Thursday, 26 September 2019

Mohan Singh is no more


मोहन सिंग तू दुर्दैवी होतास !

५० वर्षे चित्रपट वितरणाच्या क्षेत्रात काम करून अतिशय सर्वसामान्य मृत्यू तुझ्या वाट्याला आला. आपल्या वयातही जवळपास ५० वर्षांचे अंतर आहे, पण गमतीदार क्षणांमध्ये तुला 'तू' संबोधण्याचा जो मी आनंद घेतला आहे, त्याचे साक्षीदारही आपणच आहोत. तुझ्या कामाचा आलेख बघता तुझ्या अंत्यसंस्काराला हिंदी चित्रपटसृष्टीतील चार दोन जुने कलावंत, निर्माते, वितरक तरी येतील, असे मला कायम वाटायचे. पण व्यावसायिक आणि कौटुंबिक पातळीवर तुझ्या वाट्याला आलेले दुर्दैव, या वैभवाची प्रचिती देणार नाही, याची जाणीव तुला होती. आणि काल तेच झाले.

अमिताभ बच्चन यांना नागपूरच्या सीताबर्डीची ओळख करून देणारा आणि रेल्वेच्या टीसीला "हरिवंशराय बच्चन का लडका है, कल स्टार बनेगा. ख्याल रखना", असे सांगणारा तूच तो मोहनसिंग अरोरा. दारासिंग नागपुरात आले की हॉटेलमधून थिएटरच्या मॅनेजरला फोन करून सांगायचे "सरदार को जरूर भेजना". मग तुम्ही सोबत जेवायला जायचे. देव आनंद नागपुरात येण्यापूर्वी विजय आनंद तुला फोन करून सांगायचे "देव आ रहा है, उसका सब इंतजाम करना" आणि मग तू देव आनंदचा नागपूरचा "गाईड" व्हायचास. प्रेम चोप्रा "टाईम्स अॉफ इंडिया"साठी वितरण वसुली एजंट म्हणून काम करायचे, तेव्हा नागपूर, गोंदिया आणि अमरावतीला वसुलीसाठी यायचे, हे तूच ठामपणे सांगितले होते. खुद्द प्रेम चोप्रांनी ते कबुल केले. धर्मेंद्र, जितेंद्र, बलराज साहनी, बडजात्या कुटुंब, खय्याम अशी कितीतरी नावे घेता येतील, ज्यांचा केवळ चित्रपटाच्या प्रमोशनपुरता तुझा संबंध नव्हता, तर त्याही पलीकडे ऋणानुबंध होते. तुला स्वतःचे मार्केटिंग करता आले असते तर तू यांच्यातील अनेकांशी अखेरच्या क्षणापर्यंत संपर्कात राहिला असता. पण, फकिरी वाट्याला आली आणि ती तू आनंदाने स्वीकारली. झोपडीत राहून कोण पुसणार होते तुझ्या वैभवाला? तरीही तत्कालिन सांस्कृतिक कार्यमंत्री संजय देवतळे यांनी घेतली होती तुझी दखल. राज्य शासनाच्या चित्रपट महोत्सवात जितेंद्रच्या हस्ते तुझा सत्कार झाला. पंचशील टॉकीजमधील तो क्षण मी आयुष्यभर विसरणार नाही. पत्रकार म्हणून डोळ्यात पाणी येण्याचे क्षण जवळपास नाहीच येत वाट्याला. पण, त्या दिवशी आले. सत्कारासाठी तुझा पंचशीलच्या स्टेजवर आमंत्रित केले तेव्हा अंधारात जितेंद्रचे लक्ष गेले नाही. आणि जसा तू पायऱ्या चढून वर आला तसे जितेंद्र जागेवरून उठले आणि "सरदार?” हा एकच प्रश्नांकित शब्द त्यांनी उच्चारला आणि तुला कडाडून मिठी मारली. हा प्रसंग लिहीतानाही कंठ दाटून येतो सरदार. कुण्या मोठ्या नटाचे निधन झाले की मी तुला फोन करायचो आणि तू कोरिओग्राफर, सिनेमॅटोग्राफर पासून मेक-अपमन पर्यंत प्रत्येकाची नावे सांगायचा. तुला आज खरं सांगतो... तू अशी डिटेल माहिती दिली, की मी अॉफिसला येऊन गुगलवरून त्याची खात्री करून घ्यायचो. माझा तुझ्यावर विश्वास होता, तरीही. प्राण यांच्या एका नातेवाईकाचे धरमपेठमध्ये चपलेचे दुकान होते, अमजद खान यांच्या आईचे निधन झाल्यामुळे राजेश खन्ना यांच्या चित्रपटाचे नागपुरातील चित्रीकरण रद्द झाले... हे सारे तूच सांगायचास आणि तेही ठामपणे. देशभरात फ्लॉप गेलेले चित्रपट दिग्गज निर्मात्यांनी नागपुरात वाजवून घेतले आहेत, ते तुझ्या प्रमोशनच्या स्टाईलमुळे. आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन चित्रपटांचे प्रमोशन होते, तू पूर्वी स्वतःच सायकलने सर्व वर्तमानपत्रांच्या कार्यालयांमध्ये जाऊन पत्रकार परिषदेचे निमंत्रण द्यायचास. पत्रकारितेच्या क्षेत्रातील लक्ष्मणराव जोशी सर (Laxman Joshi), विजय पणशीकर सर, प्रकाश दुबे सर यांची नावे कायम तुझ्या ओठावर असायची. छायाचित्रकार शेखर सोनी यांच्याबाबत तू सतत विचारायचास. एकदा पंचशील सिनेमागृहाच्या बाहेर तू माझा हात घट्ट पकडला आणि "बीस रुपये है क्या?” असे विचारले. मी 30 रुपये दिले, तर तू त्यातील दहा परत केले. मला गंमत वाटली. वाटलं काही काम असेल आणि सुटे नसतील. पण, दुसऱ्या दिवशी कळले की तुझ्याकडे खरच पैसे नव्हते आणि लुनामध्ये पेट्रोल टाकण्यासाठी तुला हवे होते. नंतर काही दिवसांनी कळले, की तू एका मॅगझीनला चित्रपटांचा किती व्यवसाय झाला, याचे रिपोर्टींग करतो आणि तुला दर सहा महिन्यांनी त्याचे मानधन मिळते. तेव्हाही तू एेंशीच्या घरात होतास. पण एका संस्थेला पुरस्कारासाठी तुझे नाव सुचवले तेव्हा "कॅश नही होना, बहुत कमा लिया" असे आयोजकाला सांगणारा मोहनसिंग मी बघितला आहे. "झुंड"च्या शुटींगसाठी अमिताभ नागपुरात होते, तेव्हाही तुला म्हटले होते भेटण्याबाबत. पण, तू म्हणाला "भिड में नही जा सकता मै". अनेक प्रसंगांचा उल्लेख करता येईल. डॉ. विलास चिंतामण देशपांडे आणि डॉ. सुनिती देव (Suniti Deo) यांनी एकदा मला या अनुभवाचे काय करायचे हे सांगितले होते. त्यालाही पाच वर्षे झाली. तू जिवंत असताना ते झाले असते, तर आनंद झाला असता. तुझे मेहाडिया चौकातील कार्यालय, पंचशीलचे व्यवस्थापक राजा लहेरिया यांच्यामुळे झालेली आपली भेट, त्याठिकाणी महेश (Mahesh Tickley Photojournalist) आणि मी केलेले एक शुटींग, तुझ्या मुलीचे आणि त्या पाठोपाठ बहिणीचे निधन... वगैरे वगैरे. तुझ्या झोपडीच्या छतातून सतत कचरा पडायचा आणि तरीही ताईने बनवलेले पराठे मी व महेश त्या धुळीसकट आनंदाने खात होतो. खूप आहे रे माझ्याकडे. पण, "मेल्यावर माणसाची किंमत होते" हा नियम मोडायचा नसतो. तुझी-माझी शेवटची भेट किती ह्रदय पिळवटून टाकणारी होती, याचा संदीप (Sandeep Soni) सोनी साक्षीदार आहे. त्या भेटीचे वर्णन लिहीताना माझी बोटं अडखळत आहेत. त्यासाठी वेगळे निमित्त शोधेन. तुर्तास एवढेच.

