असा सुरु आहे कोरोनाचा मुकाबला (निर्णयक्रम)
४ मार्च.
विमानतळ, बंदरावर तपासणीचे निर्देश.
मुंबईत कस्तुरबा रुग्णालय, बाळासाहेब ठाकरे ट्रामा केअर येथी विलगीकरण कक्ष.
केंद्र शासनाकडून वैद्यकीय अधिकाऱ्यांना प्रशिक्षण
राज्यात पीपीई कीट, एन-९५ मास्क, ट्रीपल लेअर मास्क आदी सुविधा मुबलक उपलब्ध.
५ मार्च.
राज्यात संशयीत रुग्ण नाही. नागरिकांनी भिती न बाळगता सतर्कता ठेवावी.
कोरोनाच्या चाचणी करण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर येथे सुविधा
आंतरराष्ट्रीय विमानातून येणाऱ्या सर्वच प्रवाशांची तपासणी.
सार्वजनिक होळीच्या सणाचा आनंद घेताना स्वरुप मर्यादित ठेवण्याचे आवाहन.
११ मार्च.
कोरोना विषाणू प्रतिबंधात्मक उपाययोजनांच्या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली विधानभवनात बैठक.
विमानतळ, बंदरांवरील यंत्रणा अधिक सतर्क कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज.
आरोग्य विभागासह विमानतळ, बंदरे, रेल्वे येथेही आवश्यक ती खबरदारीचे निर्देश.
नागरिकांनी सामुहीक कार्यक्रमांना गर्दी करणे टाळावे.
शाळा, महाविद्यालये तसेच धार्मिक कार्यक्रम यांचेबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात येणार.
खासगी रुग्णालयातील विशेषज्ञांनी यासंदर्भात सर्वसामान्यरित्या अवलंबवायची कार्यपद्धती (एसओपी) तातडीने तयार करावी.
जनजागृती करण्यासाठी सर्व गावांमध्ये ग्रामसभा घेण्यात याव्यात.
१२ मार्च
महाराष्ट्रात आढळलेल्या कोरोनाच्या 11 रुग्णांमध्ये तीव्र लक्षणे नाहीत.
प्रत्येक जिल्ह्यात नियंत्रण कक्ष सुरु करण्यात यावा.
केंद्र शासनाच्या सूचनेनुसार चीन, इराण, इटली, द.कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या 7 देशांमधून प्रवास केलेल्यांना शंभर टक्के क्वॉरंटाईन करण्यात यावे.
राज्यभरातील पर्यटनस्थळे, तीर्थस्थळे येथे गर्दी नियंत्रण करण्यात यावे.
यात्रा, शासकीय कार्यक्रम पूर्णपणे रद्द करावेत.
जे परदेशातून प्रवास करुन आले आहे त्यांनी 14 दिवसांपर्यंत घरीच थांबावे.
आंतरराष्ट्रीय विमानतळ असलेल्या शहरात विलगीकरण सुविधा तातडीने निर्माण कराव्यात.
१३ मार्च
कोरोनामुळे राज्यात मध्यरात्रीपासून संसर्गजन्य आजार टाळण्यासाठीचा कायदा लागू
खबरदारीसाठी व्यायामशाळा, चित्रपट, नाट्यगृहे,जलतरण तलाव बंद करण्याचा निर्णय
मुंबई, नवी मुंबई, पुणे, पिंपरी-चिंचवड, ठाणे, नागपूर येथील व्यायामशाळा, चित्रपट आणि नाट्यगृहे, जलतरण तलाव या महिना अखेरीपर्यंत बंद करण्याचा निर्णय.
पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथे दहावी व बारावीच्या परीक्षा वगळून शाळा, महाविद्यालये बंद राहतील.
१४ मार्च
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालय, अंगणवाड्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय.
राज्यभरातील माल्सही बंद ठेवणार.
कोरोनाच्या प्रतिबंध आणि उपचारासाठी जिल्हा नियोजन निधीतून साडे तीन टक्के निधी खर्चास मान्यता.
ऑर्थर रोड कारागृहातील संशयीत रुग्ण कैद्यांना क्वारंटाईन करणार. कैद्यांच्या तपासणीचे प्रमाण वाढविणार.
बनावट सॅनिटायझर, विकणाऱ्यांवर कठोर कारवाई.
सोशल मिडीयावर खोटा प्रचार करणाऱ्यांवरही सायबर पोलिसांच्या माध्यमातून कारवाई.
१५ मार्च
मास्क, सॅनिटायझरचा काळा बाजार केल्यास कारवाई.
कोरोना चाचणीसाठी कस्तुरबा रुग्णालयात अतिरिक्त यंत्रणा.
१६ मार्च
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यास सर्वोच्च प्राधान्य.
सर्वधर्मियांच्या प्रार्थनास्थळांवर भाविकांची गर्दी बंद करा राजकीय स्वरूपाचे कार्यक्रम, मेळावे थांबवा
सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नका, रेल्वेमधून, बसमधून अनावश्यक प्रवास टाळा.
केंद्र शासनाने ज्या सात देशांचा प्रवास करून आलेल्यांना सक्तीचे क्वारंटाईन करण्याच्या सूचना केल्या आहेत, त्यामध्ये दुबई, सऊदी अरेबिया, अमेरिका यांचा समावेश.
मंत्रालयात अभ्यागतांना प्रवेश न देण्याचा निर्णय.
कोरोना प्रतिबंधासाठी सर्व विद्यापीठे, महाविद्यालये ३१ मार्च पर्यंत बंद.
नियोजित परीक्षा ३१ मार्च नंतर घेण्याचा निर्णय.
