Wednesday, 14 September 2016

Mirzya music releases


भव्य कार्यक्रमात मर्झीयाचे संगीत लॉन्च

सोनम आणि रिया कपुर नंतर, अनिल कपुर यांचा मुलगा हर्षवर्धन चित्रपटसृष्टीत पदार्पण करीत आहे. त्याला लाभलेला पहिलाच चित्रपट म्हणजे राकेश ओमप्रकाश मेहरा दिग्दर्शित मर्झीया हा होय. मिर्झा साहेबान यांच्या प्रेमकथेवर आधारीत या चित्रपटात तो उषा किरण यांची नात सयामी खेर बरोबर काम करत आहे. काल या चित्रपटाच्या भव्यदिव्य संगीत प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळेस सगळा कपुर परिवार, खेर परिवार तसेच आझमी कुटुंबीय उपस्थित होतेत. दिग्दर्शक ओमप्रकाश मेहरा यांनी मिर्झा साहेबान यांची त्यांना आवडलेली कथा, त्याचा प्रवास तसेच कलाकारांची निवड यावर भाष्य केले. तर गीतकार गुलजार यांनी, मर्झीया या चित्रपटातील गाणी हि त्या चित्रपटाच्या प्रवासाला कश्याप्रकारे पुढे नेतात त्याचा खुलासा केला. तर आपल्या मुलाला अभिनेता म्हणुन पाहताना, पहिल्याच पत्रकार परिषदेमध्ये भावुक झालेले अनिल कपुर म्हणाले, हर्षने त्याचा पहिला चित्रपट स्वताच्या बळावर मिळवल्याचे सांगुन, त्याला अभिनेता म्हणुन घडवण्याचे श्रेय ते राकेश ओमप्रकाश मेहरा यांना देतात. तर अनेक वर्षानंतर पार्श्वसंगीतात परतलेले देलेर मेहंदी यांनी, आजकालची गाणी आवडत नसल्याने काम करत नसल्याचे स्पष्ट केलं. परंतु मर्झीयांतील गाण्यांमध्ये असलेल्या अस्सल भारतीयतेने ते भारल्याचे कबुल करतात. त्याचे श्रेय ते संगीतकार शंकर ऐअसान लॉय यांना देतात. तब्बल सतरा वर्षानंतर पटकथा लेखनात परतलेले गुलजार, मिर्झा साहेबान यांच्या सशक्त प्रेम कथेने लेखन करवुन घेतल्याचा दावा  करतात. आमीर खान आणि रणबीर कपुर यांना आर्दश माऩणारा हर्षवर्धन आणि आपल्या आजीचा वारसा पुढे नेणारी सयामी खरे यांच्या, मर्झीयाचा प्रोमो पाहुन अऩेकांच्या अपेक्षा उंचावल्या नसल्यास नवल....   


No comments:

Post a Comment