मी आत्मपरिक्षण करते - कॅतरीना कैफ
By Harshada Vedpathak
वैयक्तीकरीत्या हा कालावधी कॅतरीनाला काही
फारसा बरा जात नाही आहे. तरी बार बार देखो या चित्रपटाच्या मुलाखती दरम्यान ती
एकदम शांत, सयंत वाटत होती. नो पर्सनल क्वेश्चन्स... या तिच्या पी.आर. ने दिलेल्या
तंबीनंतरही, तिच्या चलबिचलीत मनाचा मागमुस घेण्याचा एक प्रयत्न...
बार बार देखो या चित्रपटाबददल काय सांगशिल ?
बार बार
देखो हा चित्रपट एक प्रेमकथा आहे मात्र त्यात एक नविन लकेर आहे. हा चित्रपट टाईम
ट्रॅव्हल नाही ते लक्षात घ्या. तर जय आणि दियाची हि प्रेमकथा वय वर्ष आठ ते
साठच्या दरम्यान घडताना पहायला मिळेल. त्यामध्ये वयाच्या विवीध टप्यात त्यांच्या
आयुष्यात घडणारया अनेक घटनांना पाहता येईल.
तु तुझ्या चित्रपटांची निवड कश्याप्रकारे
करतेस ?
ऐखादं
कथानक ऐकल्यावर मला त्याबरोबर कनेक्ट व्हायला आवडते. मी जर त्या कथानकाबरोबर
कनेक्ट झाली तर प्रेक्षक देखिल त्या विषयाबरोबर कनेक्ट होतील असं मला वाटतं. आतापर्यंत
मी ज्या काही भुमिका केल्यात त्यामध्ये बार बार देखो या चित्रपटातील माझी भुमिका हि
सर्वेत्तम आहे असं मला वाटतं. कारण त्या चित्रपटातील अनेक घटनेबरोबर मी स्वताला
जोखु शकले. माझ्या कारकीर्दीमध्ये मला असा विषय करायला मिळाला त्याचा मला आनंद
आहे. कारण असा विषय अजुन आपल्याकडे आलेला नाहीय. त्याला प्रेक्षक कश्याप्रकारे
स्विकारतात ते आता पहायचे.
दोन कलाकारांमधिल केमिस्ट्री चा
चित्रपटावर परिणाम होतो काय ?
मला वाटतं कोणत्याही चित्रपटासाठी कथानक
महत्वाचे होय. कथानकामध्ये जर केमिस्ट्री असली तर ती पडदयावर दिसुन येते. मात्र दोन
सहकलाकार एकत्रीत कसे दिसतात, त्या दोघांचे एकमेकांबरोबर जमते काय याचा देखिल
विचार केला जातो.
फॅऩ्टम, फितुर या ऍक्शऩपटानंतर तु बार बार
देखो हा चित्रपट करत आहे. ते स्वताला हलकेफुलकेपणा देण्यासाठी काय ?
चित्रपट जर सिरीयस असला तर माझी भुमिका
देखिल गंभीर असायला पाहिजे असे काही आवशक नाही. आतापर्यंत मी केलेल्या भुमिकांपैकी,
मला वाटतं बार बार देखोमधिल भुमिका सर्वेधीक आव्हानात्मक आणि भावनिकरीत्या दमछाक
करणारी आहे. ऐखादया चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये जर ग्लॅमर आणि प्रेम दिसत असेल तर तो
चित्रपट हलकाफुलका असेल, त्यामध्ये खोली नसेल हे गरजेचे नाही. मात्र तुम्ही या
सगळ्याकडे कश्याप्रकारे पाहता त्यात खरे आव्हान दडलेले असते. तुम्ही रोमॅन्टीक आणि
भावनाप्रधान चित्रपटात देखिल आव्हानात्मक असु शकता. मला वाटतं, चित्रपटाची जातकुळी
कधीच आव्हानात्मक नसते तर भुमिकेचा आराखडा आव्हानात्मक असतो. तर कधी तुमची भुमिका
तुमच्या स्वभावाच्या किंवा विचारसरणीच्या विरोधात असते, आणि तशी भुमिका निभावणे
खरे आव्हानात्मक असते.
तुझे प्रत्येक आयटम गाणं हिट ठरले आहे.
त्यामुळे बार बार देखोमधिल काला चष्मा... देखिल त्याच फळीत जावुन बसेल असे तुला
वाटते काय ?
