Saturday, 24 October 2015

Bachchan flag off Tiger rally

व्‍याघ्र संवर्धन संदेश रॅलीसाठी तरूणांनी घेतलेला पुढाकार मार्गदर्शक व प्रेरणादायी – अमिताभ बच्‍चन

ही रॅली म्‍हणजे लोकजागरण - वनमंत्री सुधीर मुनगंटीवार

व्‍याघ्रसंवर्धन संदेश रॅलीचा थाटात शुभारंभ


उच्‍चपदस्‍थ तरूणांनी आपल्‍या कार्यबाहुल्‍यातुन वेळ काढत व्‍याघ्र संवर्धन व संरक्षणाचा संदेश देण्‍यासाठी मोटारबाईक रॅली काढून समाजासमोर नवा आदर्श प्रस्‍थापित केला आहे. सामाजिक जाणीवेचे भान बाळगत या तरूणांनी घेतलेला हा पुढाकार आजच्‍या पिढीसाठी मार्गदर्शक व प्रेरणादायी असल्‍याचे प्रतिपादन ज्‍येष्‍ठ अभिनेते तथा महाराष्‍ट्राचे व्‍याघ्रदूत अमिताभ बच्‍चन यांनी केले.

दिनांक 24 ऑक्‍टोबर रोजी व्‍याघ्र संवर्धन संदेश रॅलीच्‍या शुभारंभप्रसंगी अमिताभ बच्‍चन बोलत होते. अलायन्‍स रायडींग नाईट्स या संस्‍थेच्‍या माध्‍यमातुन दिनांक 24 ते 30 ऑक्‍टोबर या कालावधीत व्‍याघ्र संवर्धन संदेश रॅली काढण्‍यात येणार आहे. या रॅलीचा शुभारंभ व्‍याघ्रदूत अमिताभ बच्‍चन आणि वित्‍त व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हिरवी झेंडी दाखवून केला. मुंबईतील जुहू परिसरातील जनक कार्यालयापासुन या रॅलीचा शुभारंभ झाला. यावेळी बोलताना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले, व्‍याघ्र संवर्धन व संरक्षणाचा संदेश घेवून निघालेली ही रॅली लोकजागरणासाठी आहे. वनसंवर्धन, वनसंरक्षण तसेच वन्‍यजीव संवर्धन व संरक्षणाच्‍या दष्‍टीने गेल्‍या वर्षभरात आम्‍ही विविध 71 निर्णय घेतले आहेत. ही प्रक्रिया लोकसहभागाशिवाय पूर्ण होवू शकत नाही त्‍यामुळे लोकसहभाग वाढावा यादृष्‍टीने आम्‍ही प्रयत्‍नशील आहोत. ज्‍येष्‍ठ अभिनेते अमिताभ बच्‍चन यांनी या प्रक्रियेत व्‍याघ्रदूत म्‍हणून योगदान देण्‍याची जबाबदारी स्विकारली हे आमचे भाग्‍य आहे, असेही वनमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले. समाजाप्रती आपली जबाबदारी ओळखत तरूणांनी या रॅलीसाठी घेतलेल्‍या पुढाकाराबद्दल वनमंत्र्यांनी त्‍यांचे अभिनंदन केले.

रॅलीत सहभागी होणा-या तरूणांचे अमिताभ बच्‍चन आणि सुधीर मुनगंटीवार यांनी स्‍वागत केले व त्‍यांना शुभेच्‍छा दिल्‍यात. या रॅलीत मुंबई-ठाण्‍याहून 20 मोटार सायकल स्‍वार सहभागी होणार आहेत. ही रॅली मेळघाट व्याघ्र प्रकल्‍प, पेंच व्याघ्र प्रकल्प, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पांना भेट देवुन अंतिमतः ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला भेट देवुन परतीच्‍या प्रवासाला निघेल. व्याघ्र रॅलीत सामिल होणा-या मोटारसायकलकडे लक्ष वेधण्यासाठी मोटारसायकलचे भाग वाघाच्‍या कातडयाच्या रंगाने रंगविले आहेत. सदर रॅली वाघाचे अन्न साखळीतील महत्व, वाघाबद्दलची सर्वसाधारण माहिती, वाघांची संख्या, महाराष्ट्रातील व्याघ्र प्रकल्‍प याबाबतची माहिती देत व्याघ्र संवर्धन व संरक्षणाचा संदेश जनतेपर्यंत पोहचविणार आहे. या रॅलीत राजीव तेलंग, हर्षीनी कान्हेकर, प्रणिष उरणकर, प्रथमेश साबळे, आनंद मोहनदास, विक्टर पॉल, ओमयार वाटच्या, श्रीराम गोपालकृष्णन, शार्दुल चामलाटे, शहनवाज बोंदरे, मुनिष चेतल, पल्लवी राऊत योगेश आंबेकर, योगेश साळुंखे, जितु गडकरी, अदनान तुंगेकर, निसर्ग अग्रवाल, चंदन ठाकुर, दिपक ग्रेग्रथ, राहुल शिंदे, आकाश साळवे, दिनेश सिंग, अभिजित पी हे शिलेदार मोटारसायकलवर स्वारी करत सहभागी झाले आहेत. यावेळी प्रधान मुख्‍य वनसंरक्षक वन्‍यजीव श्री. भगवान, मुख्‍य वनसंरक्षक श्री. के. पी. सिंग, श्री. सिन्‍हा, श्री. वासुदेवन, श्री. काकोडकर, श्री. अनवर अहमद, भाजपा नेत्‍या श्रीमती एन.सी. शायना, अभिजीत सामंत, नगसेवक सुनिल यादव, अमोल जाधव आदींची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.


 It is our pleasure to inform you that theTiger Conservation Motorbike Rally was flagged off today by Mr. Amitabh Bachchan by "Alliance for Riding Knights" amidst great enthusiasm.

This is an inspiring example of public participation for a noble cause. I thank and wish a happy and safe journey to all the riders.

- Sudhir Mungantiwar
Minister of Finance & Planning, Forests
Government of Maharashtra

No comments:

Post a Comment