इफ्फी 2017च्या इंडियन पॅनोरमासाठी प्रवेशिका खुल्या
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयांतर्गत असलेल्या चित्रपट महोत्सव संचालनालयाने आज 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी इंडियन पॅनोरमा विभागात प्रवेशिका खुल्या केल्या आहेत. 20-28 नोव्हेंबर 2017 दरम्यान गोव्यात 48 व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्रपट महोत्सव संचालनालयाचे संचालक सेन्थील राजन यांनी आज पणजी येथे आयोजित पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली.
26 फिचर आणि 21 नॉन फिचर फिल्मसचा इंडियन पॅनोरमामध्ये समावेश असणार आहे. केंद्रीय सेन्सॉर बोर्डाने प्रमाणित केलेल्या आणि गेल्या 12 महिन्यांतील चित्रपट यासाठी पात्र आहेत. म्हणजेच चित्रपट 1 सप्टेंर 2016 ते 31 जुलै 2017 या काळातील असावा.
26 फिचर फिल्मसपैकी दोन चित्रपटांची निवड आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या स्पर्धा विभागासाठी केली जाईल. विजेत्या चित्रपटाला 10, 00,000 रुपये आणि चांदीचा मोर असे पारितोषक आहे.
इंडियन पॅनोरमा विभागाच्या अधिक माहितीसाठी आणि नियमांसाठी www.dff.nic.in & www.iffi.nic.in संकेतस्थळाला भेट द्यावी.
No comments:
Post a Comment