53वा इफ्फी अर्थात आतंरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव गोव्यामध्ये तालेईगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये दिमाखदार सोहळ्याने सुरू होणार आहे. एका शानदार रंगारंग शुभारंभासाठी हा महोत्सव सज्ज आहे. यंदाच्या महोत्सवाच्या पर्वणीमध्ये तब्बल 280 चित्रपटांची मेजवानीच उपलब्ध होणार आहे. 79 देशांमधल्या जनतेचं आयुष्य, आशा-आकांक्षा आणि संघर्ष अनुभवण्यासाठी हा महोत्सव सर्वांना आमंत्रित करत असून या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. याच अनुषंगाने महोत्सवाचे संचालक आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र भाकर, ईएसजीचे सीईओ स्वेतिका साचन, पत्र सूचना कार्यालयाच्या महासंचालक मोनिदीपा मुखर्जी आणि अतिरिक्त संचालक प्रज्ञा पालिवाल गौर यांनी पणजी येथे जुन्या जीएमसी इमारतीमध्ये वार्ताहर परिषदेत या महोत्सवाची सविस्तर माहिती दिली.
चला तर मग याची ठळक वैशिष्ट्ये पाहुयाः
दिग्दर्शक डिएटर बर्नेर यांच्या अल्मा अँड ऑस्कर या ऑस्ट्रियन चित्रपटाने महोत्सवाचा प्रारंभ होईल. उद्घाटनाच्या या चित्रपटासाठी पणजी येथे आयनॉक्स चित्रपटगृहात दुपारी दोन वाजल्यापासून लाल गालिचांवर पाहुण्यांचे स्वागत सुरू होईल आणि त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात येईल.
क्रिझटोव्ह झानुसी यांच्या 'परफेक्ट नंबर' या पोलिश चित्रपटाच्या प्रदर्शनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे. या चित्रपटासाठी 28 नोव्हेंबर रोजी पणजी येथे आयनॉक्स-I चित्रपटगृहात दुपारी दोन वाजल्यापासून लाल गालिचांवर सर्वांच्या स्वागताला प्रारंभ होईल आणि त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शन होईल.
मर्सिडिज ब्रायस् यांचा 2022 मधला जर्मनी, कॅनडा आणि अमेरिकेत चित्रित केलेला 'फिक्सेशन' हा चित्रपट महोत्सवाच्या मध्यावर प्रदर्शित केला जाईल.
भारतातील 25 फीचर फिल्म आणि 19 बिगर फिचर फिल्म्सचे प्रदर्शन इंडियन पॅनोरमा मध्ये करण्यात येईल. तर 183 चित्रपट आंतरराष्ट्रीय विभागात समाविष्ट आहेत. या महोत्सवात 52व्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मानकरी आशा पारेख यांच्या भूमिकांनी गाजलेले तिसरी मंजिल, दो बदन आणि कटी पतंग या तीन चित्रपटांच्या माध्यमातून त्यांच्या कारकिर्दीवर दृष्टीक्षेप टाकण्यात येणार आहे.
मणिपुरी चित्रपटसृष्टीला यंदा 50 वर्षे पूर्ण होत आहेत, त्यानिमित्त, मणिपूर स्टेट फिल्म्स फिल्म डेव्हलपमेंट सोसायटीने वैशिष्ट्यपूर्ण पाच फीचर फिल्म आणि पाच नॉन-फीचर चित्रपटांचे खास तयार केलेले पॅकेज इंडियन पॅनोरमा अंतर्गत प्रदर्शित केले जात आहे.
- ईशान्य भारतातील चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम म्हणून मणिपुरी चित्रपटसृष्टीचा सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून 5 फीचर आणि 5 नॉन फीचर चित्रपट.
सर्वोत्कृष्ट फॉरेन लँग्वेज कॅटेगरीत ऑस्करसाठी भारताकडून अधिकृत प्रवेश मिळालेला पॅन नलिन यांंचा 'चेलो शो—द लास्ट फिल्म शो' आणि मधुर भांडारकर यांच्या 'इंडिया लॉकडाऊन' चे विशेष स्क्रीनिंग या महोत्सवामध्ये केले जाईल.
नॅशनल फिल्म र्काइव्हज ऑफ इंडियाचे चित्रपट एनएफडीसीद्वारे ‘इंडियन रिस्टोर्ड क्लासिक्स’ विभागात प्रदर्शित केले जातील. यामध्ये सोहराब मोदी यांचा 1957 मधील विशेष नाट्यमय चित्रपट 'नौशेरवान-ए-आदिल' , रमेश माहेश्वरी यांचा 1969 चा राष्ट्रीय पुरस्कार विजेता पंजाबी चित्रपट 'नानक नाम जहाज है', के विश्वनाथ यांचा 1980 मधील तेलुगू संगीत नाट्यपट 'शंकराभरणम' आणि सत्यजित रे यांचे दोन क्लासिक्स असणार आहेत. सत्यजित रे यांचा 1977 चा गाजलेला 'शतरंज के खिलाडी' आणि 1989 मधील सामाजिक चित्रपट 'गणशत्रू' या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत.
स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक कार्लोस सौरा यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्यांची कन्या ॲना सौरा या इफ्फीच्या उद्घाटन समारंभात प्रसिद्ध चित्रपट निर्माते कार्लोस सौरा यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारतील. या महोत्सवात त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीचा प्रवास दाखवण्यात येणार आहे.
फ्रान्स हा ‘स्पॉटलाइट कंट्री ’ अर्थात प्रकाशझोतातील देश असून ‘प्रकाशझोतातील देश’ पॅकेज अंतर्गत 8 चित्रपट दाखवले जातील.
‘फिल्म बाजार’ विविध विभागांमधील काही उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित करेल. प्रथमच इफ्फीमध्ये 'मार्चे डु कान' सारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांच्या अनुषंगाने दालन असतील. यावर्षी एकूण 42 दालने असतील. विविध राज्य सरकारे, सहभागी देश, उद्योजक आणि मंत्रालयातील माध्यम संस्था या दालनांमध्ये आपली चित्रपट कार्यालये ठेवतील. प्रथमच अनेक पुनरुज्जीवित अभिजात चित्रपट ‘द व्ह्यूइंग रूम’ मध्ये उपलब्ध असतील जिथे या चित्रपटांचे हक्क विकत घेता येतील आणि जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांचा वापर करता येईल.
पुस्तकांमध्ये छापलेल्या चांगल्या कथा आणि पुस्तकांचे रुपांतर करून निर्मिती होऊ शकतील असे चांगले चित्रपट यांच्यातील तफावत भरुन काढण्यासाठी नवीन पुस्तक रूपांतरण कार्यक्रम, ‘बुक्स टू बॉक्स ऑफिस’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. चित्रपटामध्ये रुपांतरित होऊ शकणार्या पुस्तकांच्या हक्कांची विक्री करण्यासाठी या कार्यक्रमात काही उत्तम प्रकाशक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे,अशी माहिती महोत्सवाच्या संचालकांनी दिली.
संपूर्ण गोव्यात कॅरावॅन तैनात केल्या जातील आणि खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत चित्रपट पोहोचावा यासाठी एक उपक्रम म्हणून चित्रपट प्रदर्शित केले जातील.
समुद्रकिनाऱ्यावर खुल्यावर देखील चित्रपट दाखवले जाणार आहेत.
‘आदरांजली ’ विभागात पंधरा भारतीय आणि पाच आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश असेल.
विशेष आकर्षण यामध्ये 26 नोव्हेंबर रोजी शिमगोत्सव आणि 27 नोव्हेंबर 2022 रोजी गोवा कार्निव्हल यांचा समावेश आहे.
स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संकल्पनेवर सेंट्रल ब्यूरो ऑफ कम्युनिकेशन प्रदर्शन आयोजित करणार आहे.
ऑटिझम असलेल्या व्यक्तींसाठी स्मार्ट फोन फिल्ममेकिंग आणि व्हील चेअर वापरणाऱ्या व्यक्तींसाठी अभिनय अभ्यासक्रम, एफटीटीआय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था आयोजित करणार आहे.
हिंदी चित्रपटांचे अनेक भव्य प्रीमियर असतील यात त्या चित्रपटातील कलाकार सिनेमाला पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असतील. यामध्ये परेश रावल यांचा 'द स्टोरीटेलर', अजय देवगण आणि तब्बू यांचा 'दृश्यम 2', वरुण धवन आणि कृती सेनॉनचा भेडिया आणि यामी गौतमचा लॉस्ट या चित्रपटांचा समावेश आहे. आगामी तेलगू चित्रपट 'रायमो ', दीप्ती नवल आणि कल्की कोचलिन यांचा 'गोल्डफिश' आणि रणदीप हुडा आणि इलियाना डी’क्रूझचा 'तेरा क्या होगा लवली' या चित्रपटांचा प्रीमियर इफ्फी मध्ये होणार आहे. तसेच वधंधी, खाकी आणि फौदा सीझन 4 सारख्या ओटीटी शोच्या भागांचाही यात समावेश असेल
केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या पुढाकाराने सुरू झालेल्या ‘75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’ या उपक्रमाचे यंदा दुसरे वर्ष आहे. हा उपक्रम महोत्सवाचे आणखी एक आकर्षण असल्याचे महोत्सव संचालकांनी सांगितले. चित्रपट निर्मात्यांची संख्या ही भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचे प्रतीक आहे.
आंतराराष्ट्रीय चित्रपटांमधील 118 सेलिब्रिटी महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याबाबत पुष्टी करण्यात आली आहे, यामध्ये करजिस्तोफ जानूसी, लव डियाज, नादव लॅपिड, जिंको गोटोह, मॅडी हसन, जॉन लॉयड क्रूझ, जेनेसिस रॉड्रिग्ज, मार्क ओसबोर्न, जिओन क्यू ह्वान, डॅनियल गोल्डहॅबेर आणि नतालिया लोपेज़ गैलार्डो यांचा समावेश आहे अशी माहिती महोत्सव संचालकांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. 221 भारतीय चित्रपट सेलिब्रिटींनी देखील आपल्या उपस्थितीबाबत पुष्टी केली आहे. यामध्ये अजय देवगण, सुनील शेट्टी, वरुण धवन, कृती सेनॉन, प्रभुदेवा, मनोज बाजपेयी, नवाजउद्दीन सिद्दिकी, शेखर कपूर, राणा दग्गुबत्ती, मणिरत्नम, एआर रहमान, पंकज त्रिपाठी, परेश रावल अक्षय खन्ना, कल्की कोचलिन, यामी गौतम, दिनेश विजान, इलियाना डिक्रूज, आर बाल्की, अनुपम खेर आणि भूषण कुमार.यांचा समावेश आहे असे त्यांनी सांगितले .
उद्घाटन समारंभ 20 नोव्हेंबर 2022 रोजी गोव्यामध्ये तालेईगाव येथील डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे होणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटन सत्रातील रेड कार्पेट समारंभ संध्याकाळी 4.00 वाजता सुरु होईल, त्यानंतर संध्याकाळी 5.00 ते 9.00 दरम्यान प्रमुख उद्घाटन समारंभ होणार आहे. महोत्सवाच्या संचालकांनी माहिती दिली की उद्घाटन समारंभाचे प्रसारण हक्क माध्यम भागीदारांना देण्यात आले आहेत आणि सांस्कृतिक सादरीकरणांचा समावेश असलेला मनोरंजन विभाग वगळता उद्घाटन समारंभाचे चित्रीकरण केवळ दूरदर्शन या सार्वजनिक प्रसारण मध्यामा द्वारेच केले जाईल. मनोरंजन विभागाच्या चित्रीकरणाचे हक्क केवळ माध्यम भागीदारांसाठी राखीव आहे, तथापि, मनोरंजन विभागासह समारंभाचे निवडक चित्रीकरण त्याच दिवशी माध्यमांना उपलब्ध करून दिले जाईल. संपूर्ण कार्यक्रमाच्या स्थिर फोटोग्राफीला परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय माध्यमांना रेड कार्पेटवरील कार्यक्रमाचे वार्तांकन देखील करता येईल.
महोत्सवाचा सांगता समारंभ देखील नोव्हेंबर 28, 2022 रोजी गोव्यामध्ये तालेईगाव येथील डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे आयोजित केला जाईल. यामधील रेड कार्पेट समारंभ संध्याकाळी 4.00 वाजता सुरु होईल आणि त्यानंतर 4.45 ते 7.00 दरम्यान महोत्सवाचा सांगता समारंभ संपन्न होईल.
ईएसजी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वेतिका सचन यांनी माध्यमांना सांगितले की, गोवा विभागात चित्रपट प्रतिनिधींना 7 नॉन फीचर चित्रपट दाखवले जातील. यामध्ये अर्दो डिस, बिफोर आय स्लीप, द व्हाईट शर्ट, विंड चाइम्स, द व्हाईट ड्रीम, गोय स्वातंत्र्याचे होमखान आणि निमन्या डिस्क या सात चित्रपटांचा समावेश आहे. चित्रपट निर्माते विनोद गणात्रा; निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक इमो सिंग; आणि निर्माता आणि अभिनेता पम्पल्ली संदीप कुमार यांचा समावेश असलेल्या निवड समितीने एकूण 10 प्रवेशांमधून चित्रपट निवडले आहेत.
मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महोत्सवातील इतर आकर्षणांबद्दलही सांगितले, आपण येथे तपशील पाहू शकता.
पीआयबी च्या अतिरिक्त महा संचालक प्रज्ञा पालीवाल गौर यांनी माध्यमांना पीआयबी राबवणार असलेल्या सार्वजनिक संप्रेषण आणि माध्यम सुविधा व्यवस्थेची माहिती दिली. पालीवाल गौर यांनी माहिती दिली की 500 पेक्षा जास्त पत्रकारांनी माध्यम मान्यतेसाठी अर्ज केले आहेत आणि सुमारे 420 अर्जांवर प्रक्रिया करण्यात आली आहे. माध्यम प्रतिनिधी कार्ड वितरण यापूर्वीच सुरू झाले आहे असेही त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की, उत्सवाच्या विविध पैलूंबाबतचे फोटो आणि मल्टीमीडिया प्रेस रिलीझ / इफ्फी क्रॉनिकल्स, इंग्रजी, हिंदी, उर्दूआणि देशातील इतर प्रादेशिक भाषांमध्ये पीआयबी प्रकाशित करत आहे. पीआयबी माध्यम परिषदा म्हणजेच आपण ज्याला चित्रपट निर्माते आणि चित्रपट कर्मी आणि माध्यमे आणि महोत्सवाचे प्रतिनिधी यांच्यातील इफ्फी टेबल टॉक म्हणतो, ते आयोजित करत आहे. ही सत्रे पीआयबी इंडिया च्या युट्युब चॅनेलवरही थेट प्रक्षेपित केली जातील.
महोत्सवातील सार्वजनिक सहभाग, रुची आणि सहभाग वाढवा यासाठी पीआयबी समाज माध्यमांची जोड देत आहे. त्यासाठी आम्ही मिम्स आणि सानुकूल ध्वनी-चित्रफिती यासारख्या सृजनशील प्रकारांचा देखील वापर करत आहोत. पीआयबी, महोत्सवाचे एक ई-न्यूजलेटर इफ्फीलोईड (IFFILOID) देखील प्रकाशित करणार आहे. हा उपक्रम आम्ही इफ्फी 52 पासून सुरू केला.
#इफ्फी #IFFI #IFFI2022 #53IFFI #internationalfilmfestivalofIndia