स्ट्रार
सिस्टीम कोसळत आहे ते ऐका परिने उत्तम आहे - ह्रतिक रोशन
- हर्षदा वेदपाठक
2016 हे वर्ष ह्रतिक रोशनची
परिक्षा घेणारं राहिलं...बॉक्स ऑफीसवर चित्रपट चालत नसताना....कंगना राणावत प्रकरण
आणि घटस्फोट यामुळे त्याचे वैयक्तीक आयुष्य देखिल वादग्रस्त राहीले...या सगळ्याला
मागे सारत तो काबील या नविन चित्रपटासह तयार आहे....येथे चित्रपट आणि जिवन याबद्दल
त्याच्या बरोबर मारलेल्या गप्पा.....
2016 हे वर्ष तुझ्यासाठी कठीण
गेलं असं म्हणायचे काय...कारण तुझे चित्रपट आणि वैयक्तिक आयुष्य यात अनेक वादळं
उठत राहीलीत ?
अजिबात विसरता येण्यासारखे
वर्ष नव्हते ते...बरच काही शिकता आलं त्या अनुभवातुन इतकच काय ते मी म्हणेन.
परिस्थितीतुन सुलाखुन ऩिघाल्याशिवाय आयुष्य समजत नाही. आयुष्यातला विरोधाभास हा
जिवनाचा शिल्पकार मानला पाहिजे. जेव्हा परिस्थीती किंवा संकट समोर येतात तेव्हा
तुम्ही त्या परिस्थीतीमधुन कसे बाहेर पडायचे हा विचार करता....आणि या विचारामधुनच
तु्म्ही घडता असं मी म्हणेन.
2016च्या तुलनेत 2017 मध्ये
तुला अधिक चित्रपट करताना पाहता येईल काय ?
मला नेहमीच अधिक काम करायाला
आवडते. खरं तर मी दररोज काम करत आहे. आणि चित्रपट तयार करणं हे दररोजचे काम आहे.
मला किती चित्रपटांसाठी विचारणा होते त्यापैकी, किती भुमिका सुयोग्य आहेत, त्यावरच
मी चित्रपट स्विकारणार की नाही ते ठरते. जसं काबीलचं पहा ना...त्या चित्रपटाला दोन
महिन्यामध्ये तयार करता आले असते पण मी तिस दिवसात त्या चित्रपटाचे चित्रीकरण
पुर्ण केलं. त्यासाठी तु्म्हाला असा निर्मीता दिग्दर्शक पाहिजे असतो जो तुमच्याकडुन
काम करवुन घेईल.
काबील या चित्रपटाबद्दल काय सांगशिल ?
खिऴवुन ठेवणारे असे हे कथानक
आहे. आतापर्यत केलेल्या चित्रपटांत काबील हा माझा आवडता चित्रपट आहे. ज्याचे कथानक
हे सुंदर असं एक सुडनाटय आहे. त्यातही जो मनुष्य अंध आहे तो कश्याप्रकारे बदला घेऊ
शकतो ते येथे पाहता येईल.
मागे एका मुलाखती दरम्यान तु
बोलला होतास की, होम प्रोडक्शन असल्यास तुझ्याकडुन लोकांच्या अपेक्षा फार वाढतात ?
काबीलबद्दल बोलायचे तर या
चित्रपटाचे निर्माता माझे वडील असले तरी ते काम करताना मला सहजता यावी यासाठी सर्वतोपरिने
काळजी घेतात. तसेच तयार होणारा चित्रपट सर्वेत्तम तयार व्हावा यासाठी काळजी
घेणारयातले ते ऐक आहेत. जेव्हा माझ्या आजुबाजुचे लोकं त्या चित्रपटासाठी जिव तोडुन
काम करत आहेत हे मी पाहतो तेव्हा मी देखिल प्रेरीत होतो.
वेळेच्या बाबतीत, राकेश रोशन
हे सक्त आहेत असे ऐकले होते...तुम्ही कधी सेटवर उशीरा पाहोचलात असे कधी झाले काय ?
मला देखिल त्याचा फटका बसला
आहे...उशीर झाला की, मला का उशीर झाला हा विचारणारा फोन जरुर येतो.
तु तुझ्या प्रत्येक
भुमिकेसाठी मेहनत घेतोस. मग काबीलमध्ये तु एक विशेष भुमिका करत आहेस तर ती कितपत
कठीण आणि वेगळी वाटली ?
आतापर्यंत केलेल्या
भुमिकांच्या तुलनेत हि भुमिका खुप वेगळी आणि कठीण होती म्हणायला हरकत नाही.
सुरवातीला चित्रपटाचे कथानक इतके तळातले आहे की, मला माझ्यामध्येच त्या भुमिकेचा
तळ शोधावा लागला. मला काही अंध लोकांना भेटावे लागले, काही रिसर्च करावा लागला
खरा. अंध लोकं कसे वागतात, तसे वागण्याची मला प्रक्टीस करावी लागली. तर तो अंध
व्यक्ती गातो कसा, नाचतो कसा, हाणामारी कसा करेल याचा देखिल अभ्यास करावा लागला
म्हणुन मला हा चित्रपट कायम लक्षात राहील. तुम्ही जेव्हा ऐखादी कठीण गोष्ट शिकता तेव्हा
तुम्ही खुप काही शिकता. हा चितपट करताना मी, माझ्याबदद्ल, इतर व्यक्तीमत्वांबद्दल
आणि अंध व्यक्तींबद्दल खुप काही शिकलो. जिवनात अशक्य असे काहीच नाही आणि ते मी या
चित्रपटामधुन शिकलो.
अश्याप्रकारची भुमिका करणे
किंवा चित्रपट स्विकारणे हे तुझ्यासाठी महत्वाचे होते काय कारण बॅंग बॅंग आणि मोहांजोदरो
हे चित्रपट चालले नाहीत. त्यामुळे काबील सारखा चित्रपट
स्विकारणे तुला सेफ वाटले ?
परंतु त्यासाठी मी भरपुर
मेहनत घेतली आहे आणि जिव ओतलाय. आणि जेव्हा तुम्ही तसे वागता तेव्हा त्याचा
तुम्हाला नक्कीच फायदा होतो. माझी मेहनत मला नक्कीच मला फायदा करुन देईल यात वाद
नाही.
तु रईसचे प्रोमो पाहिले असतील
आणि लैला ओ लैला...हे गाण पण ऐकलं असेल..तर काय सांगशिल त्याबदद्ल ?
मी तो ट्रेलर पाहिला आणि गाणं
देखिल ऐकलं आहे...आवडलं मला ते...
काबीलमध्ये तु अंध व्यक्तीची
भुमिका साकारत आहेस. त्या भुमिकेसाठी तु तयारी कश्याप्रकारे केलीस. इतर काही
चित्रपट वगैरे पाहिलेस काय ?
मी फक्त एकच चित्रपट पाहिला
आणि तो म्हणजे सेन्ट ऑफ अ वुमन. अल पचीनो यांच्या अभिनयातुन मला बरच काही शिकायला
मिळाले.
सर्वैच्य न्यायालयाने,
दिव्यांग व्यक्तींना राष्ट्रगीताच्या सम्मानार्थ उभे राहण्यासाठी काही आराखडा दिला
आहे. त्याबद्दल चित्रपटसृष्टीमधुन नाराजी देखिल व्यक्त करण्यात आली आहे. तु काय
सांगशिल ?
जर शक्य असेल तर त्यांनी
देखिल राष्टगीताचा मान राखायला काय हरकत आहे.
अंध व्यक्तीवर चित्रपट
केल्यावर तु त्यांच्यासाठी प्रेरणास्त्रोत राहशील ?
या विषयासाठी मी नेहमीच भावुक
राहीलो आहे. संधी मिळाली तर नक्कीच करेन. मी जेव्हा ऐश्वर्या रायची, नेत्रदान
करण्यासाठीची जाहीरात पाहिली होती तेव्हाच मी नेत्रदान करण्याचे योजले होते.
2016 हे वर्ष हिंदी
चित्रपटसृष्टीला फारसे काही चांगले गेले नाही. बॉक्स ऑफीसवर फार कमी चित्रपटांना
यश आले. खान, कुमार यांच्यानंतर तु शेवटचा असा कलाकार आहे, ज्याकडे स्ट्रार पॉवर
आहे. मात्र हल्लीच्या नविन कलाकारांकडे किंवा दिग्दर्शकाकडे त्याची वनवा दिसुन
येते. काय सांगशिल त्याबद्दल ?
मला
त्याबद्दल काही सांगता येणार नाही. किंवा त्याचे विश्लेषण देखिल करता येणार नाही.
स्ट्रार सिस्टीम कोसळत आहे ते ऐका परिने उत्तम आहे असे म्हणता येईल.
चित्रपटकर्त्यांना नविन कलाकार सापडतील
आणि नविन कलाकारांना संधी सापडेल. आपल्याकडे नविन कलाकारांना काम करण्यासाठी भरपुर
वाव आहे. फक्त चारपाच नावं असणं हे चित्रपटसृष्टीसाठी चांगलं नाही. तेच तुम्ही हॉलीवुडकडे पाहिले तर इतक्या
कलाकारांचे चित्रपट तेथे विकले जातात, की तुम्ही त्यांची नावं मोजुन कंटाळुन जाल.
आपल्याकडे देखिल तसेच व्हायला पाहिजे आणि ते काही वाईट नाही.
पण लहान नावे बॉक्स ऑफीसवर
नफा नाही मिळवु शकत त्याबदद्ल काय सांगशिल ?
त्यावर आपल्याकडे
स्पेशलायझेशन येण्याची गरज आहे असं मला वाटतं. कलाकारांना देखिल तसं वाटलं पाहिजे
की चित्रपट हा सिरीयस बिझनेस आहे म्हणुन. काही कलाकारांच्या इमेजमुळे, ठराविक
प्रकारचे चित्रपट सर्वदुर पोहोचतात तर काही चित्रपटांचे नुकसान होतय ते मी मानतो.
मग त्यासाठी पडद्यावर चांगले दिसणे, ठराविक साच्यातले संवाद बोलणे हा अभिनय नाही
ना. तर कलाकाराने स्वत काही प्रमाणात वास्तवदर्शी राहणे गरजेचे आहे असं मला वाटतं.
म्हणजेच, तुमची भावनात्मकता लोकांपर्यत जशीच्या तशी पोहोचवणे गरजचे आहे. आणि या
सगळ्यासाठी सिनेमा शिकणे यासह तुम्हाला तुमचे जिवन समजुन येणे फार गरजेचे आहे.
तु आता हॉलीवुडचा विषय काढला
म्हणुन, प्रियांका आणि दिपीका तेथे चांगलं काम करत आहेत. तु त्या दिशेनं काम
करण्यासाठी काही विचार केला आहेस काय ?
कदाचित करेन देखिल.
हॉलीवुडमध्ये काम करण्यासाठी मला काही वावगं वाटत नाहीय. परंतु अजुन देखिल मला तसा
प्लॅटफॉर्म सापडलेला नाहीय. तेथुन मला अनेक स्क्रीप्ट पाठवल्या गेल्या आहेत. परंतु
त्यात निवड करण्यासाठी खास असे काहीच नाही. देशी किंवा विदेशी चित्रपट असोत मी
कधीच भुमिकांचा विचार केलेला नाहीय, तर मला विचारण्यात आलेल्या भुमिकांनी मला चकीत
केलं आणि मी ते चित्रपट निवडलेत. मी माझ्यासाठी ठराविक पातळीवर विचार करण्यापुर्वी
दिग्दर्शक माझ्याही पुढे जाऊन विचार करतात ते मला आवडते.
काही वर्षापुर्वी दिलेल्या
मुलाखती दरम्यान तु म्हणाला होतास की, क्रीशमधिल रोहीतप्रमाणे तुला बाहेर जाऊन
ऑटोग्राफ दयायला आवडेल. आता अनेक वर्षानंतर तुला असे वाटते की, मॅच्युरीटीने अभिनयात
वास्तववाद आणता येतो ?
होय नक्कीच. मॅच्युरीटी,
अवेअरनेस तसेच तुमच्या कलेने तुम्ही लोकांना आनंद देऊ शकता. त्यातही स्वताचा आवाका
माहित असणे. आत्मविश्वास या महत्वाच्या गोष्टी आहेत. यासह तुम्ही जेव्हा अभिनय
करता तेव्हा तुम्ही कॉन्शयश होत नाहीत. तुम्हाला एका दृष्यामध्ये जर प्रेक्षकांना
इम्प्रेस करायचे असेल तर तुम्ही त्यात नवसर ओतता. परंतु तुम्ही जी भुमिका रंगवत
आहात त्याला तश्या ट्रीटमेन्टची गरज आहे काय, ते समजावुन घेणे गरजेचं आहे. यामुळे
एखादया भुमिकेत घुसणे आणि एखादया विचारासह भुमिका तयार करणे या दोन्ही गोष्टी
आत्मसाद करण्याची गरज असते. मला हे सगळं ठावुक आहे असं मी म्हणणार नाही तर मी याच
पध्दतीने काम करतो. आणि दर वेळेला काहीतरी उत्तम देण्याचा प्रयत्न करीत राहतो.
एकाच दिवशी तुझा आणि शाहरुख
खानचा रईस प्रदर्शित होत आहे. तुझे आणि शाहरुखचे फॅन दोन्ही चित्रपटांमध्ये तुलना
करुन भाकीतं वर्तवत आहेत...काय सांगिल त्याबद्दल ?
गंमत आहे त्यामध्ये... तर करु
द्या त्यांना तसे....
यामी
गौतमची निवड कशी काय करण्यात आली ?
त्या
भुमिकेसाठी आम्ही अनेक नविन जुन्या कलाकारांच्या स्क्रीन टेस्ट घेतल्या होत्यात.
मात्र यामीची स्क्रीन टेस्ट ही भुमिकेबरोबर चपखल बसणारी ठरली.
आता
हिंदी फिल्म आणि हॉलीवुड यामध्ये फारसा फरक राहीलेला नाही. तर क्रीश या चित्रपटाला
ऍव्हेन्चर किंवा आणखीन ऐखादया चित्रपटाप्रमाणे पाहता येईल काय ?
माझी
मुलं पण मला असेच प्रश्न विचारतात आणि मी त्यांनी होय हेय उत्तर देतो. आणि त्या
दिशने आशा करायला काय हरकत आहे.
No comments:
Post a Comment