Tuesday, 10 October 2023

परीक्षण फुकरे 3

 फुकरे 3 - कॉमेडीचा कचरा


- हर्षदा वेदपाठक


२०१३ मध्ये चित्रपट दिग्दर्शक मृगदीप लांबा यांचा फुकरे हा एका अगदी वेगळ्याच धाटणीचा विनोदपट, प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. अगदी अनपेक्षितपणे या चित्रपटाच्या वाट्याला भरघोस यश आले होते. दिल्लीतील दोन रिकामटेकडे तरुण फक्त ऐका विचित्र स्वप्नाच्या माध्यमातून लॉटरीच्या तिकीटाद्वारे पैसा मिळवतात, हि मध्यवर्ती संकल्पना होती फुकरे 2 ची. अश्या या ताज्या, टवटवीत कल्पना समीक्षक आणि प्रेक्षक अशा दोघांच्याही पसंतीस उतरल्या होत्या. आजही उपग्रह वाहीन्यांवर हे चित्रपट तुफान चालतात.


२०१७ मध्ये चित्रपटकर्त्यांनी एक पाऊल पुढे जात, याच मालिकेतील दुसरा भाग फुकरे रिटर्न्स प्रेक्षकांपुढे आणला.. हा भाग पहिल्या भागापेक्षा अधिक प्रमाणात भव्य होता, पण पहिल्यापेक्षा त्याचा दर्जा थोडा खालावलेला होता. बहुतेक मालिकांबरोबर घडणारी हि नैसर्गिक घटना आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हा चित्रपट तिकिट खिडकीवर सेमी हीट ठरला होता.  


२०२३ मध्ये, जवळजवळ सहा वर्षां नंतर मृग आणि त्याची टीम या हटके विनोदपट मालिकेतील तिसरा भाग घेऊन येत आहेत. यावेळी कथा आकार घेत आहे ती आफ्रीकेमध्ये. मृग या मुलांना आफ्रीकेच्या अनोळखी जमिनीवर एका चकाकत्या हिऱ्याच्या शोधात घेऊन तर जातो, पण आणखीनच गोंधळलेल्या अवस्थेत दिल्लीला येऊन परततो.


हनी (पुलकीत सम्राट), चुचा (वरुण शर्मा), लाली (मनोज सिंग) आणि पंडीत (पंकज त्रिपाठी) त्यांचे एक किरकोळ विक्री दुकान असते. पण चुचाच्या देव पुजेचा वापर करुन त्यातून बऱ्यापैकी पैसा कमवत असतात. भोली पंजाबन (रिचा चढ्ढा) तुरुंगातून परत आली आहे आणि दिल्लीभर आपल्या निवडणूक मोहिमेसाठी तयारी करत आहे. चुचाबरोबर निवडणूकीतील सामना टाळण्यासाठी ती मुलांना हिऱ्याच्या शोधात आफ्रिकेत पाठवते, पण यानंतर घडणाऱ्या गुंतागुंतीच्या घटनांची तिला यावेळी काहीच कल्पना नसते. सिटी ऑफ ड्रीम मधून गाजलेली अभिनेत्री लेखा प्रजापती यात हवाई सुंदरीच्या भूमिकेत आहे. ट्रेलरमध्ये दिसलेला तिचा हुक सीन प्रदर्शनापासूनच चांगलाच व्हायरल झाला आहे.


कथानकाच्या ओघात ते दृश्य कमी महत्वाचे , जरी वाटत असले तरी, त्याला तिसऱ्या भागात एक खास महत्व आहे. मृगने क्लायमॅक्समध्ये चागंला धक्का दिला असला, तरी चित्रपटाची लांबी हा या तिसऱ्या भागासाठी थोडा काळजीचा विषय झाला आहे.


फुकरे 3 हा चित्रपट, मालिकेची वैशिष्ट्ये जपण्याचा प्रयत्न जरी करत असला, तरी टॉयलेटवर आधारीत विनोदांचा अतिरेक त्रासदायक ठरतो. लघवी आणि घामाचा अतिरेकी आणि कित्येक टन पेट्रोलियमची निर्मिती करुन ते कसे पैसे मिळवतात ते पहाणे फारसे आनंददायी नाही. पण मृगने दिल्लीतील पाणीटंचाईचा सामाजिक-राजकीय मुद्दा चतुराईने मांडला आहे.


जफर (अली फजल) जरी संपूर्ण चित्रपटभर नसला, तरी त्याला एक विशेष भूमिका आहे, जी चांगलीच लक्षात रहाते.  


चुचाचे विनोदाचे जबरदस्त टायमिंग आणि गमतीशीर संवाद चित्रपट बहारदार बनवतात. संवादाच्या दृष्टीने हनीचे योगदान कमी असले तरी त्याची उपस्थिती जाणवते. लाली आणि पंडीत हे या काहीशा डगमगणाऱ्या पटकथेचे आधारस्तंभ असले, तरी पहिल्याची असाहय्यता आणि दुसऱ्याचे गमतीदार इंग्रजी चुचाच्या विनोदात भर घालते. काही विनोद चटकदार आहेत तर काही पोले आहेत. भोली ही हुशार आणि बेधडक आहे, पण एक प्रकारे यांत्रिक पद्धतीने असे वाटते. तिसऱ्या प्रयत्नात मृग, फुकरे ही मालिका पुढे नेण्यासाठी जोर लावतो, जे काही वेळा जबरदस्तीने केल्यासारखे दिसते, पण त्याची पात्र आपल्या कामगिरीसह ते सगळे तारुन नेतात. एकंदरीत, हे सगळे वाचून तुम्हाला, दहा वर्षांमध्ये एकाच मालिकेतील तीन चित्रपट देणाऱ्या लेखक - दिग्दर्शकाची प्रतिभा काय असेल हि कल्पना आली असेल. त्यामुळे या आठवड्यात, काही पाहायचे चुकले तरी हरकत नाही यावर तुमचे एकमत होत असेलच.


- हर्षदा वेदपाठक


#Fukrey #Fukrey3 #fukrey3review #RichaChadha #PulkitSamrat #VarunSharma #MrugdeepLamba

No comments:

Post a Comment