१७ मार्च
शासकीय कार्यालये, सार्वजनिक वाहतूक बंद राहणार नाहीत
अनावश्यक गर्दी, प्रवास टाळण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन.
मंत्रालयासह शासकीय कार्यालये बंद करण्यात येणार नाहीत. मात्र, परिस्थितीचा सातत्याने आढावा घेण्यात येत असून याविषयी योग्य तो निर्णय वेळोवेळी घेण्यात येईल.
सध्या अत्यावश्यक नसलेल्या सेवांना शासनाने मर्यादित स्वरुपात काम करण्यास सांगितले आहे.
खासगी क्षेत्रातील कंपन्यांकडून वर्क फ्राम होम कार्यपद्धती मान्य.
रास्तभावन धान्य दुकानात ई-पास उपकरणावर बोट अंगठा लावण्याची आवश्यकता नाही.
महावितरणाच्या ऑनलाईन सेवांचा वापर करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन.
विद्यापीठ, महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना परिस्थितीनुसार वर्क-फ्राम-होम प्रमाणे काम करण्याचे निर्देश.
राज्य निवडणूक आयोगाकडून सर्व निवडणूक प्रक्रिया स्थगित.
तुरुंग प्रशासनाला सज्जतेचे निर्देश, नव्याने भरती होणाऱ्या बंद्याचे स्क्रीनिंग करण्याचे निर्देश.
सॅनिटायझर, मास्क उपलब्ध करून देण्याचे आवाहन, साठेबाजी करण्यास मनाई.
कुक्कूटपालन उत्पादनांबाबत अफवा पसरविणाऱ्यांवर कारवाईचे निर्देश.
१८ मार्च
शासकीय कार्यालये एक दिवसाआड पद्धतीने रोज 50 टक्के कर्मचारी येतील.
रेल्वे, एसटी बसेस, खाजगी बसेस, मेट्रो ही सार्वजनिक वाहतूक व्यवस्थाही 50 टक्के प्रवासी क्षमतेने चालविण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना. मुंबईमध्ये बेस्टमधील उभे राहणारे प्रवाशी बंद करण्यात येतील.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आवश्याक खर्चाच्या आर्थिक निर्बंधातून सूट देण्याचा वित्त मंत्रालयाचा निर्णय.
जीवनावश्यक वस्तुंचा काळाबाजार, साठेबाजी करणाऱ्यांवर कठोर कारवाईचे निर्देश.
राज्यात नव्याने आठ ठिकाणी कोरोना स्त्राव नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळा सुरु करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे सुतोवाच.
कोरोनासंदर्भात दिशाभूल करणाऱ्या जाहिरातदारांवर कडक कारवाईचे अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांचे निर्देश.
गावी जाण्याची सोय होईपर्यंत विद्यार्थ्यांना वसतिगृह सोडण्याची सक्ती न करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांचे निर्देश.
कोरोना आपत्ती निवारणासाठी विभागीय आयुक्तांना ४५ कोटी रुपयांचा निधी वितरीत.
१९ मार्च
‘वॉर अगेंस्ट व्हायरस’ आपण निश्चित जिंकणार.
जनतेने गर्दी करणे बंद करा, सूचनांचे पालन करा
पंतप्रधान आणि केंद्रीय आरोग्यमंत्र्यांशी यासंदर्भात बोललो असून त्यांनी राज्याला पुरेपूर सहकार्य केले जाईल हे सांगीतले आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सोशल मिडियावरून लाईव्ह प्रसारणाद्वारे सांगितले. जनतेने घाबरून जाऊन जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा.
आयकर परतावा भरण्यासाठी मुदत वाढवून देण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती.
मुख्यमंत्र्यांनी सिंगापूर दुतावासाशी संपर्क साधून, विमानतळावर अडकलेल्या भारतीय विशेषतः महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांच्या चमुच्या परतण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश.
स्वस्त धान्य दुकानात एप्रिल सोबतच मे, जूनचे धान्य उपलब्ध.
आठवडाभरात १३३० खाटांची क्षमता असलेले विलगीकरण कक्ष कार्यान्वित होणार.
विनापरवाना तसेच बनावट सॅनिटायझरची विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करणार.
एमसीएईटीची २८ मार्च रोजी होणारी परीक्षा ३० एप्रिल रोजी होणार
एसटी प्रवासासाठी ज्येष्ठांच्या स्मार्टकार्डला एक महिन्याची मुदतवाढ.
२० मार्च
शासकीय कार्यालयांतील उपस्थिती 25 टक्क्यांवर
मुंबई, पुणे, नागपूर मधील जीवनावश्यक वस्तू वगळता सर्व दुकाने आज मध्यरात्रीपासून कार्यालये बंद
मुंबई महानगर क्षेत्र, पुणे- पिंपरी चिंचवड, नागपूर येथील सर्व दुकाने, आस्थापना व खासगी कार्यालये 31 मार्चपर्यंत बंद करण्याची घोषणा.
चाचणी केंद्रे आणि प्रयोगशाळा यांच्या सध्याच्या क्षमतेत वाढ करण्याची गरज असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे मागणी.
महानगरातील सर्व खासगी दुकाने, आस्थापना दि. 31 मार्च पर्यंत बंदचे निर्देश सर्व बँका तसेच रिझर्व बँक ऑफ इंडिया नियंत्रित वित्तीय संस्था यांना लागू नाही.
कोरोना प्रतिबंधक उपचाराचा गोल्डन अवर सुरु, यंत्रणांनी सतर्क रहावे, मुख्यमंत्र्यांचे आवाहन.
कोरोनाच्या अनुषंगिक साहित्य खरेदीचे सर्व अधिकार विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांना प्रदान.
पहिली ते आठवीपर्यंतच्या परीक्षा रद्द.
नववी ते अकरावी वर्गांच्या परीक्षा पंधरा एप्रिलनंतर घेण्यात येणार.
शिक्षकांनाही घरीच बसून वर्क फ्राम होम काम करण्याची अनुमती.
दहावी व बारावीचे पेपर घरी तपासणीचा निर्णय घेणार.
मास्क सॅनिटायझर्सची विनापरवाना विक्री करणाऱ्यांवर प्रशासनाची धडक कारवाई.
२१ मार्च
कोरोना संकटात कंत्राटी, तात्पुरत्या कामगारांचे वेतन न कापण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन.
राज्याच्या कामगार विभागाची सर्व कारखाने व व्यवसायांना निर्देश.
मंत्रालयात करोना नियंत्रण कक्ष
उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील समस्या समजून घेण्यासह मदत कार्यात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या संस्था, व्यक्तींना मार्गदर्शन करण्यासाठी मंत्रालयात करोना नियंत्रण कक्षाची स्थापना.
दहावीच्या सोमवारी होणाऱ्या विषयाची परीक्षा स्थगित.
२२ मार्च
फेसबुक “लाईव्ह” प्रसारण
आज मध्यरात्रीपासून राज्यात १४४ कलम लागू
महाराष्ट्रातल्या सर्व नागरी भागात १४४ कलम लावण्यात येत आहे. ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येऊ नका.
रेल्वे, खासगी बसेस , एस टी बसेस बंद.
जीवनावश्यक आणि अत्यावश्यक कारणांसाठीच शहरांतर्गत बस सेवा सुरु राहील
अन्न धान्य, भाजीपाला, औषधे ही दुकाने सुरूच राहतील
शासकीय कार्यालयात आता केवळ ५ टक्के कर्मचारीच उपस्थिती.
मध्यरात्रीपासून आंतरराष्ट्रीय विमाने बंद.
कोरोना विरुद्धच्या लढाईत दिवस रात्र काम करणाऱ्या वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी, डॉकटर्स, रुग्णवाहिका चालक, पोलीस कर्मचाऱ्यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, श्रीमती रश्मी ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून टाळ्या वाजवून गौरव.
मीच माझा रक्षक संदेशाचे प्रत्येकाने पालन करण्याचे आरोग्यमंत्र्यांचे आवाहन.
मुंबई आणि पुणे येथील तपासणी केंद्रांना मान्यता. बावीसशे नमुने तपासण्याची क्षमता.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महावितरणच्या दैनंदिन कार्यपद्धतीत बदल करण्याचे आदेश.
अत्यावश्यक सेवेसाठी एसटी महामंडळाची मदत. मुंबई शहरातील अत्यावश्यक सेवा देणाऱ्या घटकांच्या वाहतुकीसाठी एसटी. महामंडळ आणि बेस्टवर जबाबदारी.
२३ मार्च.
आरोग्य यंत्रणेवर लक्ष केंद्रीत करा मुख्यमंत्र्यांच्या विभागीय आयुक्तांना सुचना
संपूर्ण राज्यात संचारबंदी लागू, लोकहितासाठी कठोर निर्णय.
जिल्ह्यांच्या सीमा देखील बंद.
काल राज्यात १४४ कलम लावले होते आता राज्यात संचार बंदी.
महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत बंदी आदेश, अधिसूचना जारी
जे. जे. रुग्णालयात कोरोनाच्या चाचणी व उपचारासाठी तयारी पूर्ण.
२४ मार्च.
संकटात संधी शोधू नका, मुख्यमंत्र्यांचा साठेबाजांना इशारा, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरूच राहणार.
कोरोना प्रतिबंधासाठी जिल्हास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन.
अत्यावश्यक सेवा, बजावणाऱ्या शासकीय व खासगी कर्मचाऱ्यांच्या वाहतुकीसाठी एसटी आणि बेस्टची सेवा.
अखंडीत वीजपुरवठा देण्यासाठी ऊर्जामंत्र्यांचे निर्देश.
धुळे-नंदूरबार विधान परिषदेची पोटनिवडणूक पुढे ढकलली.
अन्न व औषध प्रशासन विभागाचा नियंत्रण कक्ष स्थापन.
कोरोनाविषयी अधिकृत माहितीसाठी राज्यशासनाचा व्हाटस अप ग्रुप
प्रधानमंत्र्यांच्या लाकडाऊन घोषणेचे पालन परंतु दूध, भाजीपाला, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कायम राहाणार.
२५ मार्च.
घरी राहा, सुरक्षित राहा, मुख्यमंत्र्याचे आवाहन, जीवनावश्यक वस्तू उपलब्ध, अत्यावश्यक सेवा, दुकाने सुरु राहणार.
एसीचा वापर टाळण्याचे आवाहन.
राज्यात १४ एप्रिल पर्यंत लाकडाऊन, सुधारित अधिसूचना जारी.
राज्यभरात २२ हजार ११८ खोल्यांची सज्जता, ५५ हजार ७०७ खाटांची सोय.
आरोग्याशी निगडीत साहित्य पुरविण्यासाठी उद्योगांना पुढे येण्याचे आवाहन.
२६ मार्च
नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास उघडी ठेवणार.
जीवनावश्यक वस्तू घरपोच सोसायटीपर्यंत पोहोचविण्याचे नियोजनाचे आवाहन.
राज्यातील मालवाहू ट्रक वाहतुकीला परवानगी, खासगी संस्थांद्वारे कम्युनिटी किचनचा निर्णय.
कोरोनाच्या संकटातून मुक्त झाल्यावरच रेडीरेकनर दर जाहीर होणार.
कृषी व पूरक उद्योगांशी संबंधित वाहतूक सुरळीत सुरु राहणार.
राज्यातील ८ खासगी प्रयोगशाळांना कोरोना तपासणी केंद्र म्हणून मान्यता.
भाजीपाला वाहतूक विना अडथळा सुरु राहणार.
कोकण विभागात जीवनावश्यक वस्तूंच्या वाहतूक नियंत्रणासाठी वार रुमची स्थापना.
डाक्टर, आरोग्य कर्मचारी यांना घर सोडण्यास सांगितल्यास घर मालक, हौसिंग सोसायटीवर कारवाई होणार.
खासगी वैद्यकीय व्यावसायीकांनी दवाखाने बंद न ठेवण्याचे आवाहन. परराज्यातील नागरिकांची काळजी घेणार.
केंद्राने जाहीर केलेल्या पॅकेजप्रमाणे राज्यातील लाभार्थींना लाभ देण्याचे मुख्यमंत्र्यांचे यंत्रणांना निर्देश.
कोरोना चाचणीसाठी राज्यातील सहा वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये साधन सामुग्री उपलब्ध.
नवी मुंबई, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे कामकाज पुर्ववत सुरु.
२७ मार्च.
हाटेलमधील पदार्थ घरपोच करण्यासह, अंडी, कोंबडी, मटण मासेविक्रीला परवानगी.
सुरक्षितता बाळगून आंबा, द्राक्षे, संत्री, केळी फळ विक्रीसही मान्यता.
ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट त्रिसुत्रीनूसार कोरोनाचा प्रतिबंध करणार.
राज्यातील सर्व दिव्यांगाना महिन्याचे रेशन, स्वच्छता किट घरपोच मिळणार. एक महिन्याचे पेन्शन आगाऊ देण्याचा निर्णय. बँकेतील व्यवहारही होणार रांगेशिवाय.
जे. जे. समूह रुग्णालयातील कोरोना रुग्णालयांसाठी नोडल अधिकारी म्हणून विनिता सिंघल यांची नियुक्ती.
लॅटव्हियामध्ये अडकलेल्या ३७ भारतीय विद्यार्थ्यांच्या परतीच्या प्रवासासाठी प्रयत्न सुरू.
मासे, मत्स्यबीज व मत्स्यखाद्याच्या वाहतूकीस परवानगी.
राज्यातील गरीब, कष्टकरी जनतेला अन्नधान्याचा व्यवस्थित पुरवठा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
शिवभोजन केंद्राचे उद्दीष्टात वाढ. दुध संकलन व्यवस्थित व्हावे यासाठी निर्देश. रक्तदान शिबिरे घेण्याचे आवाहन.
विदर्भ, मराठवाड्यातील केसरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात अन्नधान्य.
२८ मार्च
मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड-१९ नावाने स्वतंत्र बँक खाते, मदत जमा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन.
मजूर, कामगारांनी स्थलांतर करू नये, आरोग्य, जेवण व निवासाची व्यवस्था शासन करणार- मुख्यमंत्र्यांचा दिलासा.
कोरोना बाधितांवार आता महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून मोफत उपचार होणार.
बाल संगोपन संस्थांमधील बालकांची विशेष काळजी घेण्याचे बालविकास मंत्र्यांचे निर्देश.
अत्यावश्यक सेवा देणाऱ्या वाहनांसाठी ऑनलाईन ई-पासची सुविधा उपलब्ध होणार.
२९ मार्च
परराज्यातील कामगार, कष्टकरी यांची पूर्ण काळजी घेणार. कोरोना विरोधातील लढ्यातील महत्त्वाचा टप्पा सूरू. अजूनही गर्दी कमी करा अन्यथा कठोर पावले उचलण्याचा मुख्यमंत्र्यांचा इशारा.
मिरज शासकीय वैद्यकीय रुग्णालयाचे कोरोना रुग्णालयात रुपांतर.
कोरोनाच्या संकटात केवळ पाच रुपयांत शिवभोजन. शहरांसोबतच तालुकास्तरावरही रोज एक लाख शिवभोजन थाळी देण्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांचे निर्देश.
लाकडाऊनमुळे अडकलेल्या आदिवासी बांधवासाठी अन्न व निवाऱ्याची सोय करण्याचे आदिवासी विकास मंत्र्यांचे निर्देश.
गरजू, गरीब आणि कामगार यांच्यासाठी निवास-भोजन व्यवस्था करण्याचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना शासनाचे निर्देश.
कोरोनाच्या प्रतिबंधासाठी राज्य, जिल्हा, महापालिकास्तरावर नियंत्रण समित्या कार्यान्वित.
स्थलांतरित कामगार, बेघरांना सुविधा देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांना आपत्ती व्यवस्थापन निधीतून खर्च करण्यास मान्यता.
कोरोनाच्या अनुषंगाने मालवाहतूक करणाऱ्या वाहनांवरील पथकर वसुली आज मध्यरात्रीपासून बंद.
ऊसतोड मजुरांना निवास, भोजनासह, आरोग्य सुविधा पुरविण्याचे शासनाचे साखर कारखान्यांना आदेश.
३० मार्च.
मुख्यमंत्री सहायता निधीकडे ओघ सुरू, साडे बारा कोटी जमा, तर दहा कोटींची वैद्यकीय उपकरणांचे योगदान.
जंतूनाशकांची फवारणी आवश्यकतेनुसार पालिकाच करणार, सोयायट्यांनी फवारणी करू नये. नियंत्रण कक्षाच्या बैठकीत निर्णय.
विस्थापित कामगारांच्या व्यवस्थेसाठी मुख्यमंत्र्यांनी केला ४५ कोटी रुपयांचा निधी मंजूर.
जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्याबाबत चोवीस तास मदत कार्य, तत्काळ संपर्काचे आवाहन.
बांधकाम कामगारांच्या मध्यान्ह भोजनाची तातडीने व्यवस्था करण्याचे कामगार मंत्र्यांचे निर्देश.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर विद्यार्थ्यांना ऑनलाईन अध्यापन करण्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्याचे निर्देश.
पुढील पाच वर्षांसाठी वीज दरात भरघोस कपात करण्याचे राज्य नियामक आयोगाची घोषणा.
कोरोनाच्या मुकाबल्यासाठी केंद्राकडे २५ हजार कोटींचे विशेष पॅकेज देण्याची मागणी.
३१ मार्च.
मुंबईत कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रय़त्न.
मुख्यमंत्री सहाय्यता निधी – कोविड – १९ हे स्वतंत्र बँक खाते सुरु.
स्थलांतरितांसाठी एक हजार केंद्रे स्थापन, सुमारे सव्वादोन लाख मजुरांची व्यवस्था.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात कपात नाही. मार्चचे वेतन दोन टप्प्यात देणार.
राज्यात दररोज १० लाख लिटर्स दुधाची पंचवीर रुपये दराने खरेदी करण्याची वित्त मंत्र्यांची घोषणा.
कोरोनाच्या चाचण्यांची महाराष्ट्रात सर्वाधिक सुविधा, दिवसाला होऊ शकतात साडेपाच हजार चाचण्या.
राज्यात कोरोना निदान करणाऱ्या २३ प्रयोगशाळा कार्यान्वित.
कोरोना प्रतिबंधासाठी कार्यरत ग्रामपंचायत, अंगणवाडी कर्मचारी, आशा कार्यकर्ती यांना एक हजार रुपये प्रोत्साहनपर भत्ता.
१ एप्रिल
दिल्लीसारख्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी कोणतेही धार्मिक सण, उत्सव, मेळावे होणार नाहीत.
मरकजमधील सहभागी नागरिकांनी पुढे येऊन तपासणी करण्याचे आवाहन.
ज्येष्ठ नागरिक, दिव्यांगाना घरपोच वस्तू देण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे निर्देश.
राज्यातील अंत्योदय, प्राधान्य कुटुंब योजनेंतर्गत लाभार्थ्यांना तीन महिन्यांच्या कालावधीत मोफत तांदूळ वाटप करण्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांचे निर्देश.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आता डिजिटल प्लॅटफार्म.
हरभरा खऱेदीसाठी नोंदणी प्रक्रियेच्या कालावधीत वाढ.
२ एप्रिल
दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमामधील राज्यातील सहभागी नागरिकांना क्वारंटाईन करणे सुरु.
सर्वधर्मीय गुरुंना आवाहनाची मुख्यमंत्र्यांची सूचना पंतप्रधानांनी स्वीकारली.
वसईतील तबलिगी संमेलनास वेळीच परवानगी नाकारल्याची गृह मंत्र्यांची माहिती.
राज्यात कोरोना उपचारासाठी ३० विशेष रुग्णालये आरोग्यमंत्र्यांची घोषणा.
लाकडाऊनमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या मच्छिमारांसाठी विशेष मदत देण्याचा केंद्राचा विचार.
कोरोनाचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी ऑनलाईन स्व-चाचणी टूल.
क्लस्टर कंटेनमेंट कृती योजनेसाठी राज्यात २ हजार ३३३ पथके सज्ज आरोग्यमंत्र्यांची माहिती.
३ एप्रिल.
कर्तव्य बजावताना कोरोनामुळे मृत्यु झाल्यास पोलिसांच्या कुटुंबाला ५० लाखांचे सानुग्रह अनुदान देण्याची वित्त मंत्र्यांची घोषणा.
कोरोना प्रतिबंधक मास्क, टेस्टींग व पीपीई किटस्, व्हेंटिलेटर्सवरील जीएसटी माफ करण्याची उपमुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी.
क्लस्टर कटेंनमेंट कृती योजनेंतर्गत राज्यभरात सव्वा नऊ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण.
४ एप्रिल
कोरोनाच्या परिस्थितीत समाजामध्ये दुही माजविणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचा कडक इशारा.
जयंती, सण उत्सव, पूजा-अर्चा, प्रार्थना घरातच करण्याचे उपमुख्यमंत्र्यांचे आवाहन.
कोरोना मुकाबल्यासाठी सव्ला लाख आयुष डाक्टरांना प्रशिक्षण देणार
कामगारांच्या अडचणींचे निराकारण करण्यासाठी संपर्क अधिकाऱ्यांची नियुक्ती.
५ एप्रिल
राज्यात जीवनावश्यक वस्तूंची आणि औषधांची कोणतीही टंचाई नाही, जादा दराने वस्तू विकणाऱ्या दुकानदारांना शासनाचा कारवाईचा इशारा.
मंत्रालयात मास्क वापरणे बंधनकारक, अन्यथा प्रवेश नाही
६ एप्रिल
कोरोना संक्रमण थांबविण्याबाबत राज्यपालांचा विभागीय आयुक्त, जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद.
कोरोना प्रतिबंधासाठी सव्वातीन लाख पीपीई किटस्, मास्क, व्हेंटीलेटर्सची केंद्र शासनाकडे मागणी.
आरोग्यमंत्र्यांच्या पुढाकारातून तबलिगी धर्मगुरूंची बैठक, प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन.
राज्यात १ लाख ६३ हजार मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप.
विद्यापीठांमध्ये टेस्टिंग लँब सुरु करण्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांच्या सूचना.
जिल्हानिहाय व संस्थानिहाय कोविड-१९ निदान व तपासणी प्रयोगशाळा जाहीर.
राज्यात सर्वत्र मीठाचा पुरेसा पुरवठा.
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा.
७ एप्रिल
मंत्रिमंडळ निर्णय
o केशरी शिधापत्रिका धारकांना एप्रिल ते जून २०२० कालावधीत सवलतीच्या दराने अन्नधान्य.
o कोविडच्या अनुषंगाने धर्मादाय संस्थांकडून आर्थिक पाठबळ मिळण्यासाठी महाराष्ट्र विश्वस्त व्यवस्था अधिनियमात सुधारणा.
o शिवभोजन – तालुकास्तरावर विस्तार आणि पुढील तीन महिन्यांसाठी पाच रुपये दरात थाळी देणार.
o कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना मान्यता.
धारावी झोपडपट्टीतील क्वारंटाईन सुविधा, उपचार विशेष रुग्णालयाची आरोग्यमंत्र्यांकडून पाहणी.
कोरोना प्रतिबंधासाठी राज्य शासनाच्या उपाययोजनांच्या माहितीसाठी mahainfocorona.in संकेतस्थळ कार्यान्वित, माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचा पुढाकार.
आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांचे आवाहन, शासनासोबत कोरोना प्रतिबंधात्मक युद्धात सहकार्य करण्यासाठी कोरोनोयोद्धा म्हणून पुढे यावे.
लाँकडाऊन कालावधीत रक्ताचा तुटवडा भासणार नाही- अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांची ग्वाही.
शालेय विद्यार्थ्यांसाठी लर्न फ्राम-होम सुविधा- शालेय शिक्षण मंत्र्यांची घोषणा.
आयसीटीकडून सॅनिटायझर टनेलची निर्मिती- उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती.
बाजारसमित्यांनी भाजीपाला, फळे यांचा पुरवठा सुरळीत ठेवण्याच्या पणन मंत्र्यांच्या सूचना.
८ एप्रिल.
प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेतील मोफत तांदळाचे वाटप सुरु, २३ लाख क्विंटल धान्याचे वाटप.
महाराष्ट्र कोरोना संसर्गाच्या तिसऱ्या टप्प्यात नाही – आरोग्यमंत्र्यांची माहिती.
ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, संगणक परिचालकांना २५ लाख रुपयांचे विमा संरक्षणाची ग्रामविकास मंत्र्यांची घोषणा.
कोरोना संकटावर मात करण्यासाठी सहकारी संस्थांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत करण्याचे सहकार मंत्र्यांचे आवाहन.
कोविड-१९ प्रतिबंधासाठी प्राणी संग्रहालये, व वन्य प्राणी बचाव केंद्रांनी अधिक दक्षता घेण्याचे वनमंत्र्याचे निर्देश.
हाफकिनकडून प्रमाणित पीपीई किट, एन९५ मास्क विक्रीला परवानगी.
बारावी अभ्यासक्रमाचे साहित्य आता बालभारतीच्या संकेतस्थळावर उपलब्ध.
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर समाज माध्यमांमध्ये आक्षेपार्ह मजकूर पाठविणाऱ्या १३२ जणांवर गुन्हे.
मुंबई व पुणे महानगर क्षेत्रात सर्व शासकीय कार्यालयात मास्क घालणे बंधनकारक.
आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांनी पुढे येऊन नावे नोंदवावीत- कोरोनायोद्धाबाबत मुख्यमंत्र्यांचे आवाहन.
९ एप्रिल
मंत्रिमंडळ निर्णय
o राज्यपाल नियुक्त एका जागेसाठी शिफारस
o आर्थिक पुनरुज्जीवनासाठी दोन समित्या नेमण्याचा निर्णय
o सर्व विधीमंडळ सदस्यांच्या वेतनात ३० टक्के कपात.
o महाराष्ट्र दिनी ध्वजारोहण साधेपणाने करणार.
o निवारा केंद्रांमध्ये भोजनाची क्षमता वाढविण्यास, चांगल्या सुविधा देण्याबाबत निर्णय.
उद्योग क्षेत्रापुढील समस्या सोडविण्यासाठी शासन कटीबद्ध, उद्योजकांसोबत उद्योगमंत्र्यांचा व्हीसीद्वारे संवाद.
मास्कचा वापर आवश्यक व अनिवार्य – गृहमंत्र्यांचे निर्देश.
१० एप्रिल.
राज्यातील पुरवठा अधिकाऱ्यांसोबत अन्न, नागरी पुरवठा मंत्र्यांचा व्हिसीद्वारे संवाद, विभागाची जबाबदारी अत्यंत महत्त्वाची, चांगल्या नियोजनाचे निर्देश.
कोरोना प्रादुर्भाव टाळण्यासाठी बाधित क्षेत्रातील पाच कारागृहे लाऍकडाऊन- गृहमंत्र्यांची माहिती.
कोविड संशयित मृत्यू- पोलिस यंत्रणेला चौकशी न करण्याची मुभा.
नांदेड, औरंगाबाद, जालना, लातूर, अमरावती येथे कोरोना चाचण्यांची सुविधा देण्याची आरोग्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी.
११ एप्रिल
मा. मुख्यमंत्र्यांचा मा. प्रधानमंत्र्यांशी व्हिसीद्वारे संवाद. राज्यातील परिस्थिती व उपाययोजनांची दिली माहिती.
महाराष्ट्रात ३० एप्रिलपर्यंत लाँकडाऊन- मुख्यमंत्र्याची घोषणा – तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, मुख्यमंत्र्यांचे आवाहन.
स्वयंसेवी संस्थांना अल्पदरात अन्नधान्य उपलब्ध करून देणारी केंद्र शासनाची ओएमएसएस योजना राज्यात लागू केल्याची अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांची घोषणा.
व्हाँटसअँप एँप मार्गदर्शिका प्रकाशित, समाजमाध्यमे हाताळताना विशेष दक्षता घेण्याचे गृहमंत्र्यांचे आवाहन.
कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालयांची त्रिस्तरीय वर्गवारी.
रेशनिंगविषयी तक्रार आणि माहितीसाठी हेल्पलाईन कार्यान्वीत.
केंद्रीय पथकाकडून पुणे विभागाच्या कोरोना परिस्थितीचा आढावा.
कुठल्याच अनुज्ञप्तींना ऑनलाईन मद्य विक्रीची परवानगी नसल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे स्पष्टीकरण.
१२ एप्रिल.
मुख्यमंत्री सहायता निधीत ओघ, १९७ कोटी रुपये जमा.
स्थलांतरित कुटुंबांना रेशन देण्यासाठी महसूल यंत्रणा काम करणार-महसूल मंत्र्यांचे निर्देश.
लाँकडाऊन काळात महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर अधिक कठोर कारवाई करणार-गृहमंत्री.
दहावीचे भूगोल, कार्यशिक्षण पेपर रद्द. नववी आणि अकरावीची परीक्षा रद्द.
ससून रुग्णालयात मेडिकल गॅस पाईपलाईनचे काम विक्रमी ११ दिवसात पूर्ण.
राज्यातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कोविड-१९ तपासणी प्रयोगशाळा सुरु करण्याची वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांची माहिती.
१३ एप्रिल.
मुंबईतील नामवंत डाक्टर्स, कोरोना लढाईत शासनाबरोबर टास्क फोर्स, हाँटलाईनद्वारे मार्गदर्शन करणार- मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद.
शेतमालावर प्रक्रिया करणारे उद्योग सुरु करावेत, औद्योगीक स्थितीचा उद्योगमंत्र्यांकडून आढावा.
प्रसारमाध्यमांतील सक्रीय पत्रकारांची कोविड-१९ चाचणी करण्याचे उद्योगमंत्र्यांचे निर्देश.
कोविड-१९ प्रमाणेच ‘सारी’ आजाराच्या नियंत्रणासाठी शासन सज्ज.
केंद्र सरकारकडून खरेदी केल्या जाणाऱ्या धान्यासाठी सवलत देण्याची अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांची मागणी.
समाज माध्यमांचा गैरवापर केल्यास कठोर कारवाईचा गृहमंत्र्यांचा इशारा.
चंद्रपूरमध्ये अडीच कोटी रुपयांची कोरोना प्रयोगशाळा-मदत व पुनर्वसन मंत्र्यांची घोषणा.
विद्यापीठाच्या कोणत्याही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय नाही – उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती.
निर्जंतुकीकरणासाठी अतिनील किरणांची टाँर्च निर्मिती – उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांची माहिती.
१४ एप्रिल.
परराज्यातील मजूर, कामगारांनी संयम ठेवावा, राज्य सरकार पूर्ण काळजी घेणार, परिस्थितीचे राजकारण न करता एकत्र लढा देऊ या – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला प्रतिसाद, वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित २१ हजार जणांचे कोरोना लढ्यात सहभागी होण्यासाठी अर्ज.
कोरोना संकटाच्या प्रभावी मुकाबल्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्री उपसमिती स्थापन.
अर्थव्यवस्था पुनरूज्जीवनाच्या उपाययोजना सुचविण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन, अर्थमंत्र्यांची माहिती.
कोरोनामुळे होणारे मृत्यू रोखण्यासाठी राज्यात दोन समित्यांची नियुक्ती-आरोग्यमंत्र्यांची माहिती.
लाँकडाऊन हाताळण्यासाठी पोलिसांना आधुनिक ड्रोनची मदत-गृहमंत्र्यांची माहिती.
राज्यात १४० लाख हेक्टरवर खरीपाचे नियोजन, ३० एप्रिलपर्यंत नियोजन पूर्ण करण्याचे कृषीमंत्र्यांचे निर्देश.
घरपोच पोषण आहार, पुरवठा सुरळीत महिला व बालविकास मंत्र्यांची माहिती.
राज्यात अडकलेल्या विदेशी पर्यटकांना पर्यटन संचालनायाची मदत, पाच पर्यटक मायदेशी परत.
१५ एप्रिल.
कोरोनाचा मुंबई-पुण्यातील आलेख खाली आणायचाय, मुख्यमंत्र्यांची कार्पोरेट रुग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा.
लाकडाऊनच्या काळात शेतीशी निगडीत व्यवसायांना सूट
जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा होऊ नये यासाठी सहकार्य करण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांचे आवाहन.
शेतकरी हितासाठी विविध निर्णय आवश्यक – महिला व बालविकास मंत्र्यांची अपेक्षा.
१६ एप्रिल.
राज्यातील कोरोना रुग्णांच्या दुपटीचा वेग दोनवरून सहा दिवसांवर, चाचण्यांपैकी निम्म्या मुंबईत – आरोग्यमंत्र्यांची माहिती.
केंद्राच्या मार्गदर्सक सूचनांनुसार राज्यातील उद्योग सुरु होणार- उद्योगमंत्र्याची माहिती.