कोणत्याही
चित्रपटाचे हिट गाणं हे त्या चित्रपटातील कलाकाराच्या कारकीर्दीला नक्कीच पुरक
म्हणुनच साबीत होतं. गाणी हि भारतीय चित्रपटसृष्टीचा आविभाज्य भाग राहीली आहेत. यशस्वी
चित्रपटाची गाणी आणि अलबमने, अनेक चित्रपटांना सुदीन दाखवला आहे. त्यात, अनेक
गाण्यांचे प्रमोशन हे फक्त त्या चित्रपटासाठी प्रेक्षकाला आकृष्ट करण्यापुर्ती
केली जातात. आणि हाच प्रेक्षक जेव्हा तो चित्रपट पाहतो, तेव्हा त्या चित्रपटातील
ग्लॅमर मागे ठेवुन फक्त भावनात्मकता आणि अभिनय लक्षात ठेवतो.
गैरफिल्मी पार्श्वभुमी असताना, तु येथे खुप
यश मिऴवलेस. तुझ्या यशाचे श्रेय तु कोणाला देतेस ?
माझ्या दहाअधिक वर्षाच्या कारकीर्दीत एक
मुदयाला माझ्या यशाचे श्रेय देणे खुप कठीण आहे. मी जे काही काम केले ते अगदी मेहनतीने
केलं हे मी म्हणेन आणि उरलेलं श्रेय मी माझ्या नशिबाला देईन. मी जे काही काम
स्विकारते ते अपार मेहनतीने पुर्ण करायची तयारी ठेवते. काही काळ माझे कामावर लक्ष
नव्हते आणि तो काळा माझ्या जिवनातला अगदी वाईट काळ होता असं मी म्हणेन. नेहमीच
तुम्ही अव्वल ठरु शकत नाही. पण तुम्ही जेव्हा विचार करता तेव्हा तुम्ही केलेलं काम
हे तुमच्या दृष्टीने शंभ्भर टक्के होतं, ते तुम्हाला माहीत पाहिजे. आणि हिच फार मोठी गोष्ट आहे. तुमची स्पर्धा ही नेहमीच तुमच्या
बरोबर पाहिजे या मताची मी आहे.
मेहनत करुनही चित्रपट चालले नाहीत. किंवा
जिवनात जेव्हा तु मागे पडतेस त्या दडपणाला तु कश्याप्रकारे हाताळतेस ?
चित्रपट जेव्हा चालत नाही तेव्हा त्या
चित्रपटाची तुम्ही केलेली निवडच मुळात चुकली आहे. तुमचा चित्रपट प्रेक्षकांबरोबर
नाळ जुळवु शकला नाही असं समजायचे. महत्वाचे म्हणजे, प्रेक्षक कधीच चुकत नाहीत ते लक्षात
घ्या. माझ्या अनेक चित्रपटाला, प्रेक्षकांनी स्विकारले आहे आणि जेथे माझे चित्रपट
चालले नाहीत तेथे, चित्रपटात काहीतरी चुकले असेल असे मला वाटते. या सगळ्यामधुन सकारात्मकरीत्या
बाहेर येण्यासाठी मी आत्मपरिक्षण करते आणि त्यामध्ये काय सुधारणा करता आली पाहिजे त्यावर
विचार करते. आपण दुसरया माणसाचे वागणं, विचार यावर स्वामीत्व ठेवु शकत नाही,
म्हणुन तुम्ही त्यांच्यावर दोष ठेवुन नामानिराळे राहु शकत नाहीत. तर कधी तुम्हाला
तुमच्यावर देखिल सक्ती करायची गरज नसते. मला वाटतं या सगळ्याचा विचार करुन, आपण
वैयक्तीक आयुष्यात देखिल जगु शकतो.
तु आता फेसबुकबर पण आली आहेस. अचानक त्या
सोशल प्लॅटफॉर्मवर येण्याचा विचार कधी केलास?
प्रेक्षकांबरोबर सरळ संवाद साधण्यासाठी
मला ऐका व्यासपिठाची गरज होती. कारण ते माझ्याबद्दल जे काही ऐैकतात, ते सगळं काही मिडीया
ठरवतो. ते सगळं खरं असते असं नव्हे. त्यामुळे माझ्या प्रेक्षकांना मी खरी कोण आहे,
माझे विचार, वागणुक काय आहे ते कळुन देण्यासाठी मी फेसबुकवर आले. मला वाटते फेसबुक
हे तुमच्या व्यक्तीमत्वाचा आरसा आहे. येत्या काही दिवसांमध्ये तुम्ही मला
टि्विटरवर देखिल पहाल.
चित्रपट प्रदर्शनानंतर तु बॉक्स ऑफीसवर
कितपत नजर ठेवतेस ?
मी बरयापैकी लक्ष ठेवुन असते. जेणेकरुन,
प्रेक्षकांना काय आवडते किंवा काय आवडत नाही ते कळायला सोपे जाते.
No comments:
Post a Comment