्टॅन्ड घेणं केव्हाही चांगल असं मी मानतो.
(हसुन) पहलं मला अवॉर्ड द्या नंतर मी ते परत करतो. मात्र प्रेक्षकांचे प्रेम हा एक
असा अवॉड आहे जो कोणीच परत घेऊ शकत नाही.
दिलवाले या चित्रपटाबरोबर
बाजीराव मस्तानी हा चित्रपटदेकिल प्रदर्शित होत आहे, त्याबद्दल काय सांगाल...
मी त्यांच्या चित्रपटाला
शुभेच्छा देतो. चित्रपट तयार करायला फार मेहनत लागते हे मी जाणतो. दोन्ही चित्रपट
जर एकाच दिवशी प्रदर्शित होत असल्यानं मी माझ्या टिमला त्यांच्या विरोधात कोणतीच
चुकीची गोष्ट न बोलण्याची तंबी दिली आहे.
सरोगसी या विषयावर नविन कायदा
येण्याची चर्चा सुरु आहे, तुम्ही त्याबद्दल काय सांगाल...
मला त्या कायदयाबद्दल काहीच
ठावुक नाही. सरकार जर त्या विषयाला रेग्युलर करु इच्छीत असेल तर ती चांगलीच गोष्ट
आहे. आमच्याकडे आर्यन यायच्या आधि मी त्या विषयावर बराच रिर्सच केला होता. सरोगसी
हा विषय, ज्यांना मुलं नाहीत त्यांच्यासाठी हा नक्कीच जिव्हाळ्याचा आहे,
ज्याद्वारे त्या पालकांना मुलांच सुख मिळु शकेल.
पडदयावर प्रत्येक चित्रपटात
तुम्ही रोमॅन्टीक दिसता, त्यामुळे की काय तुमची फिमेल फॅन फॉलोईग अधिक आहे, काय सिक्रेट
आहे त्याचे...
मी कोणत्याही वयोगटाच्या
स्रीयांना नेहमीच मानसन्मान, आदर देऊन भेटतो. मला वाटतं त्यामुळे मी त्यांना पसंद
असेन. मला वाटतं कोणत्याही मुलीला प्रेमात पाडायचे असेल तर तिला तिच्या माणसाकडुन
डिग्नीटी दिली गेली पाहिजे. यालाच रोमान्स आणि प्रेम म्हणतात.
अनेक कलाकार हे विदेशी
चित्रपटात काम करत आहेत, तुम्ही त्या दिशेने काही विचार केला आहे काय...
खरं तर मला कोणी तशी ऑफरच
दिलेली नाही. मात्र आपण आपले चित्रपट हे विदेशी प्रेक्षकांना नजरेसमोर ठेवुन
करावेत या विचारांचा मी आहे. तसेच मला ज्या प्रकारची भुमिका करायला आवडेल तशी
भुमिका समोर आली तर नक्कीच करेन.
तुमचा प्रेक्षकवर्ग हा सगळ्या
वयोगटात पसरला आहे. तुमच्या अभिनयाची कॉपी करणारेही अनेक जण आहेत. या सगळ्यांना
समोर ठेवुन अभिनय प्रशिक्षण संस्था काढायचा विचार आहे काय...
माझ्या अनेक स्वप्नांपैकी ते
माझं एक स्वप्न आहे. आपल्याकडे व्यावसायिक अभिनय संस्था नाहीत ती कमी भरुन
काढण्यासाठी मी तशी संस्था काढण्यासाठी मी प्रयत्न करेन. तसेच विदेशी अभिनय पध्दती
आणि स्क्रीप्ट या दोन बाबतित आपण सशक्त नाहीत ती बाजु मजबुत करण्याचा माझा प्रयत्न
राहील. भारतीय सिनेमाला चांगले दिवस आणायचे असतील तर आपल्याला या दोन उणीवा भरुन
काढाव्या लागतील.
वेगवगळ्याक्षेत्रात तुम्ही
यशस्वी आहात त्या बाबत तुम्हाला कधी प्रेशर येतं काय...
कोळश्याचा जर हिरा व्हायला हवा असेल
तर प्रेशर हे आवशकच आहे असं मला वाटतं. आणि ते तुम्हाला समजायचे असेल तर तमचे
शिक्षण हवे. कठोर मेहनत करावी लागली तरी तुम्ही हिम्मत गमावुन बसु नका हे मी
अनुभवाने सांगेन.
तुमच्या मुलांनी याचक्षेत्रात
यायचे ठरवले आहे काय...
माझ्या आईवडीलांनी, मी काय
करावे यावर स्वताचे विचार कधीच थोपले नाहीत. त्यामुळे मी माझ्या मुलांवरही ते
विचार थोपणार नाही. मला वाटतं याक्षेत्रात उत्तराधिकारी नेमण्याची गरज नाही.
फॅन या चित्रपटाबद्दल बोलता,
तुम्ही कोणाचे फॅन आहात...
(हसुन) मी कोणाचाही फॅन
होण्याआधि स्टार झालो.... मात्र आरयन खन्ना आणि गौरव यांच्यात तिच तफावत पहायला
मिळेल. माझ्या चित्रपटातील काही दृष्ये आम्ही त्या चित्रपटात रिक्रेट केली आहेत.
ऐक अभिनेता म्हणुन माझ्याबद्दल दिग्दशक म्हणुन मनिष शर्मा याला काय वाटते ते तो
माझ्याकडुन फॅनसाठी करवुन घेतोय.
आत्मचरित्र लिहीण्याचा काही
विचार आहे काय...
माझ्या आयुष्यात अनेक व्यक्ती
आल्यात ज्यांच्यामुळे मी घडलो हे खरं आहे. मात्र ज्या दिवशी मला काम मिळणार नाही
त्या दिवशी मी ते लिहायला घेईन.
मिडीयाबरोबर दरवर्षी घरी
वाढदिवस साजरा करणारया शाहरुखने, ताज ऐन्डमध्ये पत्रकार परिषद आयोजित केली होती.
त्यामागे, या पत्रकार परिषदेची दृष्ये मनिष शर्मा दिग्दर्शित फॅन या चित्रपटात
दिसणार आहेत म्हणे. असो, शाहरुखबरोबर चर्चा करण्यासाठी त्याचे घर काय किंवा
घराबाहेरची जागा काय.....काय फरक पडतो....तुम्हाला काय वाटते....
No comments:
Post a Comment