Wednesday, 6 January 2016

गुरु या चित्रपटातील फिल्मी फिल्मी या गाण्याचे स्टाईलिश प्रदर्शन ……

                                           गुरु या चित्रपटातील फिल्मी फिल्मी या गाण्याचे स्टाईलिश प्रदर्शन ……  
- हर्षदा वेदपाठक 



गुरू काऊन डाउन सुरु… वाटेला नाय जायचं आपला विषय खोल आहे… अशी तुफान डायलॉग बाजी करणारा गुरु हा सिनेमा २२ जानेवारी रोजी प्रदर्शित होतोय.  एंटरटेनमेंटचं कमप्लीट पॅकेज असलेला डॅशिंग गुरु प्रेक्षकांचं निखळ मनोरंजन करेल यात शंका नाही. एका मागोमाग एक सुपरहिट सिनेमे देणारा आणि महाराष्ट्राचा लाडका सुपरहिरो अंकुश चौधरी या सिनेमातून आपल्याला झकास लुकमध्ये दिसणार आहे  त्याचा हाच बेस्ट लूक आणि त्याची सिनेमातील भूमिका प्रेक्षक आणखी पसंत करतील. नुकतंच दादर येथील प्लाझा थिएटरमध्ये 'गुरू' सिनेमातील 'फिल्मी फिल्मी'…हे गाणं अंकुशच्या चाहत्यांच्या उपस्थितीत एकदम गुरु स्टाईलने लाँच करण्यात आलं. या गाण्यासोबतच मँगोडॉली आणि गुरू या दोघांचा सिनेमातील लूक सांगणाऱ्या पोस्टरचं ढोल ताशांच्या गजरात अनावरणही करण्यात आलं. उर्मिला आणि अंकुश या दोघांनी या २० फुटाचं असलेल्या या पोस्टरचं क्रेनच्या मदतीने रीव्हील केलं. 


No comments:

Post a Comment