पापा मोशन पिक्चर्स या निर्मिती संस्थेचा पहिला हिंदी चित्रपट असलेल्या
लुच्चा या चित्रपटाचा मुहूर्त अंधेरीतील कार्निवल सिनेमागृहात पार पडला. निर्माती
निशा शर्मा यांच्या कंपनीचा हा पहिलाच हिंदी चित्रपट असून, लैंगिक प्रशिक्षण या
विषयावर आधारित कथानक येथे पाहता येईल. लुच्चा या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शन विकास
कवठेकर यांनी केले आहे. त्यापुर्वी त्यांनी जी. पी. सिप्पी यांचे सहाय्यक म्हणून
काम केले आहे. त्याचप्रमाणे अनेकविवीध डेलीसोपचे दिग्दर्शन देखिल त्यांनी केले
आहे. कवठेकर यांचे स्मरणात राहणारे काम म्हणजे, टायगर श्रॉफ अभिनीत, ट्रीबुट टू
मायकल जॅक्सन या व्हीडीयो अल्बमचे दिग्दर्शन.
लुच्चा चित्रपटाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये राकेशकुमार हा एक नवीन
चेहरा आपले नशीब आजमाविण्यासाठी येत आहे. राकेशने यापुर्वी अनेक लहान मोठ्या
भूमिका, छोट्या पडद्यावर साकार केल्या आहेत. मध्यवर्ती भूमिका असलेला हा त्याचा
पहिलाच हिंदी चित्रपट होय. हरियाणातील भिवानी जिल्ह्यातील, बवानीखेडा सारख्या
छोट्याशा गावातून आलेला राकेशकुमार, लुच्चा या चित्रपटासाठी आशावादी नसल्यास नवल.
लुच्चामध्ये राकेशची सहनायिका आहे गुरलीन चोपडा. गुरलीनने यापुर्व कूच तो
गडबड है, भागम भाग, इंटरन्यॅशनल हिरो, या हिंदी चित्रपटांमध्ये काम केले पाणी आहे.
गुरलीन अभिनीत पोपट पिसाटला... या गाण्याने अख्या महाराष्ट्रात धुमाकूळ माजविला
आहे. तिने हिंदीसह मराठी, कन्नड, तेलगु,
तमिल, पंजाबी भाषिक चित्रपटांतही काम केले आहे.
लुच्चा या चित्रपटाला संजय पाठक यांचे संगीत असून, चित्रपटाची कथा सुजित
कुमार यांची आहे. चित्रपटाचे शुटींग भारतासोबत नेपालमधील काठमांडू येथे होणार आहे.
No comments:
Post a Comment