फार्सिकल अभिनयाची उत्तम जाण असणारा कलावंत हरपला - सांस्कृतिक कार्य मंत्री विनोद तावडे
चित्रपट सृष्टीतील जेष्ठ अभिनेते विजू खोटे यांनी मराठी, हिंदी, इंग्रजी नाटक व चित्रपट यामध्ये लिलया व्यक्तिरेखा साकारल्या. त्यांच्या निधनाने फार्सिकल अभिनयाची उत्तम जाण असणारा गुणी कलावंत हरपला, या शब्दात सांस्कृतिक कार्य मंत्री श्री. विनोद तावडे यांनी आपला शोक व्यक्त केला.
गेल्या ५५ वर्षांपासून त्यांनी अनेक चित्रपटामध्ये विविध स्वरुपाच्या भूमिका साकारल्या होत्या. त्यांचे अभिनय कौशल्य आणि संवादफेक अतिशय अप्रतिम असल्याने ते दर्शकांच्या कायम लक्षात राहतील. चित्रपट सृष्टीसोबतच छोट्या पडद्यावरील विविध मालिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची एक नवीन ओळख करुन दिली. चित्रपटसृष्टी व छोटा पडदा याबरोबर त्यांनी मराठी नाट्य सृष्टीतही आपली भूमिका अतिशय उत्तमरित्या साकारली. विजू खोटे यांच्या निधनाने एक आदर्श कलावंत हरपल्याची भावना श्री. तावडे यांनी आपल्या शोकसंदेशात व्यक्त केली.

No comments:
Post a Comment