Saturday, 19 November 2022

53 इफ्फी ची खासियत असेल 280 चित्रपट, 79 देश

53वा इफ्फी अर्थात आतंरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सव गोव्यामध्ये तालेईगाव येथील डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियममध्ये दिमाखदार सोहळ्याने सुरू होणार आहे.  एका शानदार रंगारंग  शुभारंभासाठी  हा महोत्सव सज्ज आहे. यंदाच्या महोत्सवाच्या पर्वणीमध्‍ये  तब्बल 280 चित्रपटांची मेजवानीच उपलब्ध होणार आहे.  79 देशांमधल्या जनतेचं आयुष्य, आशा-आकांक्षा आणि संघर्ष अनुभवण्यासाठी हा महोत्सव सर्वांना आमंत्रित करत असून या महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. याच अनुषंगाने महोत्सवाचे संचालक आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र भाकर, ईएसजीचे सीईओ स्वेतिका साचन, पत्र सूचना कार्यालयाच्या महासंचालक मोनिदीपा मुखर्जी आणि अतिरिक्त संचालक प्रज्ञा पालिवाल गौर यांनी पणजी येथे जुन्या जीएमसी इमारतीमध्ये वार्ताहर परिषदेत या महोत्सवाची सविस्तर माहिती दिली.  

चला तर मग याची ठळक वैशिष्ट्ये पाहुयाः

दिग्दर्शक डिएटर बर्नेर यांच्या अल्मा अँड ऑस्कर या ऑस्ट्रियन चित्रपटाने महोत्सवाचा प्रारंभ होईल. उद्घाटनाच्या या चित्रपटासाठी  पणजी येथे आयनॉक्स चित्रपटगृहात दुपारी दोन वाजल्यापासून लाल गालिचांवर पाहुण्यांचे स्वागत सुरू होईल आणि त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शन करण्यात येईल.

क्रिझटोव्ह झानुसी यांच्या  'परफेक्ट नंबर'  या पोलिश चित्रपटाच्या प्रदर्शनाने या महोत्सवाची सांगता होणार आहे. या चित्रपटासाठी 28 नोव्हेंबर रोजी पणजी येथे आयनॉक्स-I चित्रपटगृहात दुपारी दोन वाजल्यापासून लाल गालिचांवर सर्वांच्‍या स्वागताला  प्रारंभ होईल आणि त्यानंतर चित्रपटाचे प्रदर्शन होईल.

मर्सिडिज ब्रायस् यांचा 2022 मधला जर्मनी, कॅनडा आणि अमेरिकेत चित्रित केलेला 'फिक्सेशन'  हा चित्रपट महोत्सवाच्या मध्यावर प्रदर्शित केला जाईल.

भारतातील 25 फीचर फिल्म आणि 19 बिगर फिचर फिल्म्सचे प्रदर्शन इंडियन पॅनोरमा मध्ये करण्यात येईल. तर 183 चित्रपट आंतरराष्ट्रीय विभागात समाविष्ट आहेत. या महोत्सवात 52व्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मानकरी आशा पारेख यांच्या भूमिकांनी  गाजलेले  तिसरी मंजिल, दो बदन आणि कटी पतंग या तीन चित्रपटांच्या माध्यमातून त्यांच्या कारकिर्दीवर  दृष्टीक्षेप टाकण्यात येणार आहे.

मणिपुरी चित्रपटसृष्टीला  यंदा  50 वर्षे पूर्ण होत आहेत,  त्यानिमित्त, मणिपूर स्टेट फिल्म्स फिल्म डेव्हलपमेंट सोसायटीने  वैशिष्ट्यपूर्ण पाच फीचर फिल्म  आणि पाच नॉन-फीचर चित्रपटांचे खास तयार केलेले पॅकेज इंडियन पॅनोरमा अंतर्गत प्रदर्शित केले जात आहे.

- ईशान्य भारतातील चित्रपटांना प्रोत्साहन देण्याचा उपक्रम म्हणून मणिपुरी चित्रपटसृष्टीचा सुवर्णमहोत्सवी वर्ष म्हणून 5 फीचर आणि 5 नॉन फीचर चित्रपट.

सर्वोत्कृष्‍ट  फॉरेन लँग्वेज कॅटेगरीत ऑस्करसाठी भारताकडून  अधिकृत प्रवेश मिळालेला    पॅन नलिन यांंचा  'चेलो शो—द लास्ट फिल्म शो' आणि मधुर भांडारकर यांच्या 'इंडिया लॉकडाऊन' चे विशेष स्क्रीनिंग या महोत्सवामध्‍ये केले जाईल.

नॅशनल फिल्म र्काइव्हज ऑफ इंडियाचे चित्रपट एनएफडीसीद्वारे ‘इंडियन रिस्टोर्ड क्लासिक्स’ विभागात प्रदर्शित केले जातील. यामध्ये सोहराब मोदी यांचा   1957 मधील विशेष  नाट्यमय चित्रपट  'नौशेरवान-ए-आदिल' , रमेश माहेश्वरी यांचा 1969 चा राष्ट्रीय पुरस्कार विजेता पंजाबी चित्रपट 'नानक नाम जहाज है', के विश्वनाथ यांचा 1980 मधील तेलुगू संगीत नाट्यपट 'शंकराभरणम'  आणि सत्यजित रे यांचे दोन क्लासिक्स असणार आहेत. सत्यजित रे यांचा 1977 चा गाजलेला  'शतरंज के खिलाडी' आणि 1989 मधील सामाजिक चित्रपट 'गणशत्रू' या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत.

स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक कार्लोस सौरा यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येत आहे. त्यांची कन्या  ॲना सौरा या इफ्फीच्या उद्घाटन समारंभात प्रसिद्ध चित्रपट निर्माते कार्लोस सौरा यांच्या वतीने   पुरस्कार स्वीकारतील. या महोत्सवात त्यांच्या चित्रपट क्षेत्रातील कारकिर्दीचा  प्रवास दाखवण्‍यात येणार आहे.

फ्रान्स हा ‘स्पॉटलाइट कंट्री ’ अर्थात प्रकाशझोतातील देश असून  ‘प्रकाशझोतातील देश’ पॅकेज अंतर्गत 8 चित्रपट दाखवले जातील.

‘फिल्म बाजार’ विविध विभागांमधील काही उत्कृष्ट चित्रपट प्रदर्शित करेल. प्रथमच इफ्फीमध्ये 'मार्चे डु कान' सारख्या प्रमुख आंतरराष्ट्रीय बाजारपेठांच्या अनुषंगाने दालन असतील. यावर्षी एकूण 42 दालने असतील.  विविध राज्य सरकारे, सहभागी देश, उद्योजक  आणि मंत्रालयातील माध्यम संस्था या दालनांमध्ये आपली चित्रपट  कार्यालये ठेवतील. प्रथमच  अनेक पुनरुज्जीवित अभिजात चित्रपट  ‘द व्ह्यूइंग रूम’ मध्ये उपलब्ध असतील जिथे या चित्रपटांचे हक्क विकत घेता येतील आणि जगभरातील चित्रपट महोत्सवांमध्ये त्यांचा वापर करता येईल.

पुस्तकांमध्ये छापलेल्या चांगल्या कथा आणि पुस्तकांचे रुपांतर करून निर्मिती होऊ शकतील असे   चांगले चित्रपट यांच्यातील तफावत भरुन काढण्यासाठी नवीन पुस्तक रूपांतरण कार्यक्रम,  ‘बुक्स टू बॉक्स ऑफिस’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. चित्रपटामध्ये रुपांतरित होऊ शकणार्‍या पुस्तकांच्या हक्कांची विक्री करण्यासाठी या कार्यक्रमात काही उत्तम प्रकाशक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे,अशी माहिती   महोत्सवाच्या संचालकांनी दिली.

संपूर्ण गोव्यात कॅरावॅन तैनात केल्या जातील आणि खेड्यापाड्यातील लोकांपर्यंत चित्रपट पोहोचावा यासाठी एक उपक्रम म्हणून चित्रपट प्रदर्शित केले जातील.

समुद्रकिनाऱ्यावर खुल्यावर देखील चित्रपट दाखवले जाणार आहेत.

‘आदरांजली ’ विभागात पंधरा भारतीय आणि पाच आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश असेल.

विशेष आकर्षण यामध्ये 26 नोव्हेंबर रोजी शिमगोत्सव  आणि 27 नोव्हेंबर 2022 रोजी गोवा कार्निव्हल यांचा समावेश आहे.

स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव संकल्पनेवर सेंट्रल ब्यूरो ऑफ कम्युनिकेशन प्रदर्शन आयोजित करणार आहे.

ऑटिझम असलेल्या व्यक्तींसाठी स्मार्ट फोन फिल्ममेकिंग आणि व्हील चेअर वापरणाऱ्या व्यक्तींसाठी अभिनय अभ्यासक्रम, एफटीटीआय अर्थात भारतीय चित्रपट आणि दूरचित्रवाणी संस्था आयोजित करणार आहे.

हिंदी चित्रपटांचे अनेक भव्य प्रीमियर असतील यात त्या चित्रपटातील कलाकार सिनेमाला पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असतील. यामध्ये परेश रावल यांचा 'द स्टोरीटेलर', अजय देवगण आणि तब्बू यांचा  'दृश्यम 2', वरुण धवन आणि कृती सेनॉनचा भेडिया आणि यामी गौतमचा लॉस्ट या चित्रपटांचा समावेश आहे. आगामी तेलगू चित्रपट 'रायमो ', दीप्ती नवल आणि कल्की कोचलिन यांचा  'गोल्डफिश' आणि रणदीप हुडा आणि इलियाना डी’क्रूझचा 'तेरा क्या होगा लवली'  या चित्रपटांचा प्रीमियर  इफ्फी मध्ये होणार आहे. तसेच  वधंधी, खाकी आणि फौदा सीझन 4 सारख्या ओटीटी शोच्या भागांचाही यात समावेश असेल 

केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या  पुढाकाराने सुरू झालेल्या ‘75 क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो’  या उपक्रमाचे यंदा दुसरे वर्ष आहे.  हा उपक्रम महोत्सवाचे आणखी एक आकर्षण असल्याचे महोत्सव संचालकांनी सांगितले. चित्रपट निर्मात्यांची संख्या ही भारतीय स्वातंत्र्याच्या 75 वर्षांचे प्रतीक आहे.

आंतराराष्ट्रीय चित्रपटांमधील 118 सेलिब्रिटी महोत्सवाला उपस्थित राहणार असल्याबाबत पुष्टी करण्यात आली आहे, यामध्ये  करजिस्तोफ जानूसी, लव डियाज, नादव  लॅपिड, जिंको गोटोह, मॅडी हसन, जॉन लॉयड क्रूझ, जेनेसिस रॉड्रिग्ज, मार्क ओसबोर्न, जिओन क्यू ह्वान, डॅनियल गोल्डहॅबेर आणि नतालिया लोपेज़ गैलार्डो यांचा समावेश आहे अशी माहिती महोत्सव संचालकांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली. 221 भारतीय चित्रपट सेलिब्रिटींनी देखील आपल्या उपस्थितीबाबत पुष्टी केली आहे.  यामध्ये  अजय देवगण, सुनील शेट्टी, वरुण धवन, कृती सेनॉन,  प्रभुदेवा, मनोज बाजपेयी, नवाजउद्दीन  सिद्दिकी, शेखर कपूर, राणा दग्गुबत्ती, मणिरत्नम, एआर रहमान, पंकज त्रिपाठी, परेश रावल अक्षय खन्ना, कल्की कोचलिन, यामी गौतम, दिनेश विजान, इलियाना डिक्रूज, आर बाल्की, अनुपम खेर आणि भूषण कुमार.यांचा समावेश आहे असे त्यांनी सांगितले .  

उद्‌घाटन समारंभ 20 नोव्हेंबर 2022 रोजी गोव्यामध्ये तालेईगाव येथील डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे होणार आहे. महोत्सवाच्या उद्घाटन सत्रातील रेड कार्पेट  समारंभ संध्याकाळी 4.00 वाजता सुरु होईल, त्यानंतर संध्याकाळी 5.00 ते 9.00 दरम्यान प्रमुख उद्घाटन समारंभ होणार आहे. महोत्सवाच्या संचालकांनी माहिती दिली की उद्घाटन समारंभाचे प्रसारण हक्क माध्यम भागीदारांना देण्यात आले आहेत आणि सांस्कृतिक सादरीकरणांचा समावेश असलेला मनोरंजन विभाग वगळता उद्घाटन समारंभाचे चित्रीकरण केवळ दूरदर्शन या सार्वजनिक प्रसारण मध्यामा द्वारेच केले जाईल. मनोरंजन विभागाच्या चित्रीकरणाचे हक्क केवळ माध्यम भागीदारांसाठी राखीव आहे, तथापि, मनोरंजन विभागासह समारंभाचे निवडक चित्रीकरण त्याच दिवशी माध्यमांना उपलब्ध करून दिले जाईल. संपूर्ण कार्यक्रमाच्या स्थिर फोटोग्राफीला परवानगी देण्यात आली आहे. त्याशिवाय माध्यमांना रेड कार्पेटवरील कार्यक्रमाचे वार्तांकन देखील  करता येईल.

महोत्सवाचा सांगता समारंभ देखील नोव्हेंबर 28, 2022 रोजी गोव्यामध्ये तालेईगाव येथील डॉ श्यामा प्रसाद मुखर्जी इनडोअर स्टेडियम येथे आयोजित केला जाईल. यामधील रेड कार्पेट समारंभ संध्याकाळी 4.00 वाजता सुरु होईल आणि त्यानंतर 4.45 ते 7.00 दरम्यान महोत्सवाचा  सांगता समारंभ संपन्न होईल. 

ईएसजी च्या मुख्य कार्यकारी अधिकारी स्वेतिका सचन यांनी माध्यमांना सांगितले की, गोवा विभागात चित्रपट प्रतिनिधींना 7 नॉन फीचर चित्रपट दाखवले जातील. यामध्ये अर्दो डिस, बिफोर आय स्लीप, द व्हाईट शर्ट, विंड चाइम्स, द व्हाईट ड्रीम, गोय स्वातंत्र्याचे होमखान आणि निमन्या डिस्क या सात चित्रपटांचा समावेश आहे.  चित्रपट निर्माते विनोद गणात्रा; निर्माता, दिग्दर्शक आणि लेखक इमो सिंग; आणि निर्माता आणि अभिनेता पम्पल्ली संदीप कुमार यांचा समावेश असलेल्या निवड समितीने एकूण 10 प्रवेशांमधून चित्रपट निवडले आहेत.

मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी महोत्सवातील इतर आकर्षणांबद्दलही सांगितले, आपण येथे तपशील पाहू शकता.

पीआयबी च्या अतिरिक्त महा संचालक प्रज्ञा पालीवाल गौर यांनी माध्यमांना  पीआयबी राबवणार असलेल्या सार्वजनिक संप्रेषण आणि माध्यम सुविधा व्यवस्थेची माहिती दिली. पालीवाल गौर यांनी माहिती दिली की 500 पेक्षा जास्त पत्रकारांनी माध्यम मान्यतेसाठी अर्ज केले आहेत आणि सुमारे 420 अर्जांवर प्रक्रिया करण्यात आली आहे. माध्यम प्रतिनिधी कार्ड वितरण यापूर्वीच सुरू झाले आहे असेही त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या की,  उत्सवाच्या विविध पैलूंबाबतचे  फोटो आणि मल्टीमीडिया प्रेस रिलीझ / इफ्फी क्रॉनिकल्स, इंग्रजी, हिंदी, उर्दूआणि देशातील इतर प्रादेशिक भाषांमध्ये पीआयबी प्रकाशित करत आहे. पीआयबी माध्यम परिषदा म्हणजेच आपण ज्याला चित्रपट निर्माते आणि चित्रपट कर्मी आणि माध्यमे आणि महोत्सवाचे प्रतिनिधी यांच्यातील इफ्फी टेबल टॉक म्हणतो, ते आयोजित करत आहे. ही सत्रे पीआयबी इंडिया च्या युट्युब चॅनेलवरही थेट प्रक्षेपित केली जातील.

 महोत्सवातील सार्वजनिक सहभाग, रुची आणि सहभाग वाढवा यासाठी पीआयबी समाज माध्यमांची जोड देत आहे. त्यासाठी आम्ही मिम्स आणि सानुकूल ध्वनी-चित्रफिती यासारख्या सृजनशील प्रकारांचा देखील वापर करत आहोत. पीआयबी, महोत्सवाचे एक ई-न्यूजलेटर इफ्फीलोईड (IFFILOID) देखील प्रकाशित करणार आहे. हा उपक्रम आम्ही इफ्फी 52 पासून सुरू केला.

#इफ्फी #IFFI #IFFI2022 #53IFFI #internationalfilmfestivalofIndia

Monday, 14 November 2022

 प्रदर्शनापूर्वीच 'सनी' हाऊसफुल


मराठी सिनेसृष्टीत असं पहिल्यांदाच घडत आहे की, एखाद्या चित्रपटाचा शो त्या चित्रपटाच्या प्रदर्शनापूर्वीच थिएटरला लावला आहे आणि तो शो हाऊसफुल झाला आहे. नुकताच हेमंत ढोमे दिग्दर्शित 'सनी' या चित्रपटाचा पेड प्रिव्ह्यू शो पुण्यातील एका चित्रपटगृहात आयोजित करण्यात आला होता. या शोची तिकीटविक्री एका ॲपद्वारे प्रेक्षकांसाठी करण्यात आली होती आणि अवघ्या काही वेळातच हा शो 'हाऊसफुल' झाला. विशेष म्हणजे प्रेक्षकांचा मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहाता 'सनी'च्या दुसऱ्या शोचेही यावेळी आयोजन करण्यात आले. ठाण्यातही पेड प्रिव्ह्यू शोचे आयोजन करण्यात आले असून तिथेही 'हाऊसफुल'चा बोर्ड लागला आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच 'सनीला  मिळालेले हे प्रेक्षकांचे प्रेम पाहून, 'सनी' बॉक्स ऑफिसावर धमाका करणारा हे नक्की! 


प्रेक्षकांकडून मिळालेल्या या प्रेमाबद्दल दिग्दर्शक हेमंत ढोमे म्हणतात, ''पेड प्रिव्ह्यू शोचा आम्ही एक प्रयोग करून पाहिला आणि प्रेक्षकांनी त्याला भरभरून प्रतिसाद दिला. खरंतर आम्ही एकाच शोचे आयोजन केले होते, परंतु प्रेक्षकांची इतकी गर्दी पाहून आम्ही आणखी एक शो ठेवण्याचा निर्णय घेतला. प्रेक्षकांचं हे प्रेम पाहून भारावून गेलोय. जसा सकारात्मक प्रतिसाद 'झिम्मा'ला दिला, मला आशा आहे, 'सनी'लाही प्रेक्षक तेवढ्याच आपुलकीनं स्वीकारतील. 


'सनी'ची भूमिका साकारणारा ललित प्रभाकर म्हणतो, '' माझ्यासाठी हा अनुभव सुखद आहे. 'सनी' प्रेक्षकांना आवडतोय. जसं प्रेम प्रदर्शनापूर्वी दिलं आहे, तसंच प्रेम प्रदर्शनांनंतरही द्याल, याची खात्री आहे. घरापासून दूर जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची गोष्ट सांगणारा 'सनी' आहे, त्यामुळे प्रेक्षकांना तो कुठेतरी आपल्या जवळचा वाटतोय. 


ललित प्रभाकर, चिन्मय मांडलेकर, क्षिती जोग, अभिषेक देशमुख, अमेय बर्वे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाचे लेखन इरावती कर्णिक यांनी केले आहे. क्रेझी फ्यु फिल्म्स, प्लॅनेट मराठी, क्रिएटिव्ह वाईब प्रॅाडक्शन प्रस्तुत, चलचित्र कंपनी निर्मित 'सनी'चे अक्षय बर्दापूरकर, क्षिती जोग, विराज गवस, उर्फी काझमी 'सनी'चे निर्माते आहेत. तर संतोष खेर आणि तेजस्विनी पंडित सहनिर्माते आहेत.


53व्या इफ्फीमध्ये स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक कार्लोस सौरा यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार


या वर्षीच्या इफ्फीमध्ये फ्रान्स असणार ‘प्रकाशझोतातील’ देश

इफ्फीच्या 53 व्या आवृत्तीमध्ये 79 देशांमधील 280 देशाच्या चित्रपटांचे होणार प्रदर्शन

‘अल्मा अँड ऑस्कर’ महोत्सवाच्या उद्घाटनाचा चित्रपट तर ‘परफेक्ट नंबर’ असणार समारोपाचा चित्रपट

 

यंदाच्या 53व्या इफ्फी  अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात स्पॅनिश चित्रपट दिग्दर्शक कार्लोस सौरा यांना ‘सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात येणार आहे, अशी माहिती, माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल मुरुगन यांनी आज दिली. चित्रपट विश्वातील दिग्गजांना एका छत्राखाली  आणणाऱ्या, कला, चित्रपट आणि संस्कृतीचे वातावरण निर्माण करून या विश्वात मोठी उर्जा निर्माण करणाऱ्या या महोत्सवाचे गोव्यामध्ये  20 ते 28 नोव्हेंबर 2022 या काळात आयोजन करण्यात येणार आहे. 53व्या इफ्फीची माहिती देण्यासाठी आज नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले.  महोत्सवाचे संचालक आणि एनएफडीसीचे व्यवस्थापकीय संचालक रवींद्र भाकर यांनी या संदर्भात सविस्तर माहिती दिली. यंदा या महोत्सवात 79 देशांचे 280 चित्रपट दाखवले जाणार आहेत. इंडियन पॅनोरमा मध्ये 25 भारतीय फीचर फिल्म आणि 20 बिगर फीचर फिल्म दाखवल्या जातील, तर 183 चित्रपट आंतरराष्ट्रीय कार्यक्रमाचा भाग असतील. माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी देखील या संदर्भात इतर माहिती दिली.

• सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार

बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात डेप्रिसा डेप्रिसा साठी गोल्डन बेअर, त्याचबरोबर ला काझा आणि पेपरमिंट फ्रापे साठी दोन सिल्वर बेअर्स, कार्मेन साठी बाफ्टा आणि कान महोत्सवात तीन पुरस्कार आणि इतर बरेच सन्मान मिळवणारे स्पॅनिश चित्रपट निर्माते कार्लोस सौरा यांना सत्यजित रे जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे आणि इफ्फीमध्ये आठ चित्रपट दाखवण्यात येणार आहेत.

• उद्घाटनाचा चित्रपट आणि समारोपाचा चित्रपट

डिएटर बर्नेर दिग्दर्शित ‘अल्मा अँड ऑस्कर’ या ऑस्ट्रियन चित्रपटाने महोत्सवाचा प्रारंभ होईल तर महोत्सवाच्या समारोपाला क्रिझ्टोव्ह झानुसी यांचा ‘ परफेक्ट नंबर’ हा चित्रपट दाखवला जाईल.

• प्रकाशझोतातील देश

यंदा फ्रान्स ‘प्रकाशझोतातील’ देश असेल आणि ‘प्रकाशझोतातील देश’ पॅकेज अंतर्गत 8 चित्रपट दाखवले जातील.

• इंडियन पॅनोरमा

‘इंडियन पॅनोरमा’ चा प्रारंभ पृथ्वी कोनानुर यांच्या ‘हडीनेलेन्तू’ या कन्नड चित्रपटाने होईल तर दिव्या कावसजी यांच्या द शो मस्ट गो ऑन ने बिगर फिचर फिल्म श्रेणीचा प्रारंभ होईल. पॅन नलिन यांच्या ‘चेलो शो- द लास्ट फिल्म शो’ या ऑस्कर चित्रपट महोत्सवात सर्वोत्तम परदेशी चित्रपट श्रेणीतील भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून पाठवण्यात येणाऱ्या चित्रपटाचे आणि मधुर भांडारकर यांच्या ‘इंडिया लॉकडाऊन’ या चित्रपटांचे विशेष शो या महोत्सवात दाखवले जाणार आहेत.

• जुन्या काळात गाजलेले भारतीय पुनरुज्जीवित चित्रपट’

नॅशनल फिल्म अर्काईव्हस ऑफ इंडियाचे (एनएफएआय) काही चित्रपट एनएफडीसीकडून दाखवले जाणार आहेत. ‘जुन्या काळात गाजलेले भारतीय पुनरुज्जीवित चित्रपट’ या श्रेणींतर्गत त्यांचे प्रदर्शन केले जाणार आहे.

यामध्ये सोहराब मोदी यांचा 1957 मधील ऐतिहासिक पोशाख आणि नाट्य  असलेला नौशेरवान ए आदिल, रमेश महेश्वरींचा 1969 मधला राष्ट्रीय पुरस्कार विजेता ‘नानक नाम जहज है’ हा पंजाबी चित्रपट, 1980 मधला के विश्वनाथ यांचा तेलुगु संगीतमय नाट्य असलेला ‘शंकराभरणम’ आणि सत्यजित रे यांचे दोन गाजलेले चित्रपट, 1977 मध्ये आलेला इंग्रजी राजवटीच्या कालखंडातील संस्थानिकांच्या कथानकावर आधारित शतरंज के खिलाडी आणि 1989 मधला सामाजिक घडामोडींवर आधारित ‘गणशत्रू’ यांचा समावेश आहे.

• दादासाहेब फाळके विजेत्यांचे सिंहावलोकन

52 व्या दादासाहेब फाळके पुरस्काराच्या मानकरी( 68व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात जाहीर) आशा पारेख यांचे तिसरी मंजिल, दो बदन आणि कटी पतंग हे चित्रपट त्यांच्या कारकीर्दीकडे टाकलेला एक दृष्टीक्षेप म्हणून दाखवले जाणार आहेत.

• अभिवादन

अभिवादन विभागात पंधरा भारतीय आणि पाच आंतरराष्ट्रीय चित्रपटांचा समावेश आहे.

भारतरत्न लता मंगेशकर, गायक संगीतकार बप्पी लाहिरी, महान कथक नर्तक पंडित बिरजू महाराज, अभिनेते रमेश देव, शिवकुमार सुब्रमणियम, टी रामा राव, वत्सला देशमुख, महेश्वरी अम्मा, सलीम घौस, गायक केके, दिग्दर्शक तरुम मजुमदार, दिग्दर्शक निर्माते रवी टंडन आणि सावन कुमार टांक, अभिनेते आणि नाट्य कलाकार निपोन गोस्वामी, अभिनेते आणि चित्रपट निर्माते प्रताप पोथेन, अभिनेते क्रिष्नम राजू आणि गायक भूपेंद्र सिंग यांना या विभागात आदरांजली वाहण्यात येईल.

आंतरराष्ट्रीय विभागात बॉब राफेल्सन, इवान रिटमन, पीटर बोगदानोविच, डग्लल ट्रम्बेल आणि मोनिका विटी यांना अभिवादन करण्यात येईल.

• बुक्स टू बॉक्स ऑफिस

यावर्षी इफ्फी आणि फिल्म बाजारमध्ये अनेक नवीन उपक्रम घेण्यात आले आहेत. पुस्तकांमध्ये छापलेल्या चांगल्या कथा आणि पुस्तकांचे रुपांतर करून बनवता येणारे चांगले चित्रपट यांच्यातील तफावत भरुन काढण्यासाठी नवीन पुस्तक रूपांतरण कार्यक्रम ‘बुक्स टू बॉक्स ऑफिस’ हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. चित्रपटामध्ये रुपांतरित होऊ शकणार्‍या पुस्तकांच्या हक्कांची विक्री करण्यासाठी या कार्यक्रमात काही उत्तम प्रकाशक उपस्थित राहण्याची अपेक्षा आहे.

फिल्म बाजार शिफारस विभागात वीस चित्रपट दाखवले जातील,या माध्यमातून बाजार प्रतिनिधींना या चित्रपटांची झलक मिळेल आणि नेटवर्कवर उपस्थित राहून घेण्यात येणाऱ्या बैठकांद्वारे  चित्रपट निर्मात्यांना भेटण्याची संधी मिळेल.
 

  • रिचर्ड अ‍ॅटनबरो यांच्या ऑस्कर विजेत्या 'गांधी' सारखे चित्रपट ‘दिव्यांगजन’ विभागात दाखवले जातील, यासाठी दिव्यांगजनांना उपलब्ध करून देण्यात येणारी व्यवस्था ध्वनी आणि उपशीर्षकांसह दृकश्राव्य सुविधेने सुसज्ज असेल. या व्यवस्थेमुळे  दिव्यांग चित्रपटप्रेमींना सहज चित्रपटाचा आनंद घेता येईल आणि सर्वसमावेशकतेच्या भावनेला प्रोत्साहन मिळेल.
  • ईशान्य भारतातील चित्रपटांना प्रोत्साहन देण्यासाठी एक उपक्रम म्हणून, 5 कथाआधारित आणि 5 कथाबाह्य चित्रपटांचा समावेश असलेला, मणिपुरी चित्रपटाचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
  • हिंदी चित्रपटांचे अनेक भव्य प्रीमियर असतील यात त्या चित्रपटातील कलाकार सिनेमाला पाठिंबा आणि प्रोत्साहन देण्यासाठी उपस्थित असतील. यामध्ये परेश रावल यांचा 'द स्टोरीटेलर', अजय देवगण आणि तब्बू यांचा  'दृश्यम 2', वरुण धवन आणि कृती सेनॉनचा भेडिया आणि यामी गौतमचा लॉस्ट  या चित्रपटांचा समावेश आहे. आगामी तेलगू चित्रपट 'रायमो ', दीप्ती नवल आणि कल्की कोचलिन यांचा  'गोल्डफिश' आणि रणदीप हुडा आणि इलियाना डी’क्रूझचा 'तेरा क्या होगा लवली'  या चित्रपटांचा प्रीमियर  इफ्फी मध्ये होणार आहे. तसेच  वधंधी, खाकी आणि फौदा सीझन 4 सारख्या ओटीटी शोच्या भागांचाही यात समावेश असेल  
  • कान, बर्लिन, टोरंटो आणि व्हेनिस यांसारख्या जगभरातील प्रतिष्ठित चित्रपट महोत्सवांमध्ये अनेक पुरस्कार पटकावलेल्या  चित्रपटांची मोठी स्पर्धा  या महोत्सवात असेल  
  • काही ऑस्कर विजेते दिग्दर्शित किंवा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. काही चित्रपट ऑस्कर विजेते दिग्दर्शित किंवा वैशिष्ट्यपूर्ण आहेत. पार्क-चॅन वूक यांचा डिसिजन टू लिव्ह आणि रुबेन ऑस्टलंडचा ट्रँगल ऑफ सॅडनेस, डॅरेन ओरोनोव्स्कीचीचा  द व्हेल, गिलेर्मो डेल टोरोचा पिनोचियो, क्लेअर डेनिसचा बोथ साईड ऑफ द ब्लेड, गाय डेव्हिडीचा इनोसेन्स, अॅलिस डायपचा सेंट ओमेर आणि मरियम टुझानीचा द ब्लू कॅफ्टन. या चित्रपटांचा या समावेश आहे.
  • प्रख्यात चित्रपट निर्माते आणि अभिनेत्यांसोबत 23 'मास्टरक्लासेस' आणि 'इन कॉन्व्हर्सेशन' सत्रांसह, हा एक उत्साहपूर्ण आठवडा असणार आहे. व्ही. विजयेंद्र प्रसाद यांच्या पटकथा लेखनाचा एक मास्टर क्लास असेल, ए. श्रीकर प्रसाद यांचा  संकलना संदर्भात  आणि अनुपम खेर अभिनयाचा मास्टरक्लास  घेतील. एसीइएसवरील मास्टरक्लासमध्ये ऑस्कर अकादमीमधील  तज्ञ मार्गदर्शन करतील  तर अॅनिमेशनवरचा मास्टरक्लास  मार्क ऑस्बोर्न आणि ख्रिश्चन जेझडिक घेतील. आशा पारेख, प्रसून जोशी, आनंद एल राय, आर बाल्की आणि नवाजुद्दीन सिद्दीकी  हे  ‘इन-कन्व्हर्सेशन’ या संवादात्मक सत्रांद्वारे संवाद साधतील.
  • आभासी इफ्फी - 53 वा इफ्फी आभासी माध्यमातून पाहता येईल. नोंदणीकृत वापरकर्त्यांना गोव्यात उपस्थित नसतानाही या मास्टरक्लासेस, संवादात्मक सत्रांचा, पॅनेल चर्चा आणि उद्घाटन आणि समारोप समारंभाचा भाग बनण्याची संधी मिळेल. अधिकृत संकेतस्थळाला  भेट देऊन या थेट आभासी सत्रांच्या वेळापत्रकाची माहिती घेता येईल.
  • स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव सोहळ्यांतर्गत गेल्या 100 वर्षांतील भारतीय चित्रपटांचा विकास ही महोत्सवाच्या उद्घाटन सोहळ्याची संकल्पना असेल.
  • चित्रपट प्रदर्शनाच्या निमित्ताने, केंद्रीय संचार ब्युरो 'स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव' प्रदर्शन आयोजित करेल. आयुष मंत्रालय देखील अधिकृत वेलनेस पार्टनर  म्हणून  प्रतिनिधी आणि सामान्य लोकांसाठी या महोत्सवाच्या कालावधीत  योग मार्गदर्शन सत्रे आणि सर्वांगीण तपासणी सुविधा उपलब्ध करून देईल.
  • महोत्सवाच्या या पर्वाच्या उद्घाटन आणि समारोप समारंभ भारतभरातीलचित्रपट क्षेत्रातील प्रसिद्ध नामांकित कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातील आणि यात फ्रान्स, स्पेन आणि गोवा राज्याचे प्रतिनिधित्व करणारे संगीत आणि नृत्य समूह देखील सहभागी होतील.