54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर दरम्यान गोव्यात रंगणार
या महोत्सवात मायकेल डग्लस यांना 'सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार' प्रदान करण्यात येणार
महोत्सवाच्या आंतरराष्ट्रीय विभागाला भरघोस प्रतिसाद, 'क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टूमारो' उपक्रमासाठी 600 प्रवेशिका दाखल
सर्वोत्कृष्ट वेब सिरीज पुरस्कारासाठी 15 ओटीटी व्यासपीठावरुन 10 भाषांमध्ये 32 प्रवेशिका दाखल : अनुराग ठाकूर
- आंतरराष्ट्रीय विभागात 13 जागतिक प्रीमियरसह 198 चित्रपट दाखवले जाणार आहेत.
- ‘कॅचिंग डस्ट’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाची सुरुवात होईल तर 'अबाऊट ड्राय ग्रासेस' हा चित्रपट महोत्सवाच्या मध्यात दाखवला जाईल आणि 'द फेदरवेट' या चित्रपटाने महोत्सवाची सांगता होईल.
- या वर्षी जगभरातील विविध प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील पुरस्कार विजेत्या 19 चित्रपटांचा इफ्फीच्या कॅलिडोस्कोपमध्ये समावेश करण्यात आला आहे.
- या वर्षी 300 आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रकल्प निर्मिती, वितरण किंवा विक्रीसाठी 'फिल्म बाजारच्या' 17 व्या आवृत्तीत जतन करून प्रदर्शित केले गेले.
- प्रख्यात चित्रपट निर्माते, छायाचित्रकार आणि अभिनेत्यांसह 20 हून अधिक 'मास्टरक्लासेस' तसेच 'संवाद' सत्र आयोजित केले जातील.
54 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 20 ते 28 नोव्हेंबर 2023 या कालावधीत गोव्यात आयोजित केला जाईल, अशी घोषणा केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज केली. जागतिक स्तरावर 5 व्या क्रमांकावर असलेला भारतातील प्रसार माध्यम आणि मनोरंजन उद्योग ही देशाची लक्षात घेण्याजोगी ताकद आहे, असे अनुराग ठाकूर या प्रसंगी बोलताना म्हणाले. गेल्या तीन वर्षांत सरासरी 20% वार्षिक वाढीसह हा उद्योग दरवर्षी वाढत आहे, असे त्यांनी सांगितले. भारतात बनलेल्या चित्रपटांनी देशाचा कानाकोपरा व्यापला आहेच आणि आता ते जगाच्या सर्वदूर कानाकोपऱ्यातही पोहोचले आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
या वर्षीचा 'सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार' जागतिक चित्रपटसृष्टीतील एक चमकता तारा आणि सिनेविश्वातील अतुलनीय योगदानासाठी ओळखले जाणारे मायकल डग्लस यांना प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.
इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय विभागात चित्रपटांच्या संख्येत तिप्पट वाढ झाली आहे, असे ठाकूर यांनी सांगितले. यातून इफ्फीसाठी आंतरराष्ट्रीय चित्रपट उद्योगाचे आकर्षण वाढत असल्याचे दिसून येते असेही ते म्हणाले.
कोविड 19 महामारीपासूनच्या काळात ओटीटी व्यासपीठाने भारतात जम बसवला आहे आणि या व्यासपीठाद्वारे भारतात तयार होत असलेल्या आशयघन कलाकृती हजारो लोकांना रोजगार देत आहेत , असे ठाकूर यांनी नव्याने सुरू करण्यात आलेल्या ओटीटी पुरस्कारांबद्दल बोलताना सांगितले. दरवर्षी सुमारे 28% वाढ नोंदवणाऱ्या या क्षेत्राच्या चैतन्यपूर्ण विकासाला प्रतिसाद म्हणून मंत्रालयाने ओटीटी व्यासपीठावरील उत्कृष्ट आशय निर्मात्यांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार सुरू केला आहे, असेही ते म्हणाले. या वर्षीच्या महोत्सवात या पुरस्कारासाठी 15 ओटीटी व्यासपीठावरुन 10 भाषांमधील एकूण 32 प्रवेशिका प्राप्त झाल्या असून विजेत्यांना दहा लाख रुपयांचे बक्षीस दिले जाईल, अशी माहिती ठाकूर यांनी दिली.
देशात भरभराट होत असलेल्या स्टार्टअप प्रणालीबद्दलही ठाकूर यांनी माहिती दिली. सरकार अशा संस्थांच्या प्रगतीला चालना देण्यासाठी समर्थन प्रणाली तयार करण्यावर लक्ष केंद्रित करत असल्याचे त्यांनी सांगितले. चित्रपट क्षेत्रातील स्टार्टअप प्रणालीला चालना देण्यासाठी तसेच देशाच्या दुर्गम भागातील, कानाकोपऱ्यातील प्रतिभावंताचा शोध घेण्यासाठी आम्ही 'क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो' उपक्रम सुरू केला आहे, असे त्यांनी सांगितले. यावर्षी या विभागात 600 हून अधिक प्रवेशिका दाखल झाल्याची माहिती मंत्र्यांनी दिली. यावर्षी 75 विजेत्यांच्या निवडीनंतर गेल्या 3 वर्षातील अशा विजेत्यांची एकूण संख्या 225 होईल, असे त्यांनी सांगितले.
यावर्षीच्या इफ्फीसाठी निवडण्यात आलेली सर्व स्थळे सर्व सुविधांनी सज्ज आणि दिव्यांगांचा वावर सुलभ बनवणारी असतील, याचा अनुराग ठाकूर यांनी विशेष उल्लेख केला. दृष्टिहीनांसाठी श्राव्य वर्णन, कर्णबधीरांसाठी सांकेतिक भाषा तसेच आशयाचे अनेक भाषांमध्ये डबिंग हे 'सबका साथ सबका विकास' या मंत्राचे प्रतीक असल्याचे ठाकूर यांनी स्पष्ट केले.
इफ्फी हा जगातील सर्वात मोठा चित्रपट आणि सांस्कृतिक महोत्सव आहे, असे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ एल मुरुगन यांनी आपल्या संक्षिप्त निवेदनात सांगितले. या चित्रपट महोत्सवातील आंतरराष्ट्रीय ज्युरीचे नेतृत्व प्रख्यात भारतीय चित्रपट निर्माते शेखर कपूर करणार असल्याची माहिती त्यांनी उपस्थितांना दिली.
भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या 54 व्या आवृत्तीच्या ठळक वैशिष्ट्यांची ही एक झलक आहे:
इफ्फीच्या ठळक वैशिष्ट्यांपैकी एक म्हणजे, सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार - (SRLTA) जो जागतिक चित्रपटात उत्कृष्ट योगदानासाठी दिला जातो. वर्तमानात जागतिक चित्रपटसृष्टीतील महान आंतरराष्ट्रीय व्यक्तींपैकी एक हॉलीवूड अभिनेता आणि निर्माता मायकेल डग्लस, हा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारण्यासाठी त्यांची पत्नी आणि प्रसिद्ध अभिनेत्री कॅथरीन झेटा-जोन्ससह इफ्फी मध्ये उपस्थित राहणार आहेत.
चित्रपट आणि टेलिव्हिजन उद्योगात 50 वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या “मायकेल डग्लस” यांना 2 ऑस्कर, 5 गोल्डन ग्लोब पुरस्कार, एक प्राइमटाइम एमी पुरस्कार आणि इतर असंख्य सन्मान मिळाले आहेत. 2023 मध्ये, त्याला 76 व्या फेस्टिव्हल डी कान्समध्ये आजीवन कामगिरीसाठी पाल्मे डी'ओर पुरस्कार मिळाला आहे. 'वॉल स्ट्रीट' चित्रपटातील गॉर्डन गेकोच्या भूमीकेसाठी अकादमी पुरस्कार विजेत्या कामगिरीपासून ते फॅटल अट्रॅक्शन, द अमेरिकन प्रेसिडेंट, बेसिक इन्स्टिंक्ट, ट्रॅफिक आणि रोमान्सिंग द स्टोन यांसारख्या समीक्षकांच्या प्रशंसेला पात्र ठरलेल्या चित्रपटांपर्यंत त्यांच्या प्रतिष्ठित भूमिकांसाठी ते सर्वपरिचित आहेत. मायकेल हे केवळ अभिनेतेच नाहीत तर एक उत्कृष्ट निर्माता देखील आहेत. त्यांच्या महत्वपूर्ण निर्मितीत वन फ्लू ओव्हर द कुक्कूज नेस्ट आणि द चायना सिंड्रोम सारख्या प्रभावशाली चित्रपटांचा समावेश आहे. डग्लस हे त्यांच्या मानवतावादी प्रयत्नांसाठी देखील ओळखले जातात. ते न्यूक्लियर थ्रेट इनिशिएटिव्ह संस्थेच्या बोर्डाचे सदस्य असून ही संस्था मानवतेला धोका निर्माण करणाऱ्या आण्विक आणि जैविक शस्त्रांचे धोके कमी करण्यावर लक्ष केंद्रित करते आहे. 1998 मध्ये त्यांची संयुक्त राष्ट्रांचे शांतता दूत म्हणून देखील डग्लस यांची नियुक्ती करण्यात आली होती.
महोत्सवादरम्यान आयनॉक्स पणजी (4 स्क्रीन ), मॅक्वीनेज पॅलेस (1 स्क्रीन), आयनॉक्स पर्वरी (4 स्क्रीन), झेड स्क्वेअर सम्राट अशोक (2 स्क्रीन) अशा 4 ठिकाणी 270 हून अधिक चित्रपट प्रदर्शित केले जातील.
54व्या इफ्फीच्या ‘आंतरराष्ट्रीय विभागात’ 53व्या इफ्फीपेक्षा 18 अधिक म्हणजे 198 चित्रपट असतील, यात 13 वर्ल्ड प्रीमियर्स, 18 इंटरनॅशनल प्रीमियर्स, 62 एशिया प्रीमियर्स आणि 89 इंडिया प्रीमियर्स असतील. या वर्षी इफ्फी मध्ये 105 देशांमधून 2926 चित्रपटांसाठी विक्रमी प्रवेशिका प्राप्त झाल्या, ज्या गेल्या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय प्रवेशिकांच्या तुलनेत 3 पट अधिक आहेत.
‘इंडियन पॅनोरमा’ विभागात भारतातील 25 फीचर फिल्म्स आणि 20 नॉन फीचर फिल्म्स दाखवल्या जातील. फीचर विभागात अट्टम या मल्याळम चित्रपटाने आणि नॉन फीचर विभागात मणिपूरच्या एंड्रो ड्रीम्स चित्रपटाने महोत्सवाचा प्रारंभ होईल.
सर्वोत्कृष्ट वेब मालिका (ओटीटी) पुरस्कार: ओटीटी प्लॅटफॉर्मवरील दर्जेदार सामग्री आणि त्याच्या निर्मात्यांची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन देण्याच्या आणि त्यांचा सन्मान करण्याच्या उद्देशाने या वर्षी सर्वोत्कृष्ट वेब मालिका (ओटीटी) पुरस्काराचा समावेश करण्यात आला आहे. 15 ओटीटी प्लॅटफॉर्मवरून 10 भाषांमध्ये 32 प्रवेशिका प्राप्त झाल्या आहेत. विजेत्या मालिकेला प्रमाणपत्र आणि बक्षीस म्हणून 10 लाख रुपये रोख दिले जातील, ज्याची घोषणा सांगता समारंभात केली जाईल.
या वर्षीच्या इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट विभागात 8 निवडक विभाग असतील. महत्त्वाच्या चित्रपटांचे ठळक वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत -
शुभारंभाचा चित्रपट: कॅचिंग डस्ट | दिग्दर्शक: स्टुअर्ट गॅट | ब्रिटन | (इंटरनॅशनल प्रीमियर) – हे एक नाट्य/रहस्यमय कलाकृती आहे, ज्यामध्ये प्रख्यात आंतरराष्ट्रीय कलाकार, एरिन मॉरियार्टी, जय कोर्टनी, दिना शिहाबी, रायन कॉर, जोस अल्टिट, गॅरी फॅनिन आणि ओल्वेन फौरे यांचा समावेश आहे. स्टुअर्ट गॅट मिश्र आशियाई वारसा पुरस्कार विजेता ब्रिटीश चित्रपट निर्माते असून त्यांच्या कथानकात बर्याचदा सामाजिक विषय हाताळलेले दिसतात.
महोत्सवातील मध्यावधी चित्रपट: अबाउट ड्राय ग्रासेस | दिर: नुरी बिलगे सिलान | फ्रान्स | (इंडिया प्रीमियर) – अनेक प्रतिष्ठित पुरस्कार पटकावलेल्या प्रशंसित दिग्दर्शकाचे हे तुर्की नाट्य आहे. त्यांच्या विंटर स्लीप (2014) या चित्रपटाने कान्स चित्रपट महोत्सवात पाम डी'ओर पुरस्कार जिंकला, तर त्यांचे सहा चित्रपट सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय फीचर चित्रपटाच्या अकादमी पुरस्कारासाठी तुर्कीच्या प्रवेशिकांमधून निवडले गेले आहेत, ज्यामध्ये ‘अबाऊट ड्राय ग्रासेस’ देखील समाविष्ट आहे. हा चित्रपट यावर्षी कान्स चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धा विभागातही होता. या चित्रपटातील अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रसिद्ध अभिनेत्री मर्वे दिझदार यांना प्रदान करण्यात आला.
समारोपाचा चित्रपट : द फेदरवेट | दिग्दर्शक: रॉबर्ट कोलोड्नी | अमेरिका | (आशिया प्रिमियर) – हा 2023 चा अमेरिकन चरित्रात्मक क्रीडाविषयक कथानकावरील चित्रपट आहे जो एका नामांकित खेळाडूच्या आत्मचरित्राद्वारे पौराणिक आणि आधुनिक प्रतिष्ठेची काल्पनिक कथा वास्तववादी शैलीत अत्यंत काळजीपूर्वक उलगडून दाखवतो. रॉबर्ट कोलोड्नी एक अष्टपैलू अमेरिकन दिग्दर्शक, लेखक आणि सिनेमॅटोग्राफर आहे. चित्रपटाचा प्रीमियर सप्टेंबर 2023 मध्ये 80 व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला. रॉबर्टने अनेक चित्रपटांसाठी छायाचित्रण संचालक म्हणून काम केले आणि विविध पुरस्कार विजेते चित्रपट आणि माहितीपटांचे दिग्दर्शनही केले.
आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभाग -15 फिचर फिल्म (12 आंतरराष्ट्रीय + 3 भारतीय) प्रतिष्ठित सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार, सुवर्ण मयूर आणि INR 40 लाख रुपये पुरस्काराच्या स्पर्धेसाठी निवडले गेले आहेत. सर्वोत्कृष्ट चित्रपटाव्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता (पुरुष), सर्वोत्कृष्ट अभिनेता (महिला), विशेष ज्युरी पुरस्कार श्रेणीतील विजेते देखील ज्युरी निश्चित करतील. चित्रपटांची यादी परिशिष्टात दिली आहे आणि त्यांचे तपशील IFFI च्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले जात आहेत.
सर्वोत्कृष्ट चित्रपट पदार्पण दिग्दर्शक - 5 आंतरराष्ट्रीय + 2 भारतीय चित्रपट या विभागात प्रतिष्ठित रौप्य मयूर, 10 लाख INR रोख पारितोषिक आणि प्रमाणपत्रासाठी स्पर्धा करतील. चित्रपटांची यादी परिशिष्टात दिली आहे आणि त्यांचे तपशील IFFI च्या अधिकृत वेबसाइटवर अपलोड केले जात आहेत.
आंतरराष्ट्रीय ज्युरी - प्रख्यात भारतीय चित्रपट निर्माते आणि अभिनेता शेखर कपूर (अध्यक्ष); स्पॅनिश सिनेमॅटोग्राफर जोस लुईस अल्केन; मार्चे डू कान्सचे प्रतिष्ठित माजी प्रमुख जेरोम पेलार्ड; फ्रान्समधील प्रख्यात चित्रपट निर्माते कॅथरीन दुसार्ट; ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध चित्रपट निर्मात्या हेलन लीक.
फेस्टिव्हल कॅलिडोस्कोप – या वर्षीच्या प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील सर्वोत्कृष्ट पुरस्कार विजेत्या चित्रपटांना इफ्फी कॅलिडोस्कोपमध्ये वर्गीकृत करण्यात आले आहे. 19 चित्रपट कान, व्हेनिस, साओ पाउलो, रॉटरडॅम, सांता बार्बरा, स्टॉकहोम इत्यादी महोत्सवातील आहेत.
सिनेमा ऑफ द वर्ल्ड: या विभागात 103 चित्रपटांचा समावेश आहे, जी जगभरातील चित्रपटसृष्टीतील सौंदर्यशास्त्र आणि कथांमधील आश्चर्यकारक विविधता शोधण्यासाठी मागील वर्षां (77) पेक्षा एक महत्त्वपूर्ण झेप आहे.
जगभरातील आकर्षक माहितीपटांचा समावेश असलेल्या DOCU-MONTAGE विभागाचा अंतर्भाव.
महोत्सवाचा अॅनिमेशन विभाग आंतरराष्ट्रीय आणि भारतीय अॅनिमेशन चित्रपट निवडण्यासाठी विस्तारित करण्यात आला आहे, ज्यामध्ये सौंदर्यदृष्ट्या कल्पक आणि कथनात्मकदृष्ट्या विध्वंसक अॅनिमेटेड चित्रपटांचा समावेश आहे, ज्यामध्ये पोलंडच्या अधिकृत ऑस्कर प्रवेश - द पीझंट्स (डिर: डीके वेल्चमन, ह्यू वेलचमन) आणि भारतीय अॅनिमेशन चित्रपटांचा समावेश आहे.
एनएफडीसी -एनएफएआय द्वारे राष्ट्रीय छत्रपती वारसा अभियान (एनएफएचएम) अंतर्गत भारतीय क्लासिक्सच्या खराब झालेल्या सेल्युलॉइड रील्समधून केलेल्या जागतिक दर्जाच्या पुनर्संचयनाचे 7 जागतिक प्रीमियर असलेले पुनर्संचयित क्लासिक्स विभागाचा समावेश करण्यात आला आहे -
विद्यापती (1937) बंगाली दिग्दर्शक: देवकी बोस
श्यामची आई (1953), मराठी, दिग्दर्शक: पी.के. अत्रे
पटला भैरवी (1951), तेलुगू, दिग्दर्शक: के.व्ही. रेड्डी
गाईड (1965), हिंदी, दिग्दर्शक: विजय आनंद
हकीकत (1964), हिंदी, दिग्दर्शक: चेतन आनंद
कोरस (1974) बंगाली, दिग्दर्शक: मृणाल सेन
बीस साल बाद (1962), हिंदी, दिग्दर्शक: बिरेन नाग
तसेच, या विभागात 3 आंतरराष्ट्रीय पुनर्संचयित चित्रपट देखील प्रदर्शित केले जातील ज्यात द एक्सॉर्सिस्ट एक्स्टेंडेड डायरेक्टर्स कट फ्रॉम व्हेनिस आणि सर्गेई पराजानोव्हचे शॅडोज ऑफ फॉरगॉटन एन्सेस्टर्स यांचा समावेश आहे.
युनेस्को चित्रपट- युनेस्कोचे आदर्श प्रतिबिंबित करणारे चित्रपट: 7 आंतरराष्ट्रीय + 3 भारतीय चित्रपट. चित्रपटांची यादी परिशिष्टात दिली आहे आणि त्यांचे तपशील इफ्फीच्या अधिकृत संकेतस्थळावर अपलोड केले जात आहेत.
सुगम चित्रपट - 54 व्या इफ्फीमध्ये आलेल्या विशेष दिव्यांग प्रतिनिधींना सर्व चित्रपट प्रदर्शन ठिकाणी आणि इतर ठिकाणी सहज प्रवेश करता येईल हे सुनिश्चित करण्यासाठी सुविधा असतील. हा महोत्सव सर्वांसाठी सर्वसमावेशक आणि सुगम बनवणे हे सर्वसमावेशकतेच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे.
दिव्यांग प्रतिनिधी दृष्टिबाधितांसाठी : अंतःस्थापित ध्वनी चित्रणासह चित्रपट- सिर्फ एक बंदा काफी है आणि शेरशाह
कर्णबधिरांसाठी : अंतःस्थापित सांकेतिक भाषेसह चित्रपट - 83 आणि भाग मिल्खा भाग
अनेक भाषांमध्ये डबिंग - अनेक भारतीय पॅनोरमा चित्रपट “स्मार्टफोन आणि इअरफोन्स” वापरून पसंतीच्या भाषेत डबिंगसह पाहण्यासाठी उपलब्ध असतील. इफ्फीने यासाठी 'सिनेडब्स ' अॅपसोबत भागीदारी केली आहे, ही सेवा मोफत उपलब्ध करून दिली जाईल. चित्रपटगृहात ज्या भाषेत चित्रपट चालला आहे त्याशिवाय इतर अनेक हशा डब अॅपद्वारे उपलब्ध असतील.
इफ्फीच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमात 40 हून अधिक महिला चित्रपट दिग्दर्शिकांच्या वैशिष्ट्यपूर्ण चित्रपटांचा समावेश आहे .
मास्टर क्लासेस आणि संवाद सत्रे - प्रख्यात चित्रपट निर्माते, सिनेमॅटोग्राफर आणि अभिनेत्यांसोबत 20 हून अधिक 'मास्टरक्लासेस' आणि 'संवाद ' सत्रांसह, हा एक उत्साहवर्धक आठवडा रंगणार आहे. गोव्यात पणजी येथील फेस्टिव्हल माईल या नूतनीकरण आणि दुरुस्त केलेल्या कला अकादमीमध्ये हे उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मायकेल डग्लस, ब्रेंडन गॅल्विन, ब्रिलेंट मेंडोझा, सनी देओल, राणी मुखर्जी, विद्या बालन, जॉन गोल्डवॉटर, विजय सेतुपती, सारा अली खान, पंकज त्रिपाठी, नवाजुद्दीन सिद्धीकी, केले मेनन, करण जोहर, मधुर भांडारकर, मनोज बाजपेयी, कार्तिकी गोन्साल्विस, बोनी कपूर, अल्लू अरविंद, थिओडोर ग्लक, गुलशन ग्रोव्हर यासह अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय तारे तारका यात सहभागी होणार आहेत.
महोत्सवातील प्रीमियर्स – गेल्या वर्षी सुरू झालेल्या महोत्सवातील प्रीमियर्स उपक्रमाचा विस्तार केला जात आहे. इफ्फीमध्ये प्रदर्शित होणाऱ्या चित्रपट प्रीमियरमधले कलाकार आणि प्रतिभावंत त्यांच्या चित्रपटांच्या जाहिरातीसाठी इफ्फीच्या रेड कार्पेटवर चालतील.
आभासी इफ्फी - मास्टरक्लासेस, परस्पर संवाद सत्रे , पॅनल चर्चा आणि इफ्फी च्या 54 व्या आवृत्तीचे उद्घाटन/सांगता समारंभ बुक माय शो अॅपद्वारे ऑनलाइन उपलब्ध असतील. नोंदणी नाममात्र ठेवली जाईल.
चित्रपट बाजार : इफ्फी म्हणजे "जागतिक चित्रपटांचा महोत्सव " आहे . यासोबतच एनएफडीसीद्वारे “बिझनेस ऑफ सिनेमा” हा चित्रपट बाजार आयोजित केला आहे. इफ्फीचा फिल्म बाजार दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या जागतिक चित्रपट बाजारांपैकी एक म्हणून विकसित झाला आहे . हा मंच आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक , निर्माते, विक्री एजंट किंवा फेस्टिव्हल प्रोग्रामर यांच्यासाठी संभाव्य सर्जनशील आणि आर्थिक सहकार्यासाठी एक परिपूर्ण व्यवस्था म्हणून काम करतो .या "एनएफडीसी चित्रपट बाजाराच्या 17 व्या आवृत्तीत"याची व्याप्ती वाढवली जाईल-
चित्रपट बाजारातील दालने आणि स्टॉल्स –
व्हीएफएक्स आणि तंत्रज्ञान दालन - नवीन तयार केलेले “व्हीएफएक्स आणि तंत्रज्ञान दालन” चित्रपट बाजारमध्ये एकीकृत करण्यात आले असून ते समुद्रासमोरील विहार मार्गिकेवर ठेवले जाईल.हे चित्रपट निर्मात्यांना केवळ "शॉट घेण्याच्या" पारंपारिक मार्गानेच नव्हे तर अनंत शक्यतांसह "शॉट तयार करणे" या द्वारे कथा सांगण्याच्या शक्यतांचा शोध घेत अलीकडील नवोन्मेषाची जाणीव करून देईल.
आंतरराष्ट्रीय चित्रपट आयोग आणि भारतीय राज्यांचे अनेक स्टॉल त्यांच्या स्थानांचा आणि प्रोत्साहन योजनांच्या प्रचारासाठी असतील.
चित्रपटाशी संबंधित निर्मिती केंद्र , संस्था, संघटना इत्यादींचे अनेक स्टॉल्स उपलब्ध असतील.
माहितीपट आणि कथाबाह्य कलाकृती /चित्रपट यांचा परिचय
निवडक चित्रपट दिग्दर्शक , देश आणि राज्यांकडूनचर्चा सत्रे, चित्रपट निर्मिती आणि वितरणाच्या महत्त्वाच्या पैलूंचा समावेश असलेली "नॉलेज सिरीज" तयार करण्यात आली आहे.
गेल्या वर्षी सुरू झालेल्या, ‘बुक टू बॉक्स ऑफिस’ विभागाने ‘द स्टोरी इंक’ सोबत भागीदारी केली आहे, सर्जनशील लेखकांना त्यांचे काम सादर करण्यासाठी या कथांची ओळख निर्माते आणि व्यासपीठ प्रमुखांना करून देण्यासाठी मंच प्रदान करणे हा यामागचा उद्देश आहे. एकूणच, 300 हून अधिक आंतरराष्ट्रीय चित्रपट प्रकल्प या वर्षी निर्मिती, वितरण किंवा विक्रीसाठी चित्रपट बाजारच्या 17 व्या आवृत्तीत तयार केले जातील आणि प्रदर्शित केले जातील.
उद्याचे 75 सर्जनशील कलाकार (सीएमओटी) : माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर, यांच्या कल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाचा उद्देश चित्रपट निर्मितीच्या विविध व्यवसायातील तरुण सर्जनशील प्रतिभा ओळखणे, प्रोत्साहित देणे आणि त्यांचे संवर्धन करणे हा आहे.शॉर्ट्स टीव्ही हा संकल्पनात्मक प्रोग्रामिंग भागीदार आहे, जो टीव्हीवर, मोबाइलवर, ऑनलाइन आणि चित्रपटगृहामध्ये उपलब्ध असलेल्या उच्च-दर्जाच्या लघुपट आणि मालिकांची जगातील सर्वात मोठी सूची असलेलेआ संच आहे. या निवडक ‘सर्जनशील कलाकारांची ’ची ‘फिल्म चॅलेंज’साठी 5 चमूमध्ये विभागणी करण्यात आली आहे, प्रत्येकी एक लघुपट 48 तासांत बनवला जाईल.
या वर्षी उमेदवारांचे व्यावसायिक वर्ग देखील असतील, विशेषत: सिनेमाच्या तज्ज्ञांद्वारे यात मार्गदर्शन केले जाईल. आणि 20 पेक्षा जास्त आघाडीच्या कंपन्यांसह भर्तीसाठी "टॅलेंट कॅम्प" आयोजित केले जाईल.
इफ्फी सिनेमेळा : इफ्फी हा केवळ सिनेमॅटिक उत्कृष्टतेचे प्रदर्शन नाही तर सांस्कृतिक विविधतेचा उत्सव देखील आहे. या वर्षी, इफ्फी सिनेमेळा हा सिनेसृष्टीमध्ये एक नेत्रदीपक भर घालणारा असेल. यात इफ्फीमध्ये उपस्थित आणि इतर लोक म्हणजेच स्थानिक आणि पर्यटक जे इफ्फीसाठी नोंदणीकृत नाहीत, ते देखील सिनेमा, कला, संस्कृती, कलाकुसर, खाद्यपदार्थ इत्यादींच्या जादूचा उत्सव साजरा करताना उत्साहवर्धक उपक्रमांचा आनंद घेऊ शकतात.
इतर आकर्षणे : ओपन एअर स्क्रिनिंग, कारवां, शिगमोत्सव, गोवा कार्निव्हल, सेल्फी पॉइंट्स, इफ्फी मर्चंडाईज इ. इफ्फीचा भारतातील जगातील सर्वात मोठ्या सांस्कृतिक कार्यक्रमांपैकी एक म्हणून सिस्टर करतात.
महोत्सवाच्या ठिकाणांचे ब्रँडिंग आणि सजावट - एनएफडीसी आणि ईएसजीने एनआयडी , अहमदाबादसोबत महोत्सवाच्या ठिकाणची संपूर्ण सजावट आणि ब्रँडिंगसाठी भागीदारी केली आहे.
भारतीय संस्कृती साजरी करणे (5 दिवस) – चित्रपट प्रदर्शन , महोत्सवातील प्रीमियर्स आणि चित्रपट प्रतिभांना त्यांचे प्रदेश दाखवण्यासाठी. संरेखित करणे.
दि. 22: पूर्व: बंगाली, ओरिया, आसामी, मणिपुरी आणि ईशान्येकडील बोलीभाषा
दि. 23 : दक्षिण 1: तमिळ आणि मल्याळम
दि. 24: उत्तर: पंजाबी, डोगरी, भोजपुरी, राजस्थानी, उर्दू, छत्तीसगढ़ी
दि 25: पश्चिम: कोंकणी, मराठी, गुजराती
दि. 26 : दक्षिण 2 : कन्नड आणि तेलगू
No comments:
Post a Comment