शिवाय हा इतर सिनेमांपेक्षा कशा अर्थाने वेगळा आहे?
शिवाय हा एक भावनिक नाट्य असलेला सिनेमा आहे... ही एका वडील आणि मुलीची गोष्ट आहे, पण ती खूपच वेगळ्या प्रकारे हाताळण्यात आलेली आहे.
पण प्रोमोमधून मात्र फारसे काही लक्षात येत नाही....
जर तुम्ही या प्रोमोबरोबर जोडले जाण्यास सुरुवात केली, तर तुम्हाला कथा काय आहे, ते समजेल. मला वाटते ही खूप छान गोष्ट आहे, जर मी तुम्हाला कथा सांगितली तर तुम्ही सिनेमा का पहाल? मी गेल्या तीस दिवसांत झोपलेलो नाही.
बल्गेरीयामधील कडाक्याच्या थंडीत, या सिनेमासाठी ऍक्शन (साहस दृष्ये) दृष्ये साकारण्याचा अनुभव कसा होता?
खूपच मजा आली, कारण आम्ही खूप चांगले काम करत होतो, पण ते खूपच कठीणही होते, आम्ही उणे २० डिगरी तापमानात स्टंटस् करत होतो. आम्ही त्या ठीकाणी दहा मिनिटांपेक्षा जास्त काळ उभेही राहू शकत नव्हतो. सुदैवाने आम्ही आमच्या सर्व लोकांची खूप काळजी घेतली. We have to still shoot for some portions. आम्हाला अजूनही काही भागांचे चित्रिकरण करायचे आहे.
त्या प्रचंड थंडीचा सामना केल्यानंतर, तुम्हाला आता सियाचिनमधील भारतीय सैनिकांचे क्लेष अधिक प्रकर्षाने जाणवले का?
तुम्ही जर या सैनिकांकडे पाहिले तर तुम्हाला जाणवेल, ती ते बाहेर फार काळ उभे राहू शकत नाहीत. जेंव्हा चॉकलेट ब्लॉक्स टाकले गेले, तेंव्हा त्यांचा वापर ते त्यावर उभे रहाण्यासाठी करतात. ते खात नाहीत. लोकांना त्यांचे पाय गमावावे लागतात. ते त्या ठीकाणी सहा महीन्यांपासून जास्त काळ राहू शकत नाहीत. टीम्स बदलतात.
सिनेमाचे नावच शिवाय आहे, अशा वेळी तुमची यातील भूमिका भगवान शंकराशी कशा प्रकारे नाते सांगते?
शिवाः तुम्ही शिवाशी किती जोडलेले आहात. मी त्यासह जन्मलेलो आहे, पण हा अधिक मानवी आहे. तो भांग पितो आणि चिलिम ओढतो, तो निष्कपट आहे आणि त्याला खूप रागही येतो.
तुम्ही नेहमीच तुमच्या सिनेमांसाठी गुंतागुंतीच्या विषयांची निवड करता. यापूर्वीची यु मी और हम देखील अशीच गुंतागुंतीची कथा होती?
शिवाय हा गुंतागुंत असलेला सिनेमा नाही तर एक नातेसंबंधांबाबतचा सिनेमा आहे. मला असेच सिनेमे करायला आवडतात, जे माझ्या हृदयाला स्पर्श करतात. तुम्ही डाय हार्ड पाहिला आहे का, मला वाटते तो एक कौटुंबिक नाट्य असलेला चित्रपट आहे. त्यामध्ये भावना आहेत. तुम्ही कदाचित त्याला ऍक्शनपट किंवा मारधाडपट म्हणाल. माझी कथाही साधी आहे, त्यामध्ये भावना आहेत आणि स्क्रीनही..
आम्ही असे ऐकले आहे, की तुम्ही या सिनेमासाठी खूप व्हिएफएक्स केले आहे?
व्हिएफएक्स ही माझी कंपनी आहे. जर तुम्हाला आठवत असेल, मी राजू चाचाचे शिर्षक गीत केले, त्यावेळी व्हिएफएक्स भारतात आले नव्हते. त्यावेळी फक्त एकच मशीन होते आणि जे त्यावर काम करत होते, त्यांना ते कसे करायचे हे माहितही नव्हते. मी ते स्वतः केले. ते सर्व चांगले चित्रपट करत आहेत आणि बाहुबलीच्या काही भागांसाठीही काम सुरु आहे. मी स्वतःला अद्ययावत करत रहातो. त्यांना बाजीराव मस्तानीसाठी सर्व आशियाई पुरस्कार मिळाले.
हा सिनेमा करणे किती आव्हानात्मक होते?
मला अधिक मेहनत घ्यावी लागली. मला दृष्ये करुनही घ्यायची होती आणि द्यायचीही होती. बसायला आणि बोलायला मुळीच वेळ नव्हता. त्यामध्ये विविध पातळ्या होत्या आणि कैलाश खेरच्या नविन गाण्यातही अनेक पातळ्या आहेत.
तुमचे बहुतेक सिनेमे हे दाक्षिणात्य सिनेमांचे रिमेक असतात?
हा रिमेक नाही. एक अभिनेता म्हणून मी असे सिनेमे केलेले आहेत, पण एक निर्माता या नात्याने मी कोणताच रिमेक केलेला नाही. काही वेळा तुम्हाला बरेच सिनेमे आवडतात आणि तुम्हाला वाटते अधिकाधिक लोकांनी ते पहावेत. मी एक निर्माता म्हणून रिमेक केलेले नाहीत. आम्ही केलेले बदल आम्हाला आवडले आणि आम्ही ते पुढे नेण्याचा निर्णय घेतला.
काजोलला एखादी भूमिका देण्याचा विचार तुम्ही केला होता का?
माझ्या या सिनेमाच्या पटकथेसाठी काजोल नको होती, ते सर्व गरजेवर अवलंबून असते. आम्हाला एखादी परदेशी मुलगी हवी होती, कारण ती पटकथेची मागणी होती. काजोल माझ्या आईवडीलांची काळजी घेत आहे. ती माझ्या आयुष्याचा मोठा आधारस्तंभ आहे. जेंव्हा मी कामात व्यस्त असतो, तेंव्हा ती घराची आणि मुलांची काळजी घेते. तिच्यामुळेच मी निश्चिंत राहू शकतो आणि शिवायसारखा कठीण सिनेमा करु शकतो. मी माझे संपूर्ण लक्ष माझ्या कामावर केंद्रीत करतो. ती संपूर्ण घरासाठीच खंबीर आधार आहे.
सीमेवरील दहशतवाद आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीबाबत बरेच काही बोलले जात आहे. तुमचे यावर काय मत आहे?
मी त्यांचा चाहता आहे आणि मला ते आवडतात आणि त्यांच्या बरोबर काम करायलाही आवडते. कच्चे धागे हा शेवटचा चित्रपट होता, ज्यामध्ये मी गायकाबरोबर काम केले. यासाठी काही सीमा नाही. आम्ही मित्र आहोत आणि ते काही दहशतवादी नाहीत. पण जर आपले जवान सीमेवर प्राण देत असतील आणि आपल्याला आपली कला आणि संस्कृतीच आपल्यापाशी ठेवायची असेल आणि ते आपल्यासाठी मरत असतील, तर आपण शांत राहू शकत नाही. तो आपल्यासाठी मरत आहे आणि लढत आहे. जोपर्यंत हे प्रश्न सुटत नाहीत, तोपर्यंत आपण हा प्रश्न सोडवू शकत नाही, आपण सर्वप्रथम आपल्या सैन्यालाच पाठींबा दिला पाहिजे.
तुम्ही सायेशाची निवड भूमिकेसाठी कशी केली?
मला एक नविन मुलगी हवी होती आणि ती अजून कच्ची आहे. अभिनेत्यांची मुले असलेले बरेसचे अभिनेते चांगले अभिनेते नाहीत. मला माहित नाही, की माझ्या मुलामध्ये गुणवत्ता आहे का, मला माहित नाही तो अभिनय करेल का... मी कोणाला दोष देत नाही. कामगिरीच्याबाबत मी खूपच कडक आहे. तिच्या वारशामुळे मी तिला घेतले नाही. तिच्या आईकडे गुणवत्ता होती, याचा अर्थ तिच्याकडेही गुणवत्ता असेलच असे नाही.
तुम्ही पंचवीस वर्षांहून जास्त काळ टीकून आहात...
अनेक चांगले अभिनेते इथे आहेत आणि ते खूपच चांगल्या तयारीचेही आहेत. आम्ही खूपच कच्चे होते आणि आम्ही एवढा रसही घेत नसू, आम्ही खूपच मजा करत असू. जेंव्हा आम्ही चित्रपट क्षेत्रात आलो, तेंव्हा आम्हाला हे माहितही नसे की सिनेमा चांगली कामगिरी करेल किंवा नाही, आम्ही नातेसंबंधांसाठी सिनेमे करत असू. व्यावसायिकदृष्ट्या जरी ते चुकीचे असले, तरी भावनिकदृष्ट्या बरोबर होते. आम्ही आजही त्याच चुका करतो. माझे पहिले निर्माता दिनेश पटेल, एवढ्या अडचणीत होते. त्यांचा मृत्यू झाला, पण सिनेमा प्रदर्शित झाला नाही. आम्ही तो प्रदर्शित करण्याचा प्रयत्न केला, पण प्रदर्शित करु शकलो नाही. सर्व मुलांमध्ये खूपच क्षमता आहे, रणवीर, रणबीर, आलिया. ते बुद्धीमान आहेत, एकाग्र आहेत आणि कारकिर्दीबाबत खूपच गंभीरही आहेत, पण स्पर्धाच प्रचंड आहे. आम्ही पंचवीस वर्षे येथे आहोत, त्यामुळे आमचे एक भावनिक नाते आहे. ते प्रामाणिक आहेत. नविन पिढी चाहत्यांची नाही. त्यांना जर वाटले तर ते सिनेमा पहात नाहीत. ते बुद्धीमान, सुशिक्षित आणि संवेदनशील आहेत. आमचे चाहते येतील कारण ते प्रामाणिक आहेत.
सिनेमाचे बजेट काय आहे?
माझा सिनेमा हा जास्त भावनाप्रधान आहे. बजेट काही जास्त नाही, ते इतर सर्व सिनेमांप्रमाणेच आहे. वितरकांवर कोणताही दबाव नाही. स्केल दिसू शकेल. माझी टीम खूपच चांगली आहे.
हा सिनेमा ऐ दिल हे मुश्कील बरोबरच प्रदर्शित होत आहे. या स्पर्धेकडे तुम्ही कसे पहाता?
हा सिनेमाच स्वतःसाठी बोलेल. आम्हाला आत्मविश्वास आहे. स्क्रीनबाबतही कोणतीही अडचण नाही. दोन्ही सिनेमे प्रदर्शित व्हावेत आणि त्यानंतर प्रेक्षकांनी ठरवावे. आम्ही त्याबाबत काहीच बोलू शकत नाही. दोन्ही चित्रपट प्रदर्शित होऊ देत. दोन्ही सिनेमे पहाण्यासाठी आपल्याकडे पुरेशी सिनेमागृह आणि प्रेक्षक आहेत.