आता मी
कुंपणाच्या त्या बाजूला आहे - इलियाना डीक्रूज
हर्षदा वेदपाठक
लग्ना केल्याचे
सोशल मिडीयावर जाहीर केल्यानंतर अनेक महिन्यांनी इलियाना डीक्रूज हिची भेट झाली.
निमीत्त होते, रेड हा तिचा आगामी चित्रपट. गप्पांच्या ओघात ती, खूप आनंदात असल्याचे
सांगुन, “ ऍन्ड्रू, माझे काम आणि आयुष्य यात मला आनंदात
ठेवतोय. मी अजूनही माझ्या हानीमुनवर आहे असच सांगेन” हे ती निखळ हास्याने कबुल करते.
करीयर आणि
वैयक्तिक आयुष्याचा समतोल कसा साधतेस?
- त्यासाठी
जबरदस्त इच्छाशक्ती लागते. ते नक्कीच खूप कठीण आहे आणि हा अक्षरशः पर्यायाचा भाग
आहे. तुम्हाला कारकीर्द हवी की वैयक्तिक आयुष्य, हे आपले आपणच ठरवायचे असते. मी हा
समतोल साधत रहाते, नाहीतर मला वेड लागेल. माझे माझ्या कुटुंबावर प्रेम आहे आणि
त्याबरोबर मी माझ्या कामावरही प्रेम करते. बरेच लोक मला सांगतात की, मी काम घालवून
बसेन. थोडेसे काम गेले तरी चालेल. वीस वर्षांनंतर मला काम सोडल्याबद्दल पश्चाताप
वाटून घ्यायचा नाही.
रेड या
चित्रपटातील भूमिका स्विकारण्याचा निर्णय का घेतला?
- अजय देवगणबरोबर
काम करत आहे त्याचे मला समाधान आहे. या चित्रपटात माझी महत्वपुर्ण भुमिका आहे. ही
भूमिका लांबीला काही मोठी नाही. मला माहीत आहे की, अजय सक्षम अभिनेता आहे. रे़डमध्ये तो लोकांना
खरोखरच आवडेल. येथे तुम्हाला अतीरंजकला किंवा उगाचची घातलेली दृष्ये येथे दिसणार
नाहीत. जे काही दिसेल ते वेगळ्या प्रकारे. यापैकी काहीही अतिनाट्यमय नाही. तर सगळे
वास्तववादी आहे.
अजय देवगणबरोबर
काम करताना कम्फर्ट लेवल कशी होती?
- मला
प्रामाणिकपणे वाटते की दुसरा कोणी कलाकार असता, तर मी हा चित्रपट केला नसता. आम्ही
जेंव्हा बादशाहो करत होतो, तेंव्हा मला अजयने या कथेविषयी सांगितले होते. ही खूपच
चांगली कथा आहे. लोकांना एवढ्या सगळ्या दिव्यामधुन जावे लागते, यावर माझा विश्वास नव्हता.
८० च्या दशकात तिचे प्रेम असलेल्या माणसासाठी ती उभी रहाते. ती त्याला बरोबरीचा
मानते आणि तो ते मान्य करतो ते येथे पहायला मिळेल.
रेडमधिल भारतीय
पेहरावाबद्दल काय सांगशील?
- मी स्टायलिस्ट
अमिरा फुनवानीची मदत घेतली. तिला पार्श्वभूमी आणि ऐंशीच्या दशकातील स्टाईल माहीत
होती. ती लखनौचीच आहे. तिने रेखाच्या सिलसिलामधील लुकपासून प्रेरणा घेतली. आणि मला
तोच लुक जो वास्तववादी आणि नैसर्गिक असा दिला.
भुमिकेसाठी काय
अभ्यास केलास? खऱ्या लोकांना भेटलीस का?
- मी भेटले नाही,
पण मला त्या अधिकाऱ्याला भेटायला आवडेल आणि तो अकालनिय शूर होते यावर वाद नाही. तो
नेहमी गणवेशात येत असे. नवरा कुठे आहे किंवा कधी परत येणार याची त्यांच्या
बायकोला काहीच कल्पना नसे आणि ते एका बायकोसाठी किती कठीण आहे हा विचारच मला जिवघेणा
वाटतो.
रेड हा चित्रपट
वास्तववादी असताना ती भुमिका साकरताना तुझी मनस्थिती कश्याप्रकारे होती?
- भुमिकेची मी फारशी
तयारी करत नाही. कधीकधी अतिविचार केल्याने भुमिका साकारताना यांत्रिकपणा येतो. भुमिकेची
तयारी करण्यापुर्वी, माझ्या दिग्दर्शकाला मी खूप प्रश्न विचारते. रेडमधिल भुमिका
साकारताना देखिल मी तसेच केले. तर दिग्दर्शक राजकुमार गुप्ता यांनी, तुम्हाला ज्याप्रकारे
वाटेल तशी भूमिका करा असे सांगीतल्याने, मला त्यात सहजता वाटली. आणि मी
ज्यापद्धतीने मी जे साकारले ते त्याला आवडले.
पती-पत्नीतील
नाते समजून घेणे सोपे होते का?
- माझ्या मते
प्रत्येक नाते हे वेगळे असते. माझे आई आणि वडील खूप वेगळे आहेत . त्यांचे वागणे
पाहुन ते ऐखादया पध्दतीने का वागत आहेत असा मला प्रश्न पडायचा. आणि मला वाटायचे, ते
अश्या पध्दतीने कश्याप्रकारे वागु शकतात. प्रत्येक नाते हे वेगळे असते आणि ते तुम्ही
तुमच्या पद्धतीने हाताळता. मालिनी आणि अमेयच्या नात्याबद्दल बोलायचे तर, ती त्याच्याशी
कशाबद्दलही बोलते आणि ती एक करारी स्री आहे. मला प्रत्येक समीकरण वेगवेगळ्या
प्रकारे हाताळावे लागले. जसे की मुबारकामध्ये मी करणला बदडून काढते. मी माझ्या
सहचराबरोबर असं काही करणार नाही. भुमिकेबद्दल बोलायचे तर, तुम्हाला तुमची भुमिका स्पष्ट करुन सांगणे हे
लेखकाचे काम आहे.
काजोलच्या
भेटीबद्दल काय सांगशील?
- अभिनेत्री
म्हणुन मला काजोल प्रचंड आवडते. तसेच माधुरीसुध्दा मला खुप आवडते. ती जरी ८०च्या दशकातली
नसली तरी मला तिला बघायला प्रचंड आवडायचे. मी अजयची चाहती नाही, मात्र जेंव्हा मी
कुछ कुछ होता है आणि कभी खुशी कभी गम बघते, मला काजोलच्या चेहऱ्यावरील भाव प्रचंड
आवडतात. जेंव्हा मी नायसाला बघते, ती अगदी काजोलसारखी आहे, मिनी काजोलच म्हणायला
हरकत नाही.
लखनौमध्ये
चित्रिकरणाचा अनुभव कसा होता?
- माझी स्टायलिस्ट
हि लखनौची आहे खरी परंतु तिचा बोलण्याचा लहेजा एकदम वेगळा होता. येथे मालिनीबद्दल
म्हणाल तर तिला तसे बोलण्याची गरज नव्हती कारण तिची बदली सतत होत असते. लखनौमध्ये
असताना मी कबाब खाल्लेत आणि खूप खरेदी देखिल केली. मला हॉटेलच्या बाहेर जाणे शक्य
नव्हते. मग मी हॉटेलवर मागवायची. तणाव हा नेहमीच
असतो, मात्र तुम्ही तो कश्याप्रकारे घेता, यावर सगळे अवलंबून असते. तेथे असताना, मी
फारशी काळजी केली नाही आणि चांगले खाल्ले. मला थोडासा आराम मात्र करायचा होता.
तुझ्या भूमिकांची
निवड कशी करतेस?
- अभिनेत्रींसाठी
भुमिका तश्या क्वचीतच लिहील्या जातात. दरम्यान भूमिका बदलत आहेत आणि मला बऱ्याच
महिलाप्रधान भूमिका मिळत आहेत. नायिका कोण असेल ते नायक ठरवतो, पण आता मी
कुंपणाच्या त्या बाजूला आहे.
ब्युटी
सर्जरीबद्दल तुझे मत काय?
- मला काही
करण्यास सांगितले गेले होते, पण मी त्या व्यक्तीला गांभिर्याने घेतले नाही.
तुझ्यासाठी
प्रभावशाली व्यक्तीमत्वाची महीला कोण आहे?
- माझ्यासाठी माझी
आई प्रभावशाली महीला आहे. महीलांच्या सुरक्षेसाठी देशाने काहीतरी करणे गरजेचे आहे
आणि लोकांची मानसिकता बदलणे गरजेचे आहे. त्यांच्यासाठी शिक्षणाची सोय केली पाहीजे,
ज्याने त्यांना ते जे वागत आहेत ते बरोबर नसल्याची जाणीव होईल. सुरक्षा बाळगण्याची
चैन मी करु शकते. सामान्य परिस्थितीत मला मोकळेपणाने रहायला आवडेल, मला असुरक्षित
वाटते. मात्र मी चालायला जाऊ शकत नाही, कारण ते सुरक्षित नाही.
ऍंड्रयूला
तुझ्यातले काय आवडते?
- तो म्हणतो मी विक्षिप्त
आणि विलक्षण आहे. तू अशा गोष्टी करतेस ज्यामुळे मला हजार वेगवेगळ्या प्रकारे आनंद मिळतो.
तो मला खूप सुंदर पत्रे लिहतो. त्याचा मी एक असा गुण सांगू शकत नाही. जेंव्हा पहील्यांदा
तो माझ्याशी फोनवर बोलला, तेंव्हