Monday, 28 December 2015

State Compansation for the elderly artist

सन 2009 पासूनच्या वयोवृद्ध कलावंताच्या मानधनाचा प्रश्न सुटणार


सन 2009 पासून मानधनासाठी अर्ज केलेल्या सुमारे 3511 वयोवृद्ध कलावंत आणि साहित्यिकांना नागपुरच्या विधिमंडळ अधिवेशनात सहा कोटी 91लाख 45 हजार रुपयांची पुरवणी मागणी मंजूर झाल्याने लवकरच मानधन मिळण्याची शक्यता आहे .

जुलै 2015 च्या विधिमंडळ अधिवेशनात 6.42कोटी रुपयांची पुरवणी मागणीचा प्रस्ताव सांस्कृतिक कार्य खात्याने वित्त विभागाकडे सादर केला होता.परंतु तो प्रस्ताव मान्य झाला नव्हता.त्यामुळे पुन्हा डिसेंबरच्या हिवाळी अधिवेशनात नविन मानधनाचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता.

राज्यातील वयोवृद्ध कलावंत/साहित्यिक अ,ब आणि क या श्रेणीनुसार मानधनाचा लाभ घेत असूनसध्या सुमारे 21 हजार 819 कलावंतांना दर महिन्याला मानधन मिळते.

No comments:

Post a Comment