द व्हॅक्सिन वॉर - भारताची यशोगाथा
- हर्षदा वेदपाठक
आपण सगळ्यांनी ख्रिस्तोफर नोलान यांचा द ओपनहायमेर हा चित्रपट पाहिला असेल. या चित्रपटामध्ये विविध स्तरावर बॉम्ब तयार करणाऱ्या विधीला आणि ज्याने तो बॉम्ब शोधला, ज्या अस्त्राने जगभर अनेकांचे प्राण घेतले. त्या मेंदूच्या, शास्त्रीय प्रवासाची कहाणी रंजक पद्धतीने सादर केली होती ती पहिली. त्याच धर्तीवर, अनेकांचे जीव वाचवणारया व्हॅक्सिन (लस) ची अशीच एक कहाणी, ज्याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटावा अशी कथा विवेक अग्निहोत्री दिग्दर्शित द व्हॅक्सिन वॉर या चित्रपटामध्ये पहायला मिळते.
अजिबात गुंतागुंत नसलेली, रेखीव अशी या कथेची मांडणी आहे. बंद प्रयोगशाळेमध्ये खेळून ठेवणारया कथानकाचे सादरीकरण करणे सोपे नाही. द वॅक्सिंग वॉर मध्ये दिग्दर्शक आपल्याला पूर्णपणे बांधून ठेवतो. बायोलॉजिकल सायन्स या विषयाला लिहून अजिबात कंटाळा येणार नाही, अशा प्रकारे तयार करणे मुळात लेखक दिग्दर्शकाला खूप आव्हानात्मक आहे. परंतु हि कामगिरी केली आहे, दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री यांनी. त्यांचे हे काम त्यांच्याच आतापर्यंतच्या कामांमध्ये सर्वोत्तम काम ठरले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
कोणतीही आगाऊ सूचना न देता अचानक आलेल्या सर्दी खोकला आणि ताप यांनी पुढे इतके राक्षस रूप घ्यावे हि संपूर्ण मानव जातीच्या अस्तित्वालाच धोका निर्माण व्हावा. त्याच आजाराला, पुढे कोविड-19 असे नामकरण करण्यात आले. सगळ्या जगाला गिळंकृत करू पाहणाऱ्या कोरोनाला रोखण्यासाठी सगळेच प्रयत्नशील होतेत. पुणे येथील, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च मध्ये काम करणाऱ्या डॉक्टर बलराम भार्गव (नाना पाटेकर) यांना जानेवारी 2020 मध्ये या नव्या व्हायरस ने चिंतेत टाकले. त्यावर उपाय म्हणून ते, इंडियन व्हायरोलॉजी मधील त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने कशाप्रकारे कोव्हीड 19 बरोबर दोन हात करतात ते दाखवले आहे. समाजाची, घराची विस्कटलेली घडी, नात्यांमध्ये असलेल्या दुरावा, लग्न.. शिक्षण.. नोकरी असे सगळे थांबलेले आहे. बेरोजगारांची वाढलेली संख्या.. जगण्यासाठी, उपचारासाठी नसलेले पैसे यामुळे लोकांचे काय हाल झाले ते काही प्रमाणात पाहायला मिळते.
वेळेच्या विरोधात असलेले युद्ध, पटापट मरणारी लोकं, उपचारांची नितांत असलेली गरज हि सगळी दृश्य आपल्याला भूतकळात अलगद घेवून जातात. पार्श्वसंगीत कथानकाला व्यवस्थित पुढे नेताना दिसते.
भारत हा देश फक्त थाळी वाजूवून, गो करोना गो.. असे म्हणणारा असून, अंधश्रद्धेवर जगणारा देश आहे. तो कधीच कोरोनावर उपाय शोधू शकणार नाही, हे देखील जगाने ठरवून टाकले. भारत लस तयार करू शकेल काय किंवा करणार नाही, हि देश आणि विदेशामध्ये तयार झालेली मानसिकता. व्हॅक्सिनेशन शोधुन त्यावर संशोधन करून ती गब्बर औषध कंपनीला विकून, नफा कामावण्यापेक्षा सरकारी व्यवस्थामध्ये वायरस व्हॅक्सिनेशनचे वितरण संपूर्ण भारतभर करण्यात यावी, हि संकल्पनाच मुळात मानवतेला दर्जा मिळवून देते. आपल्या घरात, समाजात, देशभरात, जगभर कोरोनाचा क्रूर धिंगाणा घडताना आपण पाहिला. तोच प्रवास येथे आपल्याला पुन्हा एकदा भूतकाळात घेऊन जातो. तसेच महामारीचे युद्ध हे फक्त विज्ञान या विषयानेच जिंकले जाऊ शकते, हा ठळक संदेश द वॅक्सिंग वॉर हा चित्रपट समाजाला देतो.
दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री, कोरोना संदर्भातील सगळ्याच घटना प्रामुख्याने येथे टिपतात. परंतु त्या सगळ्यांची ते खिचडी करण्याचे टाळतात. त्यापेक्षा संपूर्ण पटकथा हि साधी आणि सराळ ठेवतात. तसेच दिग्दर्शक सगळ्या महिलांच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये डोकावण्याचे देखील टाळतात. प्रत्येक वेळेला, सिस्टिम्सवर भाष्य करण्यापेक्षा, डॉक्टर भार्गव आणि एक पत्रकारातील, पत्रकार परिषदेमधील चकमक येथे प्रतिनिधित्व करते.
डॉक्टर भार्गव म्हणून नाना पाटेकर यांची केलेली निवड उत्तम आहे .कणखर आणि शांत स्वभावाचे डॉक्टर भार्गव म्हणून नाना जमून जातात. गिरिजा ओक, पल्लवी जोशी, रायमा सेन आपल्या भूमिका उत्तमरीत्या वाठवतात.
चित्रपटाच्या शेवटी पडद्यावर झळकणारी भारतीय व्हॅक्सिनेशनची यशोगाथा आपला उर अभिमानाने भरून आणतो. जगामध्ये भारताला मोठेपणा मिळवून देणारा द व्हॅक्सिन वॉर हा चित्रपट सगळ्यांनी पहावा असाच आहे.
- हर्षदा वेदपाठक
#Nan Patekar, #Pallavi Joshi, #Raima Sen #The Vaccine War, #Vivek Agnihotri, #The Vaccine War Review, #Corona, #Covid19,
No comments:
Post a Comment