श्रद्धांजली वाहणार नाही... मी तुला जिवंत ठेवणार आहे !

तुझा,

नितीन

(Not original, copied from WhatsApp)

Tuesday, 24 September 2019

राईट टू सर्व्हिस अॅक्ट म्हणजेच सेवा हमी कायदा महाराष्ट्रात लागू

राईट टू सर्व्हिस अॅक्ट म्हणजेच सेवा हमी कायदा महाराष्ट्रात लागू


महाराष्ट्रात आजपासून 'राईट टू सर्व्हिस अॅक्ट' म्हणजेच सेवा हमी कायदा लागू झालाय. यामुळे, आता तुम्हाला जन्म दाखला, लग्नाचा दाखला, लायसन्स अशा तब्बल 43  सरकारी सेवा मिळवण्यासाठी सरकारी कार्यालयांचे उंबरठे झिजवण्याची गरज लागणार नाही.
तब्बल 43 सरकारी सेवा तुम्हाला आता घरबसल्या एका क्लिकवर मिळू शकणार आहेत. यासाठी तुम्हाला सरकारी वेबसाईटवर अप्लाय करावा लागेल... आणि ठराविक कालावधीत तुम्हाला हवे असलेल्या सेवा मिळू शकतील.

महाराष्ट्र सरकारची वेबसाईट

www.aaplesarkar.maharashtra.gov.in

वर ऑनलाईन अप्लाय तुम्हाला करावं लागेल... निर्धारित कालावधीत सरकारी अधिकाऱ्यांना या सेवा नागरिकांना द्याव्या लागणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्राचे हाऊसिंग राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी दिलीय.

या विभागांच्या सेवांचा आहे समावेश...
महसूल विभाग, नोंदणी व मुद्रांक विभाग, ग्रामविकास व पंचायत राज विभाग, कामगार विभाग, जलसंपदा विभाग, शासन मुद्रण लेखनसामग्री व प्रकाशन संचालनालय, कौशल्य विकास आणि उद्योजकता विभाग, वन विभाग आणि नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सेवा तुम्हाला आता ऑनलाईन मिळू शकतील.
या सेवांचा आहे समावेश....

• वय राष्ट्रीयत्व आणि अधिवास प्रमाणपत्र
• मिळकतीचे प्रमाणपत्र
• तात्पुरता रहिवास प्रमाणपत्र
• ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र
• पत दाखला
• सांस्कृतिक कार्यक्रम परवाना
• प्रमाणित नक्कल मिळणे बाबत अर्ज
• अल्पभूधारक शेतकरी असल्याचे प्रतिज्ञापत्र
• भूमिहीन प्रमाणपत्र
• शेतकरी असल्याचा दाखला
• सर्वसाधारण प्रतिज्ञापत्र
• डोंगर/ दुर्गम क्षेत्रात राहत असल्याचे प्रमाणपत्र
• जन्म नोंद दाखला
• मृत्यु नोंद दाखला
• विवाह नोंदणी दाखला
• रहिवाशी प्रमाणपत्र
• दारिद्र्य रेषेखालील असल्याचा दाखला
• हयातीचा दाखला
• ग्रामपंचायत येणे बाकी दाखला
• निराधार असल्याचा दाखला
• शौचालयाचा दाखला
• विधवा असल्याचा दाखला
• दुकाने आणि अस्थापना नोंदणी
• दुकाने आणि अस्थापना नुतनीकरण
• कंत्राटी कामगार मुख्य मालक नोंदणी
• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नोंदणी
• कंत्राटी कामगार अनुज्ञप्ती नुतनीकरण
• नोकरी उत्सुक उमेदवारांची नोंदणी
• सेवानियोजकाची नोंदणी
• शोध उपलब्ध करणे
• मुद्रांक शुल्क भरण्याचे प्रयोजनार्थ मुल्यांकन अहवाल देणे
• दस्त नोंदणी न केलेल्या प्रकरणांमध्ये, ई-पेमेंट पद्धतीने भरलेल्या नोंदणी फीचा परतावा
...तर सरकारी बाबूंना भरावा लागेल दंड
'राईट टू सर्व्हिस अॅक्ट'मध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना दंड लावण्याची तरतूद राज्य शासनानं केलीय. निर्धारित वेळत तुम्हाला सेवा मिळाली नाही तर जबाबदार अधिकाऱ्याला 500 ते 5000 रुपयांपर्यंत दंड बसेल.

सध्या सेवा हमी कायद्यात केवळ 43 सेवांचा समावेश असला तरी येत्या वर्षी मार्चपर्यंत या सेवांचा आकडा 135 वर जाण्याची शक्यता आहे.


