चकचकीत दिसणारया सिनेमासाठी भरपुर मेहनत घ्यावी लागते - परीणीती चोपडा
-
हर्षदा
वेदपाठक
अनेकांच्या आयुष्यात प्रेमाला सफलता मिळतेच असं नाही. त्या आठवणींना कसं
बांधता येईल यावर मेरी प्यारी बिंदु हा चित्रपट आधारीत आहे. या चित्रपटात परिणीती
चोपडा प्रमुख भुमिकेत आहे. त्याबद्दल तिच्याबरोबर केलेली बातचित....
तू या सिनेमाच्या
निमित्ताने एक गायिका म्हणूनही समोर येत आहेस ? अचानक गाण्याकडे कशी वळलीस?
माना के हम यार
नही...हे गाण मला प्रचंड आवडते. बऱ्याच काळापासून मी ते गाणं गात आहे आणि मीच त्यासाठी
आवाज द्यावा, असे मला वाटले आणि लोकांनाही ते आवडेल, असे मला वाटते.
प्रियांकाला हे गाणे ऐकवलेस
का?
हो नक्कीच... ते प्रदर्शित
होण्यापूर्वीच मी तिला ते ऐकायला लावले. त्यावेळी ती अमेरिकेत होती. आणि तिला ते गाणे
खूप आवडले होते, माझा अभिमान वाटत असल्याचे तिने मला सांगीतले.
या सिनेमात तू साकारात असलेल्या बिंदू या व्यक्तिरेखेबद्दल काय सांगशील?
बिंदू ही एक करारी आणि
उत्साही मुलगी आहे, पण ती बेजबाबदार आहे आणि ती हातात घेतलेल्या गोष्टी आणि योजना
अर्ध्यावरच सोडून देते. तिच्या डोक्यात काहीच योजना नसतात. आजच्या पिढीमध्ये खूपच
एकाग्रता दिसून येते आणि ते सतत आपले लक्ष्य साध्य करण्याच्या प्रयत्नात असतात. तिलादेखील
तिची स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि तिच्यापद्धतीने काही गोष्टी करायच्या आहेत.
सिनेमाबद्दल आणखी काय सांगशील?
मला
वाटते, अशा प्रकारचा सिनेमा लोकांनी यापूर्वी पाहिला नसेल. आपल्या आयुष्यातील
प्रत्येक अध्याय हा काही गाण्यांशी जोडलेला असतो. हा चित्रपट वेगळा आहे. यातील
गाणी आपल्याला खूप आवडतील आणि या चित्रपटाचे कथानकही काहीसे नविन आहे. त्या मध्ये एकत्र
लहानाचे मोठे झालेल्या मुलांची गोष्ट आहे.
तू तुझ्यावर होणाऱ्या टीकेकडे कशी पहातेस?
ते, ती टीका कशाबद्दल आहे,
त्यावर अवंलबून आहे. जेंव्हा मी एखादा चूकीचा निर्णय घेतला आहे, हे मला माहित
असते, तेंव्हा मी अशा टीकेसाठी तयार असते. मी तशी वास्तववादी आहे आणि साधारणपणे टीका
कधी होणार ते देखिल मला ठावुक असते आणि त्यामुळे मी त्याला तोंड दयायला सज्ज असते.
तशी टीका झाली तरीही मी ती विसरुन दुसऱ्या दिवशी पुन्हा कामावर हजर होते आणि पुन्हा
एकदा शून्यातून सुरुवात करते.
अभिनेत्यांनी काही ठराविक विषयांवर आपले मत व्यक्त करु नये, असे तुला वाटते का?
आम्ही जे बोललो आहे तेच
शब्दशः जर तुम्ही छापाल याची खात्री असेल तर ते ठिक आहे. पण दहापैकी नऊ वेळा तसे होत
नाही. काही वेळा मला काही गोष्टींबद्दल काहीच माहिती नसते. त्यामुळे अशा वेळी आपण
काय करतोय आणि काय बोलतोय, याविषयी मनात भीती असते. हल्लीच माझ्या एका मित्राला
भेटायला जाताना, मी पायात स्लिपर्स घातल्या होत्या. त्याची सुद्धा बातमी झाली. त्यामुळे
आम्हाला काळजी घ्यावी लागते. आम्हाला रोल मॉडेल बनायचे असते, पण काही वेळा काही
घडामोडींची आम्हाला माहिती नसते. आमचे आयुष्य अतिशय धकाधकीचे असते. कधी आम्ही
संपर्कक्षेत्राच्या बाहेर असतो किंवा विमान प्रवासात असतो किंवा परदेशात चित्रिकरण
करत असतो आणि त्यामुळे आजुबाजूला काय सुरु आहे, ते माहित करुन घ्यायला आम्हाला
वेळच मिळत नाही. काही वेळा तर तीन ते चार तास मला फोनकडे सुद्धा बघायला वेळ नसतो. जेवढे
शक्य आहे तेवढया प्रमाणात मी अद्ययावत रहाण्याच्या प्रयत्न करते. सिनेमा हा आमचा
व्यवसाय आहे आणि या एकाच गोष्टीचे आम्हाला वेड आहे. माझी ही आवड तुम्हाला कदाचित आवडणारही
नाही.
तु खुप सडपातळ झालीस. सडपातळ राहण्याच्या दबावाखाली तुझ्यामध्ये हे परिवर्तन घडले काय?
पन्नास टक्के ते खरे आहे
आणि पन्नास टक्के माझ्या आरोग्याशी संबंधित भागही त्यात समाविष्ट आहे. त्यासाठी
मला काही वेळ हवा होता. हा माझा संघर्ष गेली बारा वर्षे सुरु आहे. जर मला चांगले
कपडे घालण्याची इच्छा असती, तर मी माझे वजन कधीही कमी करु शकले असते. पण माझ्या
आरोग्याशी संबंधित काही प्रश्न होते, ज्यांची काळजी घेणे अधिक गरजेचे होते. मी
सुदैवी आहे की चित्रपटसृष्टीने मला माझ्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी तो दबाव आणला. माझी तब्येत खराब होत होती आणि मला वजन कमी
करण्याची गरज होती. मी चार तास काम करुनच दमून जायची. पण आता मी जास्त वेळ
चित्रिकरण करु शकते.
एखाद्या सिनेमाला नकार देणे कितपत सोपे असते?
कुठल्याही सिनेमाला नकार
देणे खूपच कठीण असते. निर्माता दिग्दर्शक सगळ्या गोष्टी कागदोपत्री मांडतात आणि
जेंव्हा तुम्ही नाही म्हणता, तेंव्हा ते दुखावले जातात. पण आता आम्ही जर काही
कारणांसाठीच चित्रपट नाकारला तर आजकालचे दिग्दर्शक समजून घेतात.
हॉलीवूडला जाण्याची काही योजना आहे का?
आताच हॉलीवूडला हो म्हणणे
खूपच लवकर ठरेल. मी अजूनही निरनिराळे प्रयोग करुन पहात आहे. अजूनही मला एखादा
ऍक्शनपट, नाट्यमय सिनेमा किंवा खेळावर आधारीत सिनेमा करण्याची इच्छा आहे. माझी विनोदपटाची
इच्छा मी गोलमालमध्ये काम करुन पुर्ण करत आहे.
सिनेमाव्यतिरिक्त काय करतेस?
माझे माझ्या कामावर खूप
प्रेम आहे आणि त्यामुळे सध्या तरी माझे सगळे लक्ष त्यावरच केंद्रीत झाले आहे. मला
पुरेशी झोपही मिळत नाही, पण तरीदेखील मला या कामावर कष्ट घ्यायला आवडते. खरे तर,
मला एखादी सुट्टी घेऊन विश्रांती घेणे गरजेचे आहे. त्याचबरोबर मला माझ्या कुटुंबाबरोबर
वेळ घालवायचा आहे. एकूणच काम आणि घरगुती आयुष्यात संतुलन साधण्याचा माझा प्रयत्न
आहे. माझ्यासाठी खरे तर माझे काम हेच सर्वस्व आहे, पण हे कधी तरी संपणार आहे. मला
आताच त्या गोष्टीची जाणीव झाली आहे. त्यामुळेच मी माझ्या छंदांकडे अधिक लक्ष देणार
आहे. जसे की स्कुबा डायव्हिंग... त्याचबरोबर सुट्टी घेऊन प्रवास करणार आहे आणि
भरपूर वाचनही....
तरुण पिढीला तू काय संदेश देशील?
माझ्या कामातून शिकलेला महत्वाचा
धडा मी त्यांना आवर्जून सांगेन. सिनेमामध्ये सगळे काही सहजसोपे, चकचकीत आणि आनंदी
दिसत असते. तिथे सगळे चांगलेचांगले घडते. पण त्यामागे प्रचंड मेहनत असते. त्याचा
परिणाम तुमच्या शरीरावरही होतो. आम्हाला खूप प्रवास करावा लागतो, प्रचंड कष्ट
घ्यावे लागतात. तरुणांनीसुद्धा अशा प्रकारच्या कष्टांची तयारी ठेवायला हवी.
सेटवर तुम्हा सहकालाकारांमध्ये कशा प्रकारचे वातावरण असते?
आमच्यामध्ये कोणतीही
नकारात्मकाता नसते. आम्ही सगळेच आमची सर्वोत्तमता देण्याचा प्रयत्न करतो. आम्ही तरुण
असल्याने सकारत्मकता ठेवूनच काम करण्याची इच्छा असते.
प्रियांकाबरोबर काम करण्याचा विचार आहे का?
जर चांगली पटकथा आली, तर
मला त्याचा भाग बनायला खूप आवडेल. मला नक्कीच माझ्या बहिणीबरोबर काम करायचे आहे.
ती एक जबरदस्त अभिनेत्री आहे आणि जर तशी चांगली पटकथा मिळाली तर आम्ही नक्कीच
एकत्रीत काम करु.
पापाराझीबद्दल काय सांगशील?
पापाराझीची संख्या खुपच
वाढली आहे आणि त्यामुळे आम्हाला पुरेसे स्वातंत्र्यच मिळत नाही. कधीतरी आम्हालाही
आमच्या मनाप्रमाणे वागावेसे वाटते हे त्यांनी ध्यानात घ्यायला हवे.
अजय देवगणबरोबर काम करण्याचा अनुभव कसा आहे?
अजयबरोबर काम
करताना खूप मजा येत आहे.
उन्हाळा सुरु आहे. तुझ्या आरोग्यासाठी तु काय करत आहेस?
जेंव्हा वेळ
मिळतो तेंव्हा व्यायाम करते आणि सकस जेवण घेते. खास करुन उन्हाळ्यात, भरपूर फळे
खाण्याचा आणि पाणी आणि ज्यूस पिण्याचा माझा प्रयत्न असतो.
No comments:
Post a Comment