अनिरुद्ध इंटरप्राइजेस
विवेक कवडे प्रस्तुत तसेच चंद्रकांत पवार, नित्यानंद येवले निर्मित मराठी चित्रपट
“भिंगरी” चा मुहूर्त धूमधडाक्यात पार पडला.
या वेळी सिनेमाची
संपूर्ण टीम उपस्थित होती. विनोदाचा बादशाह व कॉमेडी सर्कस, झलक दिखलाजा, जुबली
कॉमेडी सर्कस, कॉमेडी नाईट्स बचावो, सारख्या टेलीविजन कार्यक्रमाद्वारे सर्व
भारतीयांचे मनोरंजन करणारा व बॉलीवूड मध्येही आपल्या अभिनयाची छाप सोडणारा
सर्वांचा लाडका अभिनेता कृष्णा अभिषेक प्रथमच “भिंगरी” या मराठी
चित्रपटाद्वारे पदार्पण करीत आहे. या वेळी कृष्णा म्हटला कि “या अगोदर मला मराठी
चित्रपटांच्या अनेक ऑफर आल्या, मात्र काही ना काही कारणास्तव योग जुळला नाही,
मात्र “भिंगरी” द्वारे हा योग जुळून आला. मी स्वतः मराठी सिनेमे नेहमी पाहत असतो,
माझे सर्व मित्र मराठी आहेत, माझी बायको काश्मीरा पण छान मराठी बोलते, ती पण
मराठीच असल्याने मला हा सिनेमा करतांना तिची पण मदत होईल अशी अपेक्षा व्यक्त
करतो”. क्रिष्णा अभिषेक ने या अगोदर “बोल बच्चन”, अक्षय कुमार सोबत
“एन्टरटेन्मेंट” सारख्या सुपरडुपर हिंदी चित्रपटांमध्ये प्रेक्षकांची मने जिंकली
होती.
भिंगरी या चित्रपटात
कृष्णा अभिषेक सोबत नवोदित मात्र गुणी अभिनेत्री कांचन” पदार्पण करीत आहे. पहिलाच
चित्रपट तोही विनोदवीर व अभिनय कौशल्य मध्ये जेष्ठ श्रेष्ठ असणार्या अभिनेता
असल्याची थोडी फार भीती आहे, मात्र चित्रपट खेळीमेळीच्या वातावरणात होईल अशी आशा
कांचन ने व्यक्त केली. या सोबत बागी’ फेम रमेश स्वामी, टाईमपास फेम जयेश चव्हाण
यांच्याही महत्वाच्या भूमिका आहेत.
“भिंगरी” चित्रपटाचे
लिखाण मुरली ललवाणी यांचे असून दिग्दर्शनाची धुरा त्यांनीच समर्थपणे सांभाळली आहे.
छाया दिग्दर्शन युवराज इंदुरिया करीत असून संगीत ओम कुमार यांचे आहे. वेशभूषा
स्वप्नील कांबळे यांची असून नृत्य दिग्दर्शक सुनील ठाकूर यांचे असेल.प्रमुख
सहाय्यक दिग्दर्शकाची जबाबदारी कैलाश पवार पार पडणार आहेत.
‘भिंगरी’ सिनेमाचे चित्रीकरण
लवकरच सुरु होत असून कुलू मनालीला पण काही भाग चित्रित करण्यात येणार असल्याचे
कार्यकारी निर्माते रेखा सुरेंद्र जगताप यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment