Tuesday, 16 May 2017

REVIEW – Meri Pyaari Bindu


परिक्षण – मेरी प्यारी बिंदु


 - Harshada Vedpathak


अक्षय रॉय दिग्दर्शित मेरी प्यारी बिंदु या चित्रपटात, प्रत्येक प्रेम परिपुर्ण होत नाही त्याचे चित्रण पहायला मिळते. बिंदु हि ह्ल्लीच्या पिढीचे प्रातिनिधीत्व करणारी मुलगी आहे, जी कोणत्याही गोष्टीची सुरवात करुन त्याला मुर्त रुप देण्यावर विश्वास ठेवत नाही. तर तिचा बालमीत्र अभी, अगदी तिच्या विरुध्द स्वभावाचा आहे. अभीचे बिंदुवर प्रेम आहे परंतु बिंदुला आयुष्यात कश्याचीच खात्री नसते, प्रेमाचाही त्यास अपवाद नाही. त्यामुळे त्यांची प्रेमकहाणी अपुर्ण राहते ते दिसुन येते.



लेखक सुप्रतीम सेनगुप्ता आणि दिग्दर्शक अक्षय रॉय यांचा हा पहिलाच चित्रपट आहे. शेवट गोड शेवट नसलेल्या या चित्रपटाची कथा वास्तवात प्रत्येकाच्या जवळपास घडणारी आहे. मात्र त्यास पटकथेमध्ये बसवताना, दिग्दर्शक राय यांच्या हातुन मेरी प्यारी बिंदु हा चित्रपट निसटल्याचे दिसुन येते. एक मुलगा मुलीवर प्रेम करतो. मग ती मुलगी जेव्हा त्याला दुसरयांदा लग्नासाठी विचारते तेव्हा तो तीला का नाही समजुन घेत. हा प्रश्न चित्रपटभर पडत राहतो. तर आपल्या बालमित्रा बरोबरील साखरपुढा तोडुन, बिंदु दुसरया शहरात जाऊन अनोळखी व्यक्तबरोबर का लग्न करते या मुद्यांना चित्रपटभर फाटा दिला आहे. जुनी गाणी घालुन त्याबरोबर बिदुचे कथानक पुढे रेटण्याचा प्रयत्न चित्रपट होताना दिसतो. मात्र ती गाणी कथानकाला पुढे नेण्यात यशस्वी ठरत नाहीत हि चित्रपटाची उणी बाजु आहे.



कालाकरांत, मेरी प्यारी बिंदु हि चित्रपट स्रीविषयक जरी असला तरी त्यात क्षा राहतो तो आयुष्यमान खुराना. प्रेमात पडलेल्या मित्राची भुमिका ते समजुतदार मित्राच्या भुमिकेत तो आपली छाप सोडुन जातो. परिणीती, बिंदुला न्याय देताना दिसते मात्र मनावर ठसा उमटवण्यास अपयशी ठरते. इतर सहकलाकार, मेरी प्यारी बिंदु या चित्रपटात आपल्या भुमिका चपखलपणे वठवताना दिसतात.



कमकुवत पटकथा, बोथट संकलन या तांत्रित बाजु वजा करता, मेरी प्यारी बिंदु या चित्रपटाचे संगीत श्रवणीय आहे. मात्र बॉक्स ऑफीसवर प्रेक्षकांना रुंजी घालण्यास अपयशी ठरेल असं दिसतय.


No comments:

Post a Comment