माहिती आणि प्रसारण मंत्रालय 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची गोव्यात शानदार सुरुवात
भारतीय संस्कृतीचे चित्रमय दर्शन, चित्रपटाची दृश्ये आणि करण जोहर- अक्षय कुमार यांच्या खुमासदार संभाषणाने रंगला “इफ्फी 2018” चा उद्घाटन सोहळा
चित्रपट रसिक ज्याची आतुरतेने वाट बघत असतात असा प्रतिष्ठित भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव इफ्फी 2018 चे आज दिमाखदार सोहळ्यात पणजी येथे उद्घाटन झाले.
केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड आणि गोव्याच्या गव्हर्नर मृदुला सिन्हा यांच्यासह अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत दीप प्रज्वलनाने या महोत्सवाचे उद्घाटन झाले. इफ्फीचे हे 49 वे वर्ष असून या कार्यक्रमाची शोभा वाढवण्यासाठी अनेक मान्यवरांसह चित्रपट सृष्टीतल्या अनेक दिग्गजांनी सोहळ्याला हजेरी लावली होती.
भारतातल्या युवकांमध्ये प्रचंड गुणवत्ता दडलेली असून इफ्फीसारखे महोत्सव युवकांमधल्या गुणवत्तेला आणि कौशल्याला वाव देणारे उत्तम व्यासपीठ आहे असे मत केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंह राठोड यांनी इफ्फीदरम्यान व्यक्त केले. या महोत्सवामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या चित्रपट निर्माते आणि दिग्दर्शकांनाही भारतीय चित्रपटसृष्टी जवळून बघण्याची संधी मिळते तसेच भारतीय कलावंतानांही जागतिक चित्रपटसृष्टीचा परिचय होतो असे ते पुढे म्हणाले.
गोव्याच्या राज्यपाल मृदुला सिन्हा यांनी इफ्फीसाठी आलेल्या सर्व मान्यवरांचे गोवा सरकारच्या वतीने स्वागत केले. गोव्याचे सार्वजनिक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी आपल्या भाषणात आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांना चित्रपट निर्मितीसाठी गोव्यात येण्याचे आमंत्रण दिले.
माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव अमित खरे यांनी स्वागतपर भाषणात सांगितले की, मनोरंजन क्षेत्राच्या विकासाचा वेग 27 टक्के असून या क्षेत्रामुळे महसूल आणि विविध माध्यमांतर्गत रोजगार निर्मिती होत असते. त्यांनी 49 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा इस्रायल हा भागीदार देश असून यावर्षी झारखंड हे विशेष राज्य म्हणून निश्चित केले आहे. त्यांनी सांगितले की, चित्रपट महोत्सवाद्वारे जागतिक पातळीवरील विविध चित्रपटांचे चांगले संदेश समाजापर्यंत पोहचले जातात. त्यांनी प्रामुख्याने ‘टॉयलेट-एक प्रेम कथा’ आणि ‘पॅडमॅन’ या चित्रपटांची नांवे घेतली.
या उद्घाटन सोहळ्यात चित्रपट सुविधा कार्यालयाच्या (फिल्म फॅसिलीटेशन ऑफिस) वेब पोर्टलचं कर्नल राज्यवर्धन राठोड यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. 2014 साली एनएफडीसीने हे कार्यालय सुरु केले असून याद्वारे भारतात चित्रीकरण करण्यासाठी उत्सुक असलेल्या परदेशी चित्रपट निर्मात्यांना विविध परवानग्या आणि सेवा सहज उपलब्ध होतात. विविध राज्यांमध्येही चित्रपट सुविधा कार्यालये सुरु करण्यात आली असून त्यातून चित्रपट निर्मात्यांना चित्रीकरणाची प्रक्रिया, चित्रीकरणासाठी स्थळं शोधण्यात सहकार्य तसेच चित्रपटांसाठी दिली जाणारी अनुदानं, सवलती यांची माहिती या कार्यालयात दिली जाते. ही सर्व माहिती आता पोर्टलवरही उपलब्ध असेल.
‘द अस्पर्न पेपर्स’ या चित्रपटाच्या वर्ल्ड प्रिमियरने महोत्सवाचे उद्घाटन झाले. या चित्रपटाच्या कलाकारांसह चित्रपटाचा चमू यावेळी उपस्थित होता.
गायिका शिल्पा रावने विविध भाषांमधील सुमधुर गीतं सादर केली. त्यानंतर मुंबईच्या आदिती देशपांडे यांच्या चमूने फ्लाय जिमनॅस्टिकच्या चित्तवेधक मुद्रा सादर केल्या.
त्यानंतर चित्रपट निर्माता दिग्दर्शक करण जोहर यांनी राज्यवर्धन राठोड आणि अभिनेता अक्षय कुमार यांच्याशी अनौपचारिक गप्पा मारल्या. या तिघांनीही यावेळी इफ्फी, चित्रपट क्षेत्र, क्रीडा क्षेत्र आणि चित्रपटातून दिले जाणारे सामाजिक संदेश अशा विषयावर रंजक शब्दात आपली मतं मांडली.
एखाद्या देशातल्या सर्वोत्कृष्ट कलाकृती आणि त्या देशाचे योगदान दर्शवणाऱ्या चित्रपटांचा ‘कंट्री ऑफ फोकस’ मध्ये समावेश केला जातो. 49 व्या इफ्फीमध्ये इस्रायल हा देश कंट्री ऑफ फोकस राहणार आहे. मुंबईतील इस्रायलच्या वाणिज्य दुतावासाच्या सहकार्याने दहा चित्रपटांना कंट्री फोकस पॅकेजसाठी निवडले गेले आहेत.
इफ्फी 2018 मध्ये भारताच्या एका राज्यावर आणि त्यातल्या कला आणि संस्कृतीवर प्रकाश टाकणाऱ्या चित्रपटांचा ‘स्टेट फोकस’ या विभागाअंतर्गत प्रथमच समावेश करण्यात आला आहे. 49 व्या इफ्फीमध्ये ‘स्टेट ऑफ फोकस’ म्हणून झारखंड या राज्याची निवड करण्यात आली असून महोत्सवाचा भाग म्हणून 24 नोव्हेंबरला झारखंड दिन साजरा करण्यात येणार आहे. झारखंडला मनोरंजन क्षेत्राचे केंद्र म्हणून विकसित करण्यासाठी तिथल्या सरकारने अनेक योजना राबवल्या असून झारखंडमध्ये चित्रीकरण करण्यावर अनेक सवलती तसेच अनुदानही दिले जाणार आहेत, अशी माहिती झारखंडचे मुख्यमंत्री रघुवर दास यांनी यावेळी आपल्या संदेशात दिली. झारखंड पॅकेजमधील चित्रपटांमध्ये ‘एम एस धोनी-द अनटोल्ड स्टोरी’, ‘डेथ इन गंज’, ‘रांची डायरी’, ‘बेगम जान’ यांचा समावेश आहे.
चित्रपट सृष्टीत लोकप्रिय असलेल्या या सोहळ्यासाठी अनेक सिनेकलावंतही आवर्जून उपस्थित होते. अक्षय कुमार, करण जोहर, बोनी कपूर, सुभाष घई, रमेश सिप्पी, मधुर भांडारकर, ऋषिता भट, फ्रेंच दिग्दर्शक ज्युलियन लिन्सेड आणि सिंगापूरचे चीन यान असे नामवंत यावेळी उपस्थित होते. अभिनेत्री मंदीरा बेदी आणि अमित साध यांनी आपल्या रंजक शैलीत उद्घाटन सोहळ्याचे सूत्रसंचालन केले. इफ्फीचे संचालक चैतन्य प्रसाद यांनी मान्यवरांचे आभार मानले.
आजपासून सुरु झालेल्या 49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची पणजी येथे 28 नोव्हेंबरला ‘सिल्ड लिप्स’ या जर्मन चित्रपटाच्या वर्ल्ड प्रिमियरने इफ्फी 2018 ची सांगता होईल.
पार्श्वभूमी :-
49 व्या इफ्फीत अलिकडच्या काळातल्या सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय चित्रपटांची पर्वणी रसिकांना अनुभवता येणार आहे. रेट्रोस्पेक्टिव्ह, मास्टर क्लास, इन कनर्व्हसेशन सेशन्स, होमेज, इंडियन पॅनोरमा, इंटरनॅशनल कॉम्पिटेशन यासारख्या विशेष विभागात मागच्या काळातले उत्तम जागतिक चित्रपट पाहायला मिळणार आहेत. सृजनशील मनाच्या युवकांना संवाद साधण्यासाठी, अनुभवण्यासाठी आणि शिकण्यासाठी मंच मिळावा हा याचा उद्देश आहे.
वैविध्यपूर्ण विषय हाताळणारे चित्रपट या महोत्सवात सादर होणार आहेत. इफ्फी 2018 मध्ये 68 देशातले 212 चित्रपट दाखवण्यात येणार असून यामध्ये दोन वर्ल्ड प्रिमियर, 16 ॲकॅडमी ॲवार्डसाठी नामनिर्देशित चित्रपट आणि प्रचलित नसलेल्या भारतीय भाषेतल्या सहा चित्रपटांचा यात समावेश आहे. आंतरराष्ट्रीय स्पर्धा विभागात 15 चित्रपटांचा समावेश असून यातले तीन भारतीय चित्रपट सुवर्ण आणि रौप्य मयुरासाठीच्या स्पर्धेत आहेत. या विभागात 22 देशातले निर्मिती आणि सहनिर्मिती केलेले चित्रपट आहेत. पोलिश निर्देशक रॉबर्ट ग्लिन्सकी यांच्या अध्यक्षतेखालच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा ज्युरी मंडळात अॅड्रियन सितारू, अॅना फेरायोलिओ रॅवेल, टॉम फिट्ज पॅट्रिक आणि भारतीय सदस्य राकेश ओमप्रकाश मेहरा यांचा समावेश आहे.
यावर्षी इफ्फीने इंटरनॅशनल कॉन्सिल फॉर फिल्म, ऑडिओ व्हिज्युअल कम्युनिकेशन (आयसीएफटी) पॅरिस बरोबर, विशेष आयसीएफटी पारितोषिक सादर करण्यासाठी समन्वय साधला असून युनेस्कोच्या आदर्शांना प्रोत्साहन देणाऱ्या चित्रपटाला युनेस्को गांधी पारितोषिकाने गौरवण्यात येणार असून याचा आयसीएफटी पारितोषिकात समावेश आहे. यावर्षी या पारितोषिकासाठी 10 चित्रपटांमधून निवड करण्यात येणार असून यामध्ये दोन भारतीय चित्रपटांचा समावेश आहे.
'होमेजेस्' विभागाअंतर्गत हिंदी चित्रपट क्षेत्रातील दिवंगत व्यक्तींना श्रद्धांजली वाहिली जाईल. यावर्षी शशी कपूर, श्रीदेवी, एम. करुणानिधी व चित्रपट निर्मात्या कल्पना लाजमी यांचे चित्रपट दाखवून त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येईल.
49 व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात इंडियन पॅनोरमा 2018 मध्ये फिचर (कथाधारित) आणि नॉन-फीचर (कथाबाह्य) चित्रपट दाखवण्यात येणार आहेत. फीचर फिल्म ज्यूरींनी शाजी एन. करुण दिग्दर्शित चित्रपट 'ओलू' भारतीय पॅनोरामा 2018 विभागाच्या शुभारंभाचा चित्रपट म्हणून निवडला आहे तर कथाबाह्य चित्रपट म्हणून आदित्य सुहास जांभळे यांनी दिग्दर्शित केलेल्या 'खर्वस' या चित्रपटाची निवड करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment