Wednesday, 21 August 2019

Vidya Balan - Knotty at forty


विदया बालन नॉटी ऍट फॉर्टी

-हर्षदा वेदपाठक

बेगम जान या चित्रपटानंतर विदया बालन, मिशन मंगल या चित्रपटामध्ये अनेक अभिनेत्रींबरोबर काम करतेय. सहअभिनेत्री या सगळ्या महिला असल्या की. सेटवर कपडे, साड्या, फॅशन, जेवण याविषयीच भरपुर चर्चा व्हायची. हे सांगताना, विदया स्पेस या  वेगळ्या विषयावर काम करायला मिळाले यावर समाधान व्यक्त करते. यासह तिच्याबरोबर केलेली बातचित.

मिशन मंगलच्या निमीत्ताने बोलायचे तर तु बारा वर्षानंतर अक्षय कुमार बरोबर काम करत आहेस ?

हे बेबी आणि भुल भुलैय्या हे दोन चित्रपट आम्ही लागोलाग केले होतेत. बारा वर्षाचा कालावधी कधी लोटला तेच समजले नाही. सेटवर सुरवातीला तो ज्या प्रकारे मस्ती करायचा, त्याच प्रकारे अजून देखिल वावरताना दिसला.

आयुष्याची सुरवात वयाच्या चाळीशीमध्ये होते असं म्हणतात. त्या प्रचलीत वाक्य प्रचाराबरोबर तु कश्या प्रकारे जुळवुन घेतेस ?

ओह याह, टेल मी अबाउट इट...मी, माझ्याबरोबर कधी नव्हे, इतकी खुश आहे. मला वाटतं, स्वताबरोबर समाधानी असणे, हेच मुळी वाढत्या वयाबरोबर किंबहुदा आयुष्यात आलेल्या अऩुभवामुळे येणारया मॅच्युरीटीमुळे शक्य होते. आहे त्या परिस्थीतीमध्ये तुम्ही स्वताचा स्विकार करता. आणि स्वताला समजण्याचा जो प्रयत्न करता, तो याच वयात सुरु होतो. अगदी लहानसहान गोष्टी मधुन तुम्ही समाधान मिळवत राहता. 

चाळीशीमध्ये भेडसावणारया मिडलाईफ क्रायसेसचे काय करायचे ?

मिडलाईफ क्रायसेसचा प्रश्न बायकांना काहीच भेडसावत नाही. तर तो पुरुषांना  त्रासदायक ठरतो. बायकांचे प्रॉब्लेम हे मेनोपॉजमुळे होतात. त्या खेरीज स्रीयांना दर महिन्याला मासिक पाळी दरम्यान जो त्रास होतो, तेवढाच ऐक प्रश्न असतो. मला वाटतं स्रीयां मेनोपॉझमध्ये आहेत, या विषयाला त्या सहन करु शकत नाही. कारण त्यामागे आपण एक स्त्री आहोत आणि ते स्रीत्व आता उरलेलं नाही, हा विचार त्यांना विखारी वाटत असावा. बरं मेनोपॉझ बरोबर येणारं चिडचिडेपण, भय, मनात राहुन जाणारी चिंता या गोष्टींचा महिलांना फार त्रास होतो. आणि हे सगळ्या महिलांबरोबर घडते.
आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे, माझी मावशी जेव्हा मेनोपॉझच्या संक्रमणातुन जात होती. तेव्हा ते आम्हाला काय किंवा घरात कोणालात कसे ते काय कऴले नाही. आता मात्र अनेक स्रीया त्यावर व्यक्त होताना दिसत आहेत. आणि ते बदललेल्या काळाचे प्रतिकच मानले पाहिजे.

पुरुष चाळीशीचा झाला की, नॉटी होतो असे म्हणतात मग बायकांबरोबर तसे का नाही घडत ?

माझा एक मित्र आहे ज्याने  लग्न केलेले नाही. आणि त्याला जिवनामध्ये ऐका स्रीबरोबर रहायचे नाही, यावर तो ठाम आहे. तर त्याच्या जिवनात अऩेक स्रीया आहेत. तो कमीटमेन्ट फोबीक असुन, त्याला लॉग टर्म रिलेशनशिपमध्ये राहायचेच नाही. असे त्याचे म्हणणे आहे. तो मला सांगत होता, पस्तीशीच्या पुढील स्रीया या खुप (हसुन) तेज तर्रार असतात.  मला वाटतं तो पर्यत स्रीयांना, अन्डर द शिट चा बरयापैकी अनुभव असतो. त्यामुळे पुरुषांना त्या हुक करु शकतात, यात वाईल्डपणा आणि नॉटीनेस आहेच की.

तु काय नॉटी केलं आहेस ?

(खळखळुन हसून) ते सांगण्यासारखे असते तर नक्कीच तुम्हा सगळ्यांना सांगीतले असते.

फक्त तुझ्याबद्दल तु गर्भवती असल्याच्या अनेक चर्चा बरयाचदा ऐैकाला येतात काय सांगशिल त्याबद्दल ?

सब उल्लु के पठ्ठे रहे है....मी कधीच बारीक, शिडशिडीत अशी नव्हती. आणि तुम्हाला माझे पोट दिसुन आले तर समजा मी आयुष्यभर मग (हसून) गर्भवती आहे.

एक काळ असा होती की, कलाकार अभिनयावर लक्ष देत होतेत. आता मात्र चर्चा होते ती, झीरो फिगरची ?

मुलींनी नेहमी तरुणच राहीले पाहिजे असा, समाजामध्ये एक प्रघात आहे. आणि त्यामुळेच ते चित्रपटाबरोबर जोडलं गलं आहे. ज्यामुळे तुम्ही पुरुषांच्या नजरेत आकृष्ट राहु शकता. स्री तरुण नसली तर पुरुष आपोआपच, तिच्यापासून दुर जाऊ लागतात आणि ते वास्तव आहे .याच कारणामुळे प्राचीन काळी राजा अनेक राण्या करत, आणि नविन राणी हि आधिच्या राणीपेक्षा नक्कीच तरुण असायची. त्याकाळी बायकींची लग्ने लवकर होत असत. मग मुले, यात स्री पार दमुन जात असे.  आता मात्र बदलेल्या काळानुरुप, स्रीयांचे शिक्षण, मग नोकरी आणि लग्न या यात उशीर होत आहे. त्यामुळे स्रीयांच्या आयुष्याची खरी  सुरवात हि  पस्तीशीमध्ये होते असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. इतकच नाही तर मुलांना कधी जन्माला घालायचे हे पण ती आता ठरवु लागली आहे. माझ्याबद्दल बोलायचे तर मी झीरो फिगर या श्रेणीत कधीच बसली नाही कारण मी कधीच शिडशीडीत नव्हते.  माझ्या शरीराबद्दल लोकं काय बोलतात, त्याची पर्वा करणे मी सोडले आहे. पण माझा लुक आणि शरीर याने मी किती खूश आहे ते तु्म्हाला सांगू शकत नाही.  आय फिल सॅक्सी ऑल द टाईम...

तुझ्या लेखी सुंदरतेची व्याख्या काय ?

मला वाटंत तुम्हाला घरात ज्या प्रकारे वाढवलं जातं त्यावरुन तुमची सुंदरतेची व्याख्या ठरते. आमच्या घरात मला सुंदर मुलगी म्हणुनच वागवले गेले. तुम्ही शाळेत जाता, तेथे किंवा तुमचे मित्र मैत्रीणी तुम्हाला तुमचे नाक, दात. केसं, जाडेपणा या वरुन चिडवू लागतात. आणि तेथे सुंदरता म्हणजे काय याची तोंडओळख होते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे, तुमचे आईवडील तुम्हाला ज्याप्रकारे पाहतात. त्यांच्या नजरेतुन तुम्ही, स्वताला पाहत असता. तेथे तुमच्या सुंदरता या व्याख्येचे पहिल्यांदा विशेषण झालेलं तुम्हाला पहायला मिळते. अमेरिकन ब्युटी नावचा मी एक चित्रपट पाहिला होता, त्यात ऐक संवाद होता – सुंदरता चेहरयाने येत नाही तरी तुम्ही आयुष्यात काय काम करता त्याने ठरवली जाते. आणि माझे विचार त्या वाक्याबरोबर जुळतात. महत्वाची गोष्ट म्हणजे, विदयाला तुम्ही जे पडदयावर पाहता, ते एक पात्र म्हणून ,तेथे ती ऐक अभिनेत्री असते. भुमिका आणि विदया या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. 

चित्रपटसृष्टीमध्ये आता अभिनेत्रींना वेगवेगळ्या भुमिका मिळू लागल्या आहेत. मग तिचे वय, तिचे झालेले लग्न यावर पूर्वी ऐवढी चर्चा  आता होताना दिसत नाही?

अश्याप्रकारचा बदल नक्कीच स्वागतार्त आहे. आणि त्यांनी तसा बदल नाही केला, तर मी त्यांना तो बदल करायला भाग पाडेन. दहा वर्षापासुन मी स्त्री सत्ताक भुमिका करत आहे. तेव्हा मला  वाटायचे की अश्याप्रकारचे चित्रपट चालणार नाहीत. मी केलेल्या चित्रपटांपैकी, काही चित्रपट खुप चाललेत, काही कमी चाललेत तर काही अजीबात चालले नाहीत. मी मात्र चित्रपट स्विकारताना कसलाच विचार करत नाही. माझा चित्रपटसृष्ट्तील प्रवेशच मुळी वयाच्या पंचवीशी नंतर झाला. जेव्हा अनेक अभिनेत्री रीटायर्ड होतात,काहींची लग्न होतात. आपण आपल्या आसपास पाहिले तर दिसुन येईल की, लग्न झालेल्या कोणाचेही जिवन थांबले नाही. आता तसच काहीसं चित्रपटसृष्ट्रीबद्दल घडू लागले आहे. मला वाटतं, जो पर्यत तुम्हाला, एक व्यक्ती, एक स्त्री म्हणून तुमच्यामध्ये रस असेल, आत्मविश्वास असेल तरच तुम्ही समोरच्या माणसाला तुमच्या कलाकृतीने बांधून ठेवू शकता असे मला वाटते.  मला आयुष्यभर अभिनय करायचा आहे, त्यामुळे जी भुमिका माझ्या  हदयायाल भिडेल तिच मी स्विकारेन. आणि मला खात्री आहे, त्या भुमिका प्रेक्षकांना खिऴवुन ठेवण्यात पण यशस्वी ठरतील. 
मला लोकं सांगत होतीत की, माझे अनेक चित्रपट चालले आहेत. आणि ते माझ्या एकटिच्या जोरावर चालले आहेत, हे हि ते सांगतात. मग मला ही माझ्या हातामध्ये अंबुजा सिमेन्टीची पॉवर आली आहे असे वाटु लागले. आणि त्यानंतर मात्र माझे काही चित्रपट लागोलाग आदळलेत असे देखिल होऊ शकते. 

अनेक अभिनेत्रीबद्दल अऩेकदा मोठमोठी गॉसीप आणि कॉन्ट्रोव्हसी  ऐैकू येतात. पण तुझ्याबद्दल तसं कधी ऐैकू नाही आलं. या सगळ्यापासुन तु कशी काय लांब राहीलीस ?

लग्नापुर्वी काही लगानसहान गोष्टी माझ्याबद्दलही चर्चेत येत होत्यात. मात्र लग्न झाल्यावर सगळच थांबलं. सेटवर मी पुर्वीपण मजा करायची, आणि आता देखिल मजा करते. अक्षय मला नेहमी सांगतो, तु मुलासारखी वागतेस . मी पण स्वताला काही छुईमुई समजत नाही. म्हणून कादाचित गॉसिप माझ्यापसून लांब राहीले असावे .

वेब फिल्म या नविन प्लॅटफॉर्मवर तुला काम करताना पाहता येणार काय ?

दोन वर्षापुर्वी मी ऐका पुस्तकाचे हक्क विकत घेतले आहेत ते वेब सिरीजसाठीच. अजुनही त्यावर काम सुरु आहे. पुढचे अजुन ठरायचे आहे.


-हर्षदा वेदपाठक



No comments:

Post a Comment