बिग बॉसची जागा कृष्ण दासी घेणार
- हर्षदा वेदपाठक
आतापर्यत टिव्हीवर कधीच न आलेल्या विषयाला कलर्स या वाहीनीने मालिका स्वरुपात
तैय्यार केलय. देवदासी या दुर्लक्षित विषयाला कृष्ण दासी या नावाने पाहता येणार
आहे. दक्षिणेतील याच नावाच्या यशस्वी मालिकेवर कृष्णदासी हि मालिका आधारीत
आहे.
कृष्णदासी या मालिकेत तिन पिढ्यांची तगमग दाखवण्यात येणार आहे. सना शेख आणि छावी
मित्तल यांची प्रमुख भुमिका असलेल्या या मालिकेत, गायिका-नृत्यांगना आणि अभिनेत्री
असलेल्या छावीने, काही वर्षाच्या विश्रामानंतर पुनरागमन केलं आहे. त्यामागे
विषयाच्या नाविन्याने तिला होकार दयायाला भाग पाडले हे कारण ती देते. उत्तम गायिका
असलेली छावी येत्या काही दिवसामध्ये आपला संगीत अलबम करणार असल्याची बातमी कृष्णदासी
या मालिकेच्या पत्रकार परिषदेत गप्पा मारताना देते.
अनेक चित्रपट आणि मालिंकामध्ये दिसणारी सना तशी बिझी अभिनेत्रींमध्ये येते. पण
पहिल्यांदा देवदासी हि परंपरा आणि त्यांच्याबद्दलचे समाजातील समजगैरसमज लोकांपर्यत
पोहोचवण्यासाठी कृष्णदासी हि मालिका मोलाची कारगीरी बजावेल हे मत सना मांडते.
टिव्हीसाठी बोल्ड असलेल्या कृष्णदासी या विषयामध्ये काम करताना तिला बरयाच
प्रमाणात धोका वाटत असल्याचेही ती कबुल करते. त्यातही देवदासीची आधुनिक पिढी
रंगवण्यासाठी तिने दाक्षिणात्य मालिका पाहीली नसल्याचा खुलासा ती करते. त्यामागे
आपल्या भुमिकेतील नाविन्यता टिकवणे हा विचार असल्याचं ती सांगते. चित्रपट आणि
मालिकां यामध्ये तोल संभाळताना, आपण चित्रपटासाठी काम मागायला जात नाही. ज्या
कामासाठी समोरुन विचारणा होते तेच काम करत असल्याचा खुलासा सना, चित्रपट आणि
मालिकांमधिल तोल यावर उत्तर देताना सांगते. अभिनेत्री म्हणुन टिव्ही या माध्यमात
खुश असल्याचं सांगायला ती पुढे विसरत नाही. मागल्या आठवड्यात लग्नाच्या बेडीत
अडकलेली सना, हनीमुनसाठी वेळ नाही हे दिलखुलासपणे सांगते. फावल्या वेळेत रेडीयो
जॉकी असलेली सना, गायक सोनु निगम याला आपल्या आयुष्यातील फादर फिगर मानते.
त्यामुळे सोनु निगमच्या प्रत्येक गायन कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सना करताना दिसत
नसल्यास नवल.
या महिन्याच्या चोवीस तारखेला बिग बॉस सिजन 9 ची सांगता होत आहे, त्याच जागेवर
एक तासाच्या कृष्णदासीला चांगला प्रतीसाद मिळेल अशी निर्माता विपुल शहा यांना खात्री
आहे हे ते सांगतात.
No comments:
Post a Comment