कोविडसंदर्भात डाँक्टरांचा सल्ला घ्या, टेलिमेडीसीनद्वारे. राज्य शासनाची कोविड मदत हेल्पलाईन.
१७ एप्रिल.
अटी व शर्तींच्या अधीन राहून औद्योगिक, व्यावसायीक उपक्रम सुरु, सुधारित मार्गदर्शक आदेश जारी. लोकांना अत्यावश्यक सेवा जीवनावश्यक वस्तू विना अडथळ मिळत राहतील- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
मंत्रीमंडळ उपसमितीचे निर्णय
o प्राँपर्टी व्यवहारांच्या नोंदणीस परवानगी.
डीपीसीचा २५ टक्के निधी आरोग्यासाठी.
o अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना त्वरीत वेतन.
कोरोनाविरुद्ध लढाईत महाराष्ट्राला आर्थिक सहकार्य करावे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रधानमंत्र्यांकडे मागणी.
रेशनिंगचे धान्य वाटप विनातक्रार होण्यासाठी पालकमंत्र्यांनी व्यक्तीशः लक्ष घालण्याचे उपमुख्यमंत्र्याचे आवाहन.
घरभाडे वसूली तीन महिने पुढे ढकलावी, गृहनिर्माण मंत्र्यांचे आवाहन.
हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांकडून हेक्टरी ११.२९ क्विंटल हरभरा खरेदी होणार.
मानक कार्यप्रणाली सुरु करणाऱ्या बाजार समित्यांचे व्यवहार २१ एप्रिलपासून सुरू करण्याची परवानगी द्यावी.
१८ एप्रिल.
मुद्रित माध्यमांना टाळेबंदीतून सूट, घरोघर वितरणावर मात्र बंदी.
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगारांना दोन हजार रुपयांचे आर्थिक सहाय्य रक्कम थेट बँक खात्यात – कामगार मंत्री दिलीप वळसे पाटील
कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करूनच शेती, बँकिंग, उद्योग, व्यापाराला मर्यादित परवानगी- उपमुख्यमंत्र्यांची माहिती.
कोरोना उपचारांसाठी विशेष रुग्णालयांची संख्या दुप्पट, ६ हजार ६६० खाटांची उपलब्धता, राज्यात ५५ विशेष रुग्णालये अधिसूचित –आरोग्यमंत्र्याची माहिती.
राज्यात २० एप्रिलपासून कापूस खरेदी सुरु होणार – सहकार व पणन मंत्र्यांची माहिती.
सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना कोविड-१९ तपासणी केंद्रांची मान्यता.
अंगणवाडीतील बालकांना घरपोच शिधा, पंधरा दिवसांत १०० टक्के पुरवठा करण्याचे महिला व बालकल्याण मंत्र्यांचे आवाहन.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातील पाणीपुरवठा केंद्रात कार्यरत कर्मचाऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता व २५ लाखांचे विमा संरक्षण- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्र्यांची घोषणा.
रमजान मध्ये मुस्लिम बांधवांनी घऱातच रोजा इफ्तार, तरावीह पठण करण्याचे अल्पसंख्याक विकास विभागाचे आवाहन.
१९ एप्रिल.
काही प्रमाणात उद्योग व्यवसाय सुरु करणार, मात्र जिल्हयांच्या सीमा बंदच राहतील – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.
जिल्हा प्रशासन, पोलिसांनी अधिक सतर्क राहून लाँकडाऊन नियमांचे काटेकोर पालन करण्याचे, पालिकांनी पावसाळ्यापुर्वीची महत्त्वाची कामे संपवावी मुख्यमंत्र्यांचे आवाहन.
कोविड-१९च्या प्रतिकारासाठी ग्रामपंचायत पातळीवर स्वच्छाग्रहींची नियुक्ती करणार- पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्र्यांची माहिती.
पाणी टंचाई निवारणाच्या कामांकरिता ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ.
कोरोना संसर्ग – व्यक्ती किंवा समुहावर होणारी जंतुनाशक फवारणी ठरू शकते अपायकारक.
टाळेबंदीतही दररोज २० हजार क्विंटल फळे, भाजीपाल्याची विक्री, कृषी विभागाच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना दिलासा.
मालेगाव, अहमदनगर आण सोलापूर येथे तज्ज्ञ डाँक्टरांचे पथक नियुक्त.
एकत्रित वार्षिक विवरणपत्र दाखल करण्यास मुदतवाढ- कामगार आय़ुक्तांची माहिती.
२० एप्रिल.
पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन प्रकरण भडकवू नये, सर्व हल्लेखोर तुरुंगात सीआयडी तपास सुरु – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन.
महाराष्ट्रात ७५ हजार रॅपीड टेस्ट करणर, कोरोना रुग्णालयांमध्ये ऑक्सिजन स्टेशन उभारणार –आरोग्यमंत्र्याची माहिती.
खासगी संकेतस्थळावर ग्रामविकास विभागातील पदभरतीची खोटी जाहिरात, संबंधितावर गुन्हा दाखल होणार.
२१ एप्रिल
परराज्यातील कामगारांची घरी जाण्याची इच्छा लक्षात घेऊन विशेष ट्रेनची व्यवस्था करण्याच्या मागणीचा मुख्यमंत्र्यांकडून पुनरुच्चार
मुंबई- पुणे भागात लॉकडाऊन बाबतीत सवलती रद्द. नागरिकांनी मुक्तपणे व्यवहार सुरु केल्याने शासनाचा निर्णय
राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे स्वतंत्र बँक खाते,'सीएसआर' निधी जमा करता येणार. उद्योजक, व्यावसायिकांना पुढे येण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन