Thursday, 23 April 2020

Remembering Satyajit Ray on his death anniversary


सत्यजित राय स्मृतिदिन
 23 एप्रिल,

सत्यजित राय हे ऑस्कर पुरस्कारविजेते भारतीय लेखक, पटकथालेखक, संगीतकार, निर्माते आणि दिग्दर्शक होते.

चित्रपट जगतातील त्यांच्या कामगिरीबद्दल इ.स. १९९२ मध्ये त्यांना जीवनगौरव ऑस्कर पुरस्कार देण्यात आला. ऑस्कर मिळवणारे ते एकमेव भारतीय दिग्दर्शक आहेत. त्यांनी अपु के वर्ष (इ.स. १९५० ते इ.स. १९५८) व इ.स. १९५५ मध्ये पथेर पांचाली या चित्रपटाची निर्मिती केली, अनेक अडचणींना तोंड देत अखेर हा चित्रपट पूर्ण करण्यात राय यशस्वी झाले. याचे पहिले प्रदर्शन न्यूयॉर्क येथील म्यूझियम ऑफ मॉडर्न आर्ट येथे झाले. चित्रपटाची आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रशंसा झाली. त्याचबरोबर काही ठिकाणी प्रखर टीकाही झाली. *पाथेर पांचालीला राष्ट्रपती सुवर्ण पदक आणि राष्ट्रपती रजत पदक याबरोबरच इतर अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये पुरस्कार मिळाले.* इ.स. २००५ मध्ये टाइम मासिकाच्या सर्वोत्कृष्ट १०० चित्रपटांमध्ये या चित्रपटाचा समावेश होता. यांनी एकूण ३७ चित्रपटांची निर्मिती केली.

चित्रपटनिर्मितीबरोबरच सत्यजित राय यांनी विपुल लेखनही केले. बंगाली साहित्यामध्ये त्यांनी गुप्तहेर फेलूदा आणि प्रा. शोंकू या दोन लोकप्रिय पात्रांची निर्मिती केली.

संदर्भ :
संस्कार भारती

No comments:

Post a Comment