कोणी छेडायचे तर मला
माझीच चुकी वाटायची – तापसी पन्नु
-
हर्षदा वेदपाठक
डेव्हीड धवन दिग्दर्शित
चष्मे बद्दर या चित्रपटाद्वारे पदार्पण करणारी तापसी पन्नु तिच्या गोड लुक्समुळे
अनेकांच्या लक्षात राहीली खरी. परंतु त्या स्विट गर्लची ओळख तिने, बेबी या
चित्रपटात ऍक्शन भुमिका करुन पुसुन काढली खरी. तर पिंक या चित्रपटात ती आजची शहरी
मुलगी साकारताना दिसतेय. तिच्या या भुमिकेबद्दल तिच्याबरोबर केलेली बातचित...
चष्मे बद्दुर या चित्रपटानंतर
तापसीने, दक्षिणेतील काही चित्रपटांमध्ये काम केलं आहे. आणि आता ती चक्क अमिताभ
बच्चन यांच्या बरोबर पिंक या चित्रपटात काम करत आहे, “माझी लक लाईन माझ्या लाईफ लाईनपेक्षा अधिक दमदार असावी कदाचित. माझ्यासाठी
चष्मे बद्दुर या चित्रपटाद्वारे कारकीर्दीची सुरवात करणे एक चांगला निर्णय होता
कारण त्यामुळे कमर्शिअल अभिनेत्री म्हणुन मी ओळखली गेली. तेच जर मी बेवी किंवा
पिंक या चित्रपटाद्वारे काम करायाला सुरवात केली असती तर लोकांनी मला आर्ट
चित्रपटाची हिरोईन म्हणुन बाजुला केले असते. मी एक व्यावसायिक अभिनेत्री आहे, जी
अभिनय करु शकते हे लोकांच्या लक्षात आले.
भुमिकांच्या बाबतित मी खुप सबुरीने निर्णय घेते. शुजीत सरकार यांचा रनिंग शादी डॉट
कॉम हा चित्रपट मी केला होता. माझे ते काम पाहुन त्यांनी मला पिंक या चित्रपटासाठी
विचारले. सगळ्या कलाकारांची निवड होईपर्यंत कोणालाही त्या चित्रपटात अमिताभ बच्चन
आहेत हे सांगीतले गेले नव्हते. चित्रीकरणाला सुरवात करण्यापुर्वी आम्हाला त्याची
माहिती दिली गेली. आणि तो आम्हाला एक धक्काच होता. मी दिल्लीची मुलगी आहे, पिंकचे कथानक देखिल
दिल्लीतच घडते. तसेच माझ्या भुमिकेत अनेक पापुद्रे असल्याने मी त्या भुमिकेसाठी
होकार भरला”.
पिंकमध्ये तापसी, मिनल
अरोरा या तरुणीची भुमिका निभावत आहे. जी मॉलस्ट्रेशन विरुध्द आवाज उठवते. मुलींची
छेडछाड होणे हि एक सामान्य बाब असल्याचे ती मानते. “ते तर प्रेत्येक मुलीच्या रोजच्या जिवनाचा ऐक भाग आहे. माझ्याबरोबर कधी
मॉलस्ट्रेशन झाले नाही परंतु मी बरयाचदा शारिरीक छेडछानीचा सामना केला आहे.आज असं
वाटतं की, मी तेव्हाच त्यांना धडा शिकवायला पाहिजे होता. तेव्हा मी कॉलेजमध्ये
होती आणि आम्हाला घरातुन काही सांगीतले जात जात असे, त्यात गल्लीतुन चालु नये,
लहान कपडे घालु नयेत, अनोळखी लोकांबरोबर बोलु नये हे सांगीतले जात आसे. त्यामुळे
आमच्याबरोबर काही घडलं तर त्यामध्ये आपलाच दोष आहे असे वाटत असे. बालपणापासुनच
मुलींना असे काही शिकवुन त्यांचा एक माईन्ड सेट तयार केला जातो. छेडछेड किंवा कमेंन्ट
पास करणे हा तर दिवसाच्या परिक्रमेचा एक भाग असायचा. ते माझ्या कॉलजचे दिवस होतेत
आणि मला आठवतय, की गुरु नानक यांच्या जन्मदिवसाचा तो कार्यक्रम होता. कोणी मला
कोठे हात लावु नये म्हणुन मी कॉलेजची बॅग पाठामागे लावुन त्यावर हात ठेवुन चालली
होती. तर मला कोणी तरी टच केलाच. घाबरली होती मी पण, तरी सगळं बळ ऐकवटुन मी त्या
माणसाला हात पिरगळला....पिरगळ होती आणि मागे बघायची माझी काही हिम्मत नव्हती. दिल्लीत
तर बसमध्ये पण कोणी अंगाला चिटकत असे, तर कोणी जवळुन अंग घासुन जात असे. त्यावर माझी
चुकी असल्यासारखी मी गप्प बसत असे. दिल्लीत असताना तर मी काहीच करु शकली नाही. मला
हिम्मत आली ती मुंबईत आल्यावर”.
