Tuesday, 27 October 2015

Ashok Saraf pays tribute to his guru

लंडनच्या आजीबाई चे… लंडनला शुभारंभाचे  प्रयोग

अशोक सराफ यांची … कलामंदिरच्या पुनरुज्जीवनाने गुरूला आदरांजली

ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी बनल्या लंडनच्या आजीबाई

सादरकर्ते – कलामंदिर [ कै गोपीनाथ सावकार ह्यांची नाट्यसंस्था –त्यांचे भाचे –सुप्रसिद्ध अभिनेता अशोक सराफ आणि बंधू सुभाष सराफ [चार्टड अकाऊंटंट] –ह्या नाटकाच्या द्वारे जुन्या नामांकित संस्थेचे पुनरुज्जीवन करीत आहेत]

आजीबाई बनारसे ह्यांची कारकीर्द लंडनमध्ये घडलेली आहे.महाराष्ट्र मंडळ ,लंडन ह्यांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी सहकार्य दिले आहे.

 मराठी नाटकाची परदेशवारी आता नवीन राहिलेली नहि. मात्र थेट लंडनला नाटकाचा शुभारंभाचे प्रयोग करण्याचे धाडस व मान मिळवला होता मोहन वाघांच्या गगन् भे दी  आता  असेच धाडस करण्याचा मान मिळवलाय  लंडनच्या आजीबाई या नाटकाने .  अभिनय सम्राट अशोक सराफ हे य नाटकाचे निर्माते असून त्यांचे गुरु ओ मामा  गोपीनाथ सावकार यांच्या कलामंदिर या नाट्यसंस्थेचे पुनरुज्जीवन   यानिमित्ताने केले आहे –‘लंडनच्या आजीबाई’- शुभारंभाचे प्रयोग लंडन आणि ब्रिटनमध्ये- ३१ ऑक्टोबर ते ८नोवेंबर दरम्यान  होणार आहे या नाटकाच्या मुहूर्तापासून प्रयोगाची मागणी आली आणि  सगळ्याच टीमचा उत्साह वाढला

या नाटकाच्या मुहुर्तप्रसंगी मनोगत व्यक्त करताना सांगितले कि मला मामांच्या कलामन्दिरच्या माध्यमातून नाट्यसेवा करायची होती पण सततच्या कामात ते राहून गेले मात्र आता हि सगळी टीम ज्या उत्साहाने काम करतेय हे पाहता व आजीबाईनि केलेले कार्य पाहता हेच नाटक आपल्या संस्थेच्या पुनरागमनास योग्य आहे असे वाटले . हि निर्मिती रसिकांना नक्कीच आवडेल .

हि ‘कहाणी लंडनच्या आजीबाईंची’ ह्या सरोजिनी वैद्य ह्यांनी लिहिलेल्या-राजहंस प्रकाशनाच्या गाजलेल्या पुस्तकावर आधारित  ‘आजीबाई बनारसे’ असून हा या आजीबाईंच्या जगण्याचा  प्रभावी आणि प्रेरणादायी असा आलेख असून तितक्याच प्राभाविपणे नाताकरुपात  मांडण्याचे काम राजीव जोशी यांनी केलेय

राजीव जोशी लिखीत हे स्वतंत्र दोन अंकी नाटक  आजीबाई बनारसे ह्यांच्या जीवनावर सरोजिनी वैद्य ह्यांनी लिहिलेल्या पुस्तकावर आधारित आहे.

‘कहाणी लंडनच्या आजीबाईंची’ ह्या पुस्तकावर आधारित ‘आजीबाई बनारसे’ म्हणजेच राधा डोमाजी डहाके ही चौंडी या विदर्भातील एका खेड्यात जन्मलेली एक मुलगी[जन्म -१९१०] १९५० च्या दशकात राधाबाई बनारसे म्हणून  लंडनला जाते आणि घरकाम करता करता इथून गेलेल्या विद्यार्थ्यांसाठी ‘‘आजीबाईची खानावळ’ काढते आणि काही वर्षात तिची खानावळ ही एक सामाजिक /सांस्कृतिक केंद्र बनते. केवळ व्यवसाय न करता आपल्या विलायतेला येणाऱ्या आपला देश-बांधवाना मायेचा आधार आणि घरचे अन्न देणाऱ्या ह्या आधुनिक अन्नपूर्णेने स्व:ताची अशी ओळख निर्माण केली. तेथील लोकांना आपल्या सण-परंपरा आणि एकूण संस्कृतीचा परिचय करून दिला आणि भिन्न देशवासियांमध्ये एकात्मता निर्माण करण्याचा यशस्वी प्रयत्न केला. अश्या या एका अशिक्षित बाईच्या अनोख्या परिश्रमाची ,जिद्दीची कहाणी. आ हे

  या नाटकाबाबत नाटककर राजीव जोशी यांनी  सांगितले कि  पुस्तक वाचल्यानंतर आणि काही माहिती जमा केल्यानंतर   आपण एकपात्री नाटक करावे अशी अभिनव संकल्पना सुचली.कारण आजीबाई बनारसे ह्यांचे जीवन-चरित्र हे नाट्य-रूपात मांडावे हे प्रकर्षाने वाटले.त्यातून हे दोन पात्री नाटक लिहिले गेले.  रविंद्र ढवळे यांनी उअवर नाटक कारायचच म्हणून काम सुरु केले . सराफ  बंधूनी   लगेच होकार दिला   नाटकाची रूपरेषा -मीरा ही आजच्या काळातील एक आधुनिक मुलगी , आपल्या पेरेन्ट्सच्या आग्रहाखातर काही मराठी पुस्तके वाचते  आणि त्यात ‘आजीबाई बनारसे’वरील पुस्तक वाचत असताना तिच्या डोळ्यासमोर खुद्द आजीबाई समोर येतात.दोघींमध्ये संवाद घडतो आणि त्यातून त्याकाळातील आजीबाईचे कार्य आणि आजचा बदललेला काळ-समाज उलगडत जातो. कर्तुत्ववान  आजीबाई  आणि  एक तरुण मुलगी  यांच्यातील संवादातून हे नाटक घडते आणि ‘आजीबाई बनारसे’ ह्या एका कर्तुत्ववान महिलेचे महात्म्य प्रेक्षकांना रंगमंचावरून  पहायला आणि अनुभवायला मिळते. आणि त्यातून आजची पिढी आजीच्या जीवनाशी व कार्याशी कनेक्ट होऊ शकेल असा विश्वास वाटतो.

No comments:

Post a Comment