Thursday, 19 September 2019

नवीन नाटय निर्मिती अनुदान नियमावलीत बदल


मुंबई, दि. १९ सप्टेंबर : राज्य शासनामार्फत नवीन नाटय निर्मिती करणाऱ्या संस्थांना नाटय प्रयोग सादरीकरणासाठी अनुदान देण्यात येते. या योजनेत यापूर्वी व्यावसायिक व संगीत नाटकांसाठी राज्यातील सहा महसूली विभागात प्रत्येकी दोन प्रयोग सादर करणे आवश्यक होते, आता नवीन नियमानुसार सहा महसूली विभाग ऐवजी चार महसूली विभागात प्रत्येकी दोन प्रयोग सादर करणे आवश्यक आहे, अशी सुधारणा करण्यात आली आहे.
        तसेच प्रायोगिक नाटकांनाही जास्तीत जास्त अनुदान मिळावे यासाठीचे नियम सुद्धा शिथिल करण्यात आले आहेत. प्रायोगिक नाटकांना अनुदान मिळण्यासाठी असणारा जो पहिला १० चा टप्पा होता तो आता कमी करण्यात आला असून पहिल्याच टप्प्यात ५ प्रयोगांचे अनुदान घेता येणार आहे. तसेच पुढील टप्प्यात सहा महसूली विभागात प्रत्येकी एक प्रयोग करण्याची अट आता शिथिल करण्यात आली असून आता फक्त दोन महसूली विभागात प्रत्येकी एक प्रयोग सादर करावयाचा आहे. तसेच नाट्यप्रयोग सादरीकरणासाठी आवश्यक असणारी पोलीस परवानगीची अट रद्द करण्यात आली आहे. नाट्यप्रयोग सादरीकरणाचा यापूर्वी नसलेला कालावधी या नियमावलीत निश्चित करण्यात आला आहे.
        सदरची योजना ही सन २००६ पासून सुरू करण्यात आली आहे. अनेक जुन्या नाटय निर्मात्यांबरोबर नवीन नाटय निर्मातेही या योजनेचा लाभ घेत असतात. परंतु, महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात नाट्यगृह नसल्याने ज्या महसूली विभागातील जिल्ह्यात नाट्यगृह नाहीत, त्या जिल्ह्यात नाट्यप्रयोग करणे शक्य नसल्याने, ही अट शिथिल करण्याची विनंती नाटय निर्मात्यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांना केली. त्याची दखल घेत सदरच्या योजनेतील काही अटी आता शिथिल करण्यात आल्या असून, यामुळे नाटय निर्मात्यांना ज्या जिल्ह्यात सुस्थितीत नाट्यगृह आहे अशा महसूली विभागातील जिल्ह्यात नाट्यप्रयोग करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
      व्यावसायिक निर्मात्यांबरोबर प्रायोगिक रंगकर्मींनाही या योजनेचा लाभ घेता येणार आहे. तसेच यामुळे जास्तीत नाटय नाट्यनिर्मिती होऊन नाटय रसिकांना दर्जेदार नाटकं पाहता येणार आहे.
    नाटय क्षेत्रातील नाटय निर्मात्यांकडून या निर्णयाचे स्वागत करण्यात येत असून सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांचे त्यांनी आभार मानले आहेत.

दलित शब्द हा व्यवहारात असायलाच हवा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले


दलित शब्द हा  व्यवहारात असायलाच हवा - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

मुंबई दि. 19 -  शासकीय नोंदीमध्ये जातीचा उल्लेख करताना दलित हा शब्द यापूर्वीही वापरला जात नव्हता त्यामुळे शासकीय नोंदीमध्ये दलित शब्दाला मनाई ठीक आहे मात्र  व्यवहारात तसेच प्रसार माध्यमांमध्ये  दलित शब्दाला मनाई करता कामा नये. दलित शब्दच शेकडो वर्षांपासून आलेल्या सामाजिक विषमतेच्या वेदनेला नेमकेपणाने प्रकट करतो. त्यामुळेच भारतीय दलित पँथर या संघटनेची आम्ही स्थापना केली होती. माझ्या मते दलित शब्द व्यवहारात असायलाच हवा असे प्रतिपादन  रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले आहे.

महाराष्ट्र शासनाने सरकारी कागदपत्रांतून दलित शब्द वापरण्यास  मनाई करणारा आदेश नुकताच काढला आहे. याबाबत ना.रामदास आठवले यांनी प्रतिक्रिया देताना व्यवहारात दलित शब्द असायलाच हवा अशी भूमिका मांडली आहे. बोलण्यामध्ये भाषणांमध्ये वृत्तपत्र मीडिया माध्यमांमध्ये दलित शब्द वापरण्यास मनाई करणे योग्य ठरणार  नाही. त्यामुळे व्यवहारात दलित शब्द असायलाच हवा सरकारी दस्तऐवजांमध्ये यापूर्वीपासून अनुसूचित जाती हा शब्दप्रयोग केला जात असल्याचे सांगत व्यवहारात  दलित शब्दाला मनाई नसावी असे स्पष्ट मत ना रामदास आठवले यांनी व्यक्त केले आहे.

#RAMDASATHAWAL
#Dalit
#रामदासआठवले
             

Wednesday, 18 September 2019

मुंबई विद्यापीठात कॉल सेंटर सरू होणार


मुबई विद्यापीठाशी संलग्न असलेली महाविद्यालय तसेच विद्यार्थ्यांची वाढती संख्या, प्रवेश, परीक्षा तसेच निकाला दरम्यान विद्यार्थ्यांना भेडसावणार्‍या समस्यांबाबत विद्यार्थ्यांचे तात्काळ निराकरण व्हावे, यासाठी मुंबई विद्यापीठात तात्काळ कॉल सेंटर सुरू करण्यात यावे, असे निर्देश उच्च व तंत्रशिक्षण, गृहनिर्माण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.सुहास पेडणेकर यांना दिले आहेत.

मुंबई विद्यापीठाचा विस्तार सावंतवाडी, रत्नागिरी, रायगड, पनवेल, मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर ते डहाणूपर्यंत आहे. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांची संख्या ही सुमारे ७८० घरात पोहचली आहे. या सर्व महाविद्यालयांमध्ये मिळून शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांची संख्या ही सुमारे ५ लाखांपेक्षा जास्त आहे.  यातील ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांनी दूरवरुन महाविद्यालय गाठावे लागते. परीक्षेचा अर्ज भरताना, निकालावेळी अथवा छोटया छोटया कामांसाठी विद्यार्थ्यांना मुंबई विद्यापीठात अथवा उपकेंद्रात सातत्याने जावे लागते. एक-दोन वेळा जाऊनही विद्यार्थ्यांचे काम होत नाहीत. शहरीबरोबरच ग्रामिण भागांतील विद्यार्थ्यांची ही अडचण लक्षात घेऊनच तसेच बदलत्या काळानुसार शिक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करुन विद्यार्थ्यांची होणारी परवड तसेच पैशाचा पडणार भुर्दंड दूर करण्यासाठी मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयांमध्ये शिकणार्‍या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी अद्ययावत कॉल सेंटर सुरू करावे, असा अतारांकीत प्रश्‍न जुलै २०१९ च्या विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात सदस्यांनी उपस्थित केला होता.

या प्रश्‍नाला उत्तर देताना विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी विद्यापीठाचे मोबाईल ऍप कार्यरत असून अद्ययावत कॉल सेंटर सुरू करण्याबाबत विद्यापीठ स्तरावर कार्यवाही सुरू असल्याचे, छापील उत्तर देण्यात आले. बदलत्या काळानुसार अन्य विद्यापीठांच्या स्पर्धेत आपले विद्यापीठ भविष्यातही कुठेही मागे राहू नये विद्यापीठाचे स्वत:चे कॉल सेंटर असणे ही बाबा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या वेळेची व पैशाची बचत होणार असल्याचे, राज्यमंत्री यांनी पत्रात नमुद केले आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक कामासाठी विद्यापीठातकिंवा उपकेंद्रावर न जाता सर्व आवश्यक माहिती प्राप्त होईल. यासाठी विद्यापीठाने तात्काळ कॉल सेंटर सुरू करावे, असे निर्देश राज्यमंत्री वायकर यांनी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. सुहास पेडणेकर यांनी पत्राद्वारे दिले आहेत. 

Tuesday, 27 August 2019

प्रवीण तरडे अपघातातून बचावले



प्रसिद्ध लेखक दिग्दर्शक अभिनेते, प्रविण विठ्ठल तरडे आणि अभिनेते रमेश परदेशी यांच्या गाडीला मंगळवारी 27 ऑगस्ट रोजी रात्री 11 वाजता सासवड जवळ हिवरे गावात , महादेव मंदिरासमोर अपघात झाला.

त्यांच्यासोबत कार्यकारी निर्माते विशाल चांदणे सुद्धा होते.
सुदैवाने या अपघातात, गाडीतील एअर बॅग्स मुळे कोणालाही इजा झाली नाही. सर्वजण सुखरूप आहेत. सासवड पोलिस घटनास्थळी पोचले आहेत. कृपया अफवांवर विश्वास ठेवू नये. ते सुखरूप पुण्यात पोचले आहेत.

Friday, 23 August 2019

प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच निर्मितीचा शुभारंभ


जानेवारी २०२० पासून प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच सुरु होणार  - विनोद तावडे

प्रायोगिक रंगभूमी होणे ही महाऱाष्ट्राची सांस्कृतिक आवश्यकता आहे, गेली सुमारे १० वर्षे लालफितीमध्ये रखडलेल्या प्रायोगिक रंगभूमीच्या रंगमंचाच्या कामाचा आज शुभारंभ आज झाला असून सर्व नियम व कायद्याचे पालन करुनच येत्या सहा महिन्यात रंगमंचाचे काम पूर्ण होईल आणि येत्या जानेवारी २०२० पासून प्रायोगिक रंगमंच सुरु होईल. राज्य शासन प्रायोगिक रंगभूमीच्या चळवळीच्या पाठीशी खंबीरपणे उभी असून, महाराष्ट्रातील नाट्यचळवळ अधिक जोमाने पुढे नेता येईल, असे सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आज ठामपणे सांगितले.

पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी मध्ये रवींद्र नाट्य मंदिराच्या पाचव्या व सहाव्या मजल्यावरील जागेत प्रायोगिक रंगभूमीसाठी रंगमंच निर्मितीचा शुभारंभ आज सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी अरुणकाका काकडे, अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी, ९९ व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमलेनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी, प्रधान सचिव भूषण गगराणी यांच्यासह नाट्य क्षेत्रातील नामंवत मंडळी उपस्थित होती.

यावेळी  सांस्कृतिक कार्यमंत्री श्री. तावडे यांनी सांगितले की, एखादा प्रकल्प लालफीतीमध्ये अडकतो म्हणजे काय याचे हे अतिशय समर्पक उदाहरण आहे. २००९ पासून ही जागा अशीच पडून होती. याजागेत प्रायोगिक रंगभूमीच्या रंगमंचाची निर्मितीमध्ये अनेक अडथळे येत होते. परंतु गेल्या सुमारे दीड–दोन वर्षात हा प्रकल्प उभारणीचे उद्दीष्ट्य आखण्यात आले. या फाईल वर असलेले अनेक प्रशासकीय तांत्रिक अडथळे दूर करीत व नियम व कायद्याचे पालन करुन प्रायोगिक रंगभूमीच्या रंगमंचाचा प्रकल्प प्रत्यक्षात आणण्याचा संकल्प करण्यात आला. गेली सुमारे १० वर्षे लालफितीत अडकलेला हा प्रकल्प मंजूर करताना अतिशय पारदर्शकता ठेवण्यात आली आहे, असेही तावडे यांनी स्पष्ट केले.

यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत या रंगमंचाबाबत माहिती देताना श्री. तावडे यांनी सांगितले की,  प्रायोगिक रंगभूमीची चळवळ सुरु ठेवणे, ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. प्रायोगिक रंगभूमीला प्राधान्य मिळावे, चांगले कलाकार घडावेत यासाठी प्रयत्न करण्यात येत असून, येथील आसनव्यवस्था रंगमंचाला पूरक अशी करण्यात येणार आहे.

वर्षभरात प्रायोगिक नाट्यसाठी २०० प्रयोग ठेवण्यात येतील. अतिशय नाममात्र दरामध्ये नाट्यसंस्थेला प्रायोगिक रंगभूमी उपलब्ध करुन देण्यात येईल. यामध्ये रंगकर्मींना सर्व पायाभूत सोयी-सुविधा देण्यात येतील.  व्यावसायिक नाट्यक्षेत्रामध्ये यशस्वी होत असताना प्रायोगिक रंगभूमी हा नाटकाचा पाया असतो. त्यामुळे या माध्यमातून प्रायोगिक नाट्यभूमीचा पाया भक्कम होईल. तसेच आजच्या युवा कलाकारांना या नवीन व्यासपीठाच्या मार्फत आपली कला सादर करण्याची अधिक चांगली संधी मिळेल, असेही श्री. तावडे यांनी सांगितले.

राज्य शासन व महापालिकांमार्फत नाट्यगृहांची उभारणी करण्यात येते. त्यानंतर या नाट्यगृहांमध्ये चालणा-या नाट्यप्रयोगाच्या भाड्यामधून नाट्यगृहांची देखभाल व दुरुस्ती करण्यात येईल, अशी सर्वसाधारण व्यवस्था आहे, पण नाट्यगृहच्या देखभाल व दुरुस्तीसाठी राज्य शासन व पालिका यांच्या व्यवस्थेतून पुरेशी गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी राज्य शासन व पालिकांच्या अर्थसंकल्पात तशी तरतूद करण्याच्यादृष्टीने प्रयत्न केले जातील, असेही श्री.तावडे यांनी स्पष्ट केले.

प्रायोगिक रंगभूचीच्या प्रस्तावित रंगमच असा असेल...
१. ३९१ दर्जेदार आसने
२. ‍डिजीटल सिनेमा प्रोजेक्टर
३. आधुनिक तंत्रज्ञानाची युक्त प्रकाशव्यवस्था व ध्वनी व्यवस्था
४. दर्जेदार ध्वनी शोषक (अकौस्टिक्स) प्रणाली
५. सुसज्ज मेकअप रुम
६. डिजिटल सिनेमा प्रोजेक्टरसाठी स्वतंत्र कक्ष
७. सेंटरलाईज्ड वातानुकुलन
८. भव्य स्टेज
९. भव्य स्क्रिन व आधुनिक स्टेज ड्रेपरी
१०.पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, प्रतिक्षालय
११.   २ उद्वाहने
१२.   अग्नीशमन यंत्रणा.

Wednesday, 21 August 2019

Sharad Talwalkar

सुप्रसिद्ध अभिनेते शरद तळवलकर यांची आज पुण्यतिथी....21 ऑगस्ट

शरद गणेश तळवलकर यांचा जन्म १ नोव्हेंबर १९१८ रोजी नगर जिल्ह्यात बोधेगाव येथे झाला. त्यांचे शेळी शिक्षण पुण्याच्या भावे हायस्कुलमध्ये झाला. शाळेत  असताना ते  शिक्षकांच्या नकला  खूप करायचे. १९३५ साली त्यांनी ' रणदुमदुभी ' नाटकात शिशुपालाची भूमिका करणारा कलाकार ऐन वेळी अडला आणि शरद तळवलकरांनी आपल्या अभिजात कलागुणांनी त्या भूमिकेत कमालीचा  रंग भरला. तेव्हापासून दरवर्षी स्नेहसंमेलनच्या नाटकात त्यांना  आग्रह धरला जाऊ लागला. नटश्रेष्ठ केशवराव दाते यांच्या पाहण्यात त्यातली एक भूमिका आली आणि त्यांच्या ' नाट्य विकास ' संस्थेत त्यांनी तळवलकरांना बोलवले. नाटकात काम करणे हे त्याकाळात फारशी  सन्मान्य गोष्ट नव्हती. वडिलांनी त्यांना विरोध केल्यावर शरद तळवलकर यांनी आपले घर सोडले आणि मार्गदर्शन घेण्यासाठी कोल्हापूरला मा. विनायक  यांच्या ' हंस पिक्चर्स ' मध्ये बाबुराव पेंढारकर यांना भेटले. त्यांच्या सल्ल्यानुसार त्यांनी स्वतःचे शिक्षण पूर्ण  करायचे ठरवून अकाउंटंटची नोकरी पत्करली. महाविद्यालयाच्या नाटकातून केलेल्या त्यांच्या भूमिका लोकांना आवडल्या, लोकप्रिय झाल्या. शरद तळवलकर यांनी कलाकार , दिग्दर्शक राजा परांजपे यांना गुरुस्थानी मानले होते.
पुढे शरद तळवलकर व्यावसायीक नाटकांतून  भादव्या , फाल्गुनराव , कामण्णा , तळीराम , धर्यधर अशा भूमिका  करू लागले. १९५२ साली गाजलेल्या ' पेडगावचे शहाणे ' आणि ' लाखाची गोष्ट ' या राजा परांजपे यांच्या चित्रपटात त्यांना छोट्या भूमिका मिळाल्या. त्याचप्रमाणे दत्ता धर्माधिकारी यांच्या  ' अखेर जमलं ' या चित्रपटात लक्षणीय भूमिका मिळाली.
१९५५ साली आलेल्या ' करायला गेलो एक ' या तुफान विनोदी फार्सने शरद तळवलकरांचे नाव महाराष्ट्रभर केले. तेथून त्यांची यशस्वी वाटचाल चालू झाली . अभिनयाच्या वेडापायी त्यांनी पुणे विद्यापीठातील नोकरी सोडली. पुढे राजा गोसावी यांच्याबरोबर केलेले ' अवघाची संसार ' , ' दोन घडीचा डाव '  आणि ' याला जीवन ऐसे नाव ' हे त्यांचे चित्रपट गाजले. १९६२ साली आलेल्या ' रंगल्या रात्री अशा ' या चित्रपटात त्यांना आव्हानात्मक भूमिका मिळाली. ' बायको माहेरी जाते ' या चित्रपटात त्यांची विनोदी भूमिका खूप गाजली. त्यांनी संशयकल्लोळ , लग्नाची बेडी  , अपराध मीच केला , दिवा जळू दे सारी रात , भावबंधन , ह्या नाटकातून  कामे केली तर घरोघरी हीच बोंब , अप्पाजींची सेक्रेटरी अशा नाटकातून इरसाल भूमिकाही केल्या. त्यांचा मी एकच प्याला मधील तळीराम जेव्हा पहिला तेव्हा त्यांचा एक हात वर करून ' थोडीशी घेतो  ' हे सांगण्याचा अभिनय लाजवाब असे. शरद तळवलकर यांचे ' लग्नाची बेडी ' या नाटकातील काम इतके इरसाल होते की सुदैवाने आजही आपण आधुनिक तंत्रज्ञानामुळे ते  बघू शकतो.
शरद तळवलकर यांनी मुबईचा जावई , आली अंगावर , नवरे सगळे गाढव , चांदणे शिंपीत जा , थोरली जाऊ , गडबड घोटाळा यातील विनोदी भूमिका गाजल्या होत्या. ' धुमधडाका ' मधील शरद तळवलकर आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांनी रंगवलेला चित्रपटाची कथा सांगण्याचा सीन कोणीही विसरू शकत नाही. एकटी , लेक चालली सासरला या चित्रपटातील त्यांच्या भूमिका त्यांनी अजरामर केल्या. शरद तळवलकर यांनी १६० हुन अधिक चित्रपटातून कामे केली.
त्यांचे डार्लिग डार्लिग , सखी शेजारणी ह्या नाटकाचे प्रयोग चालूच होते आणि त्यांना आजाराने गाठले. तरी पण त्यांची विनोदबुद्धी शाबूत होती. माझा एक मित्र त्यांना भेटायला गेला तेव्हा तो बिचारा शांतपणे आत गेला , शरद तळवलकर डोळे उघडून त्याला हसून  म्हणाले ' अरे अजून आहे मी ' आणि मग त्याच्याशी त्यांचे बोलणे सुरु झाले. त्यांच्या  तोडून त्यांचे किस्से ऐकणे म्हणजे धमाल होती. एकदा ते एका  मुलाखतीत म्हणाले होते , ' माझे लग्न स्मशानात ठरले  जिथे लोकांचे संसार मोडतात तिथे माझा संसार सुरु झाला.' त्याची कथाही अजब आहे.
शरद तळवलकर यांना  एकटी , मुंबईचा जावई , जावई विकत घेणे आहे , रंगल्या रात्री अशा , धूम धडक , लेक चालली सासरला तू तिथे मी ह्या  चित्रपटासाठी अवॉर्ड्स मिळाली होती.
शरद तळवलकर यांना  स्टेजवर अभिनय करताना पाहणे म्हणजे पर्वणीच असे . त्यांच्या  ' अप्पाजींची सेक्रेटरी ' या नाटकात तर त्यांनी इतकी धमाल केली होती की त्यांनी जे नाटक पाहिले आहे तो ते नाटक कधीच विसरू शकणार नाही. जवळजवळ ६० वर्षे ते अभिनय करत होते.
अशा या चतुरस्त्र अभिनेत्याचे २२ ऑगस्ट २००१ रोजी निधन झाले.

सतीश चाफेकर

लोकमत
(Cop

Ganpat patil



२० ऑगस्ट मराठी रजतपटावरील ज्येष्ठ कलाकार गणपत पाटील यांचा जन्मदिन.
"आत्ता गं बया!" हे इतकेच शब्द गणपत पाटलांची थोरवी सांगण्यास पुरेसे आहेत.तमाशाप्रधान चित्रपट मराठीत अमाप आले. त्यात नाच्याचे काम करणारी बरीच कलाकार मंडळी होऊन गेली. पण "गणपत पाटील" ह्या नावाशी कुणाचीही तुलना होऊच शकत नाही, इतका तो नाच्या त्यांनी आपल्या अभिनयाने जीवंत केला होता. बोलणं,दिसणं आणि नाचणं अशा तिहेरी अंगांनी त्यांचा सहजसुंदर अभिनय नटलेला होता.."झाले बहू, होतिलही बहू,परंतू या सम हा!" फक्त एकच ! गणपत पाटील.
त्यांच्या ‘आत्ता ग़ बया‘ ला दाद दिली नसेल असा मराठी रसिक विरळाच. अंगात मखमली बदाम अन त्यावर हाफ जाकीट, गळ्यात गुंडाळलेला रंगी बेरंगी रुमाल अन डोक्यावर बुट्टेदार टोपी अशा वेशातले गणपत पाटील त्यांच्या नाचाच्या भूमिकेत समरसून जायचे. या भूमिकेने त्याना मानही दिला अन प्रचंड अपमान देखील. त्यांनी साकारलेल्या भूमिकेतल्या पात्राने वास्तवातल्या गणपत पाटलांना मात दिली. खरे तर रसिक प्रेक्षकानी दिलेली ही दाद होती,
गणपत पाटलांचा जन्म २० ऑगस्ट १९२० कोल्हापुरात एका गरीब कुटुंबातला. घरच्या हलाखीच्या परिस्थितीमुळे व पाटलांच्या बालपणीच त्यांचे वडील निवर्तल्यामुळे बालवयापासूनच पाटलांना मोलमजुरी करून, फुले-खाद्यपदार्थ विकून कुटुंबाकरता आर्थिक हातभार लावावा लागला. अशा परिस्थितीतदेखील कोल्हापुरात त्या काळी चालणाऱ्या रामायणाच्या खेळांत ते हौसेने अभिनय करीत. रामायणाच्या त्या खेळांमध्ये त्यांनी बऱ्याचदा सीतेची भूमिका वठवली.
दरम्यान राजा गोसावी यांच्याशी पाटलांची ओळख झाली. त्यांच्या ओळखीतून पाटलांचा मास्टर विनायकांच्या शालिनी सिनेटोनमध्ये प्रफुल्ल पिक्चर्समार्फत चित्रपटसृष्टीत प्रवेश झाला. चित्रपटसृष्टीतील सुरुवातीच्या दिवसांत त्यांनी सुतारकाम, रंगभूषा साहायकाची कामे केली. मास्टर विनायकांच्या निधनानंतर ते मुंबईतून कोल्हापुरास परतले.
त्यासुमारास पाटलांना राजा परांजप्यांच्या ’बलिदान’ व राम गबाल्यांच्या ’वंदे मातरम्‌’ चित्रपटांमध्ये अभिनयाची संधी मिळाली. या भूमिकांमधील त्यांच्या अभिनयामुळे त्यांना त्यांची अभिनय-कारकीर्द फुलवणारी भालजी पेंढारकरांच्या ’मीठभाकर’ चित्रपटातील खलनायकाची भूमिका मिळाली.
चित्रपटांबरोबरीनेच पाटील नाटकांतही अभिनय करीत. जयशंकर दानवे यांच्या ’ऐका हो ऐका’ या ग्रामीण ढंगातील तमाशाप्रधान नाटकात बायकी सोंगाड्याची – म्हणजेच ’नाच्या’ची – आव्हानात्मक भूमिका त्यांनी लीलया पेलली. त्यांच्या अभिनयामुळे ही भूमिका जबरदस्त लोकप्रिय झाली. ’जाळीमंदी पिकली करवंदं’ या नाटकातही त्यांनी सोंगाड्याचीच व्यक्तिरेखा साकारली. पाटलांनी अभिनीत केलेल्या नाच्याच्या भूमिकांची लोकप्रियता लक्षात घेऊन कृष्णा पाटलांनी ’वाघ्या मुरळी’ चित्रपटात त्यांना तशीच भूमिका दिली. या चित्रपटानंतर पाटलांच्या अभिनयकौशल्यामुळे नाच्याची भूमिका आणि गणपत पाटील हे समीकरण मराठी तमाशापटांत दृढावत गेले.
बायकी किरटया आवाजात ओरडत बोलताना उजव्या हाताची तर्जनी हनुवटीवर ठेवून अन डावा हात कमरेवर ठेवून बोलणारे अंगाला लचके द्यायचे अन अगदी ठसक्यात खुमासदार पद्धतीने तो नाच्या साकारायचे. खरे तर त्यांच्या वाट्याला आलेली अगदी नगण्य असणारी जेमतेम फुटेज असणारी ही भूमिका ते जगायचे अन ती भूमिका प्रेक्षकाच्या मनात ठसायची. प्रेक्षक देखील त्याना मनापासून दाद द्यायचे. तत्कालीन मराठी सिनेमे अन त्यातही तमाशापट यांचा धांडोळा घेताना सर्व रांगडे मराठी अभिनेते डोळ्यापुढे येतात. अरुण सरनाईक, सुर्यकांत मांढरे, कुलदीप पवार,चंद्रकांत… सांगत्ये ऐका हा त्यातला सुवर्ण पट म्हणावा लागेल. जयश्री गडकर, माया गांधी, सीमा ते उषा नाईक – उषा चव्हाण पर्यंत कोणाचेही तमाशाप्रधान चित्रपट पाहिले तर त्या सर्वांचा एकच समान धागा होता तो म्हणजे गणपत पाटील !
गणपत पाटलांनी साकारलेला कोणताही सिनेमा घ्या त्यात त्यांची भूमिका जास्तीत जास्त मोठी आठ ते नऊ मिनिटांची आहे. बालध्रुवमध्ये ते बालकलाकार म्हणून चक्क मॉबमध्ये उभे होते. १९४९ मधल्या ‘मीठभाकर‘ने त्यांना ओळख दिली. ‘राम राम पाव्हणं‘ ने शिक्का मारला तर १९५१ च्या ‘पाटलाचा पोर‘ने त्यांची चौकट पक्की केली. त्याच वर्षी आलेल्या ‘छत्रपती शिवाजी‘मध्ये त्यांनी अनेक छोट्या भूमिका पार पाडल्या होत्या. १९६० शिकलेली बायको’ने त्यांचे बस्तान पक्के केले. १९६३ मधील ‘थोरातांची कमळा‘ने त्यांना लोकप्रियता मिळवून दिली. त्या नंतर आलेल्या १९६४ मधल्या ‘पाठलाग‘, ‘सवाल माझा ऐका‘, ‘वाघ्या मुरळी‘ या सिनेमांनी त्यांचे आयुष्य बदलले. इथेच घात झाला. खरे गणपत पाटील लोप पावले आणि नाच्या गणपत पाटील लोकमानसाच्या नसनसात भिनला. १९६५ मध्ये आलेल्या ‘केला इशारा जाता जाता‘ने