वडीलांच्या सावलीत सुरक्षित राहणारी
तापसी मुंबईत आल्यावर बरयापैकी आत्मनिर्भर झाल्याचे सांगते. आता तर तिचे वडील
देखिल तिचा सल्ला घेतात. “तुम्ही विश्वास ठेवा माझ्या वडीलांनी मला ओव्हरनाईट स्टेची कधीच परवानगी
दिली नव्हती. आणि विचार करा मी त्या वातावरणातुन सरळ दक्षिणेत जाते.
तेथे चित्रपटात काम करते. आणि पुर्ण अडीच वर्ष तेथे एकटी राहते. त्या दरम्यान घर
घेण्यापासुन, ते सजवेपर्यत मी सगळं ऐकटीने केलं. माझ्या बहीणीला माझ्या घरी बोलावले
तिचे पालन पोषण केले आणि त्यानंतर मी मुंबईला शिफ्ट झाली. स्वताच्या कमाईने मी घर
आणि गाडी विकत घेतली. बहीणीला बिझनेस सेट करुन दिला. खरं तर मी ठरवलंच होतं की,
जेव्हा मी कमावती होईन तेव्हा पासुन बहीणीला पॉकेट मनी देत जाईन. माझी पहिली कमाई
चार हजार होती. आता तर माझी बहीण देखिल स्वताच्या पायावर उभी राहीली आहे. मात्र
कमालीची बात तर हि आहे की, माझ्याबद्दल माझ्या वडीलांचा दृष्टीकोण आता बदलला आहे.
अगदी काही महिन्यापुर्वी त्यांना बॅन्केचे लोन घ्यायचे होते. आणि घरची प्रॉपर्टी
विकायची गोष्ट झाली. तेव्हा त्यांनी माझ्याकडे सल्ला मागितला. आणि मी त्यांना
माझ्या वाट्याची प्रॉपर्टी विकायला सांगीतली. ते पैसे वापरायला सांगीतले आणि
उरलेले लोन मी चुकते करीन हे सांगीतले. वडीलांना हे समजावताना मी आयुष्यात काही
तरी मिळवले आहे असं मला वाटु लागले”.
पुन्हा ऐकवार पिंक या चित्रपटाकडे वळताना ती
सांगते, “या चित्रपटातील सगळीच दृष्य दमवणारी होतीत. खास करुन कोर्टातील दृष्ये,
मला दररोज सेटवर जातान, मी सॅक्सच्युअल मॉलस्ट्रेशनची शिकार झाली आहे त्याच
मानसिकतेने जावे लागे. माझ्याबरोबर ती घटना घडली आहे या विचारानेच मला टॉर्चर व्हावे लागे. चित्रपटात
तुम्ही माझ्या डोळ्यात जे पाणी पाहता ते ग्लीसरीनशिवाय आलेले आसु आहेत, मी भुमिकेत
स्वताला इतकं समर्पीत केलं होत. पिंक हा चित्रपट आम्ही तेहतीस दिवसात चित्रीत
केला. आणि त्यानंतर मला ऐका आठवड्याची सुट्टी घ्यावी लागली. मी इतकी एक्झॉस्ट झाली
होती. माझी अवस्था अशी झाली होती की, मी लहानसहान गोष्टीवरुन उगाचच रडु लागायची. मी
इतकी कमकुमवत झाली की, ऐका क्षणाला
ती घटना माझ्याबरोबरच झाली की काय असे मला वाटु लागले होते. मी देवाचे आभार मानते
की, आम्ही दिल्लीतच चित्रीकरण करत होतो आणि माझ्या डीप्रेशनमधुन मला बाहेर काढायला
माझे कुटुंब माझ्याबरोबर होते. शुटींगनंतर मी माझ्या मित्र मंडळींना सेटवर
डीनरसाठी बोलवत असे. मुंबईमध्ये जेव्हा आम्ही कोर्टाची दृष्ये चित्रीत करत होतो
तेव्हा माझे आईवडील माझ्या बरोबरच होतेत. त्याने मला फार मोठा दिलासा मिळाला,
नाहीतर या भुमिकेने मला आताबाहेर भेदुनच टाकले असते”.
No comments:
Post a Comment