Saturday, 10 October 2015

रंगभूमी सेन्सोर बोर्ड चा अजब निर्णय

रंगभूमी नाट्य प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचा अजब  फतवा

नवरात्रोत्सव मंडळांना सादरीकरणाचा परवाना सक्तीचा

- शीतल करदेकर, माजी सदस्य, रंगभुमी प्रयोग परीनिरीक्षण मंडळ


नवरात्रोत्सव चार दिवसावर आलाय . देवीचे जागरण रात्रीचे आणी देवीचा हा उत्सव अगदी लहानापासून मोठ्यापर्यत सगळेच जण साजरा करतात. गल्लीबोळात गर्बा दांडीया रंगतो

मात्र या आनंदात मिठाचा खडा टाकण्याचे काम रंगभूमी नाट्य प्रयोग परिनिरीक्षण मंडळाने केले आहे .

रंगभूमी नाट्य प्रयोग परिनिरीक्षण मंडळाच्या नियमावलीत सार्वजनिक ठिकाणी सादर होणारे मेळावे ,नृत्य इतर प्रायोग यांच्या सहितांना सादरिकरणाची परवानगी आवश्यक आहे . नवरात्रोत्सवात जे नाच होतात त्यांना सहिता नसते. तर अशा गरबा दांडियाला असा मोठा कर लाऊन शासन गरीब देविभक्तांचे खिसे का कापतेय असा सवाल तरुण संतप्त कार्यकर्त्यांनी विचारलाय

हिंदूंच्या या आदिशक्तीच्या आनंदोत्सवाला नाटकाच्या सेन्सोर मंडळाने एक हजार रुपये चा नऊ दिवसांचा तालिबानी कर लावला आहे आजवर नवरात्रोत्सव मंडळांना केवळ पोलीस परवाना लागत होता

मात्र भाजपच्या राजवटीत गोरगरीबांच्या आनंदात विरजण टाकण्याचे काम झाले आहे . नवरात्रोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांची गर्दी  सेन्सोर बोर्डाच्या कार्यालयात उडाली आहे . मजबुरी म्हणून  हे कार्यकर्ते  प्रचंड नाराजीने  हा पर्वण घेत आहेत

रंगभूमी नाट्य प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचा परवाना नसेल त्यांना पोलिस परवाना देऊ नये असा अजब फतवाच मंडळाचे अध्यक्ष अरुण  नलावडे यांनी  राज्यातल्या पोलीस ठाण्यांना पाठवला आहे

\त्यामुळे राज्यभरातील देवींच्या भक्तात विशेषतःतरुण कार्यकर्त्यात नाराजी आहे

याबाबत अध्यक्ष अरुण  नलावडे यांना विचारले असता प्रत्येक मंडळा ने सेन्सोर परवाना घ्यायलाच हवा असे ठासून सांगितले .

मोठ्या मंडळाना जे मोठे गर्बे आयोजित करतात तिकीट लाऊन कमावतात त्यांच्याक्डून वसुली व्हावी

पण आदीशक्तीच्या आंदोतत्सवात असा अजब वसुलीचा प्रकार का घडतोय . सेन्सोरच्या नियमात कुठेहीअसा नियम नाही मग हि अशी वसुलीभाजपच्याच काळात का व्हावी असा सवाल अनेक मंडळांनी विचारला .

 रंगभुमी प्रयोग परिनिरीक्शन मंडळाने नवरात्रोत्सव मंडळांसाठी एक हजार रुपयांचा परवाना सक्तीचा केलाय.हे निशेधार्ह आहे.
मंडळाच्या नियमावलीत असा कुठलाही नियम नाही.करमणुकीच्या कार्यक्रमाचे लिखाण मेळ्याचे लिखाण अर्थात संहितांना मंडळाचा सादरीकरण परवाना लागतो.दुसरं महत्त्वाचं की देवीच्या जागरणाचा नाच हा कोणते नुकसान किंवा समाजात विद्वेश किंवा वाद पसरवणार आहे. हा नवीन फतवाच पूर्ण चुकीचा देवीच्या भक्तांवर अन्याय करणारा आहे.खरं तर या सेन्साँर मंडळाला लोकांनी जाब विचारायला हवा.मंडळांचे पैसे परत मिळायला हवेत.

No comments:

Post a Comment