त्यांना स्टार कलाकारांईतके महत्व आले. १९६५ च्या ‘मल्हारी मार्तंड‘ आणि ‘रायगडचा राजबंदी‘ने मराठी तमाशापटात गणपत पाटलांचे स्थान अबाधित केले. १९६७ -‘बाई मी भोळी‘ आणि ‘देवा तुझी सोन्याची जेजुरी‘ आणि ‘सांगू मी कशी‘ ‘सुरंगा म्हनत्यात मला‘, ‘छंद प्रीतिचा‘,’धन्य ते संताजी धनाजी‘ पर्यंत सारे ठीक चालले होते. मात्र १९६८च्या ‘एक गाव बारा भानगडी‘ने गणपत पाटील थोडेसे सावध झाले. कारण या सिनेमाने लोकप्रियतेचे नवे विक्रम केले आणि सार्वजनिक जीवनात आपला तमाशा होऊ लागलाय हे पाटलांच्या ध्यानी येऊ लागले. १९६९ मधील ‘खंडोबाची आण‘ व ‘गणगौळण‘ मध्ये त्यांनी आपली अस्वस्थता व्यक्त करण्याचा प्रयत्न केला पण १९७०च्या ‘अशी रंगली रात‘ आणि ‘गणानं घुंगरू हरवलं‘ या सिनेमात त्यांच्या वाटेला मोठे फुटेज आले. १९७१ च्या ‘अशीच एक रात्र‘ आणि ‘लाखात अशी देखणी‘ने पुन्हा गाडी रुळावरून ढासळू लागली. मात्र १९७१ मध्ये दादांच्या ‘सोंगाड्या‘ने त्यांना नाव दिले अन समाजाने त्यांचे नाव घालवले. यानंतर आलेल्या अनेक सिनेमात १९७२ – ‘पुढारी‘ १९७४ – ‘सून माझी सावित्री‘, ‘सुगंधी कट्टा‘ १९७६- ‘जवळ ये लाजू नको‘ १९७८ – ‘कलावंतीण‘, ‘नेताजी पालकर‘ १९७९ – ‘ग्यानबाची मेख‘, ‘हळदी कुंकू‘ १९८० – ‘मंत्र्याची सून‘, ‘सवत‘ १९८१- ‘पोरी जरा जपून‘ १९८१ – ‘तमासगीर‘ १९८२ – ‘दोन बायका फजिती ऐका‘, ‘राखणदार‘ १९८७ – ‘बोला दाजिबा‘, ‘इरसाल कार्टी‘ १९९०- ‘थांब थांब जाऊ नको लांब‘ १९९३ – ‘लावण्यवती‘ २००६ – ‘मा. मुख्यमंत्री गणप्या गावडे‘ हे चित्रपट मुख्य गाजले.
गणपत पाटील जेंव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते तेंव्हा त्यांच्याशिवाय तमाशापट अशक्य झाला होता. विशेष बाब म्हणजे तमाशाच्या फडावर नाचणारी कलावंतीण जयश्री गडकर, लीला गांधी, संध्या, उषा चव्हाण, उषा नाईक, रंजना, मधु कांबीकरपासून ते माया जाधव पर्यंत कोणीही लीड रोलमध्ये असले तरी नाच्याचे काम गणपत पाटलांना दया असा त्या अभिनेत्रींचा आणि दिग्दर्शकाचा आग्रह असे. ते तिकडे रमत गेले अन इकडे त्यांचा संसार जगाच्या टवाळीचा विषय झाला. त्यांच्या पत्नीने आणि मुलांनी काय काय ऐकून घेतले असेल याची कल्पना करवत नाही. इतके असूनही पाटलांनी आपल्या चेहऱ्याला रंग लावून घेणे बंद केले नाही. गणपत पाटलांनी कधी कुणापुढे हात पसरले नाहीत की कुणापुढे कशाची याचना केली नाही. सगळे दुःख, अपमान, व्यथा, तिटकारा ते सोशित गेले मात्र अंती त्यांच्या हाती फारसे काही लागले नाही.
चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आयुष्यभर फक्त सदरा- पायजमा अशा एकाच ढगळया वेशात वावरलेला हा माणूस आपल्या शापित भूमिकेचे सोने करून गेला पण त्यांच्या वेदना जगापुढे फारशा मांडल्या गेल्या नाहीत. त्यांनी लिहिलेल्या ‘रंग नटेश्वराचे‘ मध्ये मात्र विस्तृतपणे या सर्व घटनांचा पट उलगडला आहे. या नटरंगाची आयुष्यभर उपेक्षा झाली होती की काय म्हणूनच प्रेक्षकांनी त्यांच्यावर निघालेल्या चित्रपटाला रेकॉर्डब्रेक प्रतिसाद दिला. २०१३ सालचा ‘विशेष दिनानाथ मंगेशकर पुरस्कार‘ त्याना मरणोत्तर जाहीर झाला होता. तत्पूर्वी २००५ चा ‘झी जीवनगौरव पुरस्कार‘ हाच काय तो त्यांचे कौतुक सोहळा.
२३ मार्च २००८ रोजी हा खरा प्रतिभावंत अभिनेता आपल्या अनंताच्या प्रवासाला गेला. मला कधी कधी वाटते की त्या विश्वनिहंत्याने देखील त्यांना एकदा टाळी वाजवून ‘आत्ता गं बया !’ म्हणायला लावले असेल अन तोही मनमुराद हसला असेल. पण यांच्या डोळयातले अश्रू त्यालाही कळले नसतील… आपल्या भूमिकेचे त्यांनी सोने केले पण त्या भूमिकेनेच त्यांच्या आयुष्याची माती केली.
अभिनय संपन्नतेला मिळालेली रसिकांची ही दाद त्यांचे रोजचे जिणे बेहाल करून गेली. त्यांच्या पत्नीच्या वाट्याला किती भयंकर थट्टा आली असेल कल्पना करवत नाही. पुढे जाऊन गणपत पाटील ही तृतीयपंथीयांसाठीची संज्ञा झाली. अगदी नटरंग सिनेमा येईपर्यंत ही अवस्था होती. ‘नटरंग‘ आला अन मराठी सिनेमाचे व गणपत पाटलांचे पांग फेडून गेला. पण तेंव्हा गणपत पाटील नव्हते. मार्च २००८ मध्ये ते गेले. त्यांचे पात्र अन त्यांचे नाव अजरामर झाले. पण त्यांच्या व्यक्तिगत अन कौटुंबिक जीवनाला या नाच्याच्या पात्रामुळे विषण्ण कारुण्याची झाक होती.
आपली कदाचित ही शेवटची पिढी असावी ज्यांना गणपत पाटील माहित होते. मराठी सिनेमा म्हटला की अजूनही डोळ्यासमोर पूर्वेचे रांगडे, ग्रामीण तमाशाप्रधान चित्रपट आठवतात.अरुण सरनाईक, जयश्री गडकर, सूर्यकांत, चंद्रकांत, गणपत पाटील, रविंद्र महाजनी अशीच नावे लक्षात येतात. आजचे नवे चित्रपट पाहतांना नवीन पिढीला या गुणी कलावंतांची कितपत ओळख राहील? या बद्दल शंकाच आहे. मराठी चित्रपटसृष्टीतील गणपत पाटील ह्या उपेक्षित शिलेदाराला भावपूर्ण श्रध्दांजली!
(Not my artical. Copied)

Ranveer Singh reinvented rap in India

Ranveer brings rap revolution in India

With Ranveer delivering the huge success of Gully Boy and popularising rap/hip-hop through his breakthrough label IncInk, India is seeing this genre as the new fad in brands and films

For generations, Bollywood superstars have propelled societal fads and created huge trends. Ranveer Singh, whose stardom cuts across demographics and regions of our country, has brought niche rap/hip hop music from the streets of the country and made it massively mainstream.

First with Gully Boy, he delivered a career-best performance and made the cash counters ringing as the film became a blockbuster. He also launched his passion project, an independent record label IncInk, aimed at discovering, nurturing and promoting young artists from across the country. His first 3 talents are brilliant hip hop artists Kaam Bhari, Slow Cheeta and Spitfire. A genre that was once considered hugely small, rap/hip-hop is now majorly commercial.

From political parties, to brands to even films are now using rap/hip-hop to promote ideas and ideologies. No one can forget the BJP campaign during Lok Sabha elections which saw them campaigning against Congress with the song Azaadi from Gully Boy. It broke the internet. A slew of brands from face wash (Himalaya Men’s Face Wash), footwear (Relaxo Flite), to even an initiative like Sabka Dentist have all used rap to find their way into the millennial minds. Recent films like Article 15 and Khandaani Shafakhana have used this genre to promote. Currently, a youth TV channel (MTV) has launched a show titled Hustle that discovers rappers in India. Let’s also not forget the hundreds and thousands of content creators who have uploaded their rap/hip-hop songs on Youtube, Facebook, Tik Tok to bring attention to their music and talent.

Ranveer says, “The time of Hindustani rap/hip hop has come and this is the much-needed explosion in the music scene of India. These are exciting times for original music in India and rap/hip-hop is a huge refresher. Hindustani Rap/hip hop is no longer an underground music scene. It has become the language of the youth and it is the biggest thing happening in Indian culture today.”

He adds, “India has always produced spectacular original content and now is the time for rap/hip hop and the incredible artists whose poetry is speaking of a revolution. They are the poets of our generation and the youth is listening to what they have to say. Hindustani Rap/hip hop is here to stay and it is the voice of India that you can’t just ignore.”

Ranveer says he would love to be a thought leader of the country and for his industry. “I love films and I love our industry. I would like to be the leader of the industry, a champion of the industry. I want Hindi cinema and the Hindi movie business to keep growing and becoming bigger and bigger. So, if there is anything that I can contribute to this industry, to the Hindi cinema to become bigger and better it is a very rewarding for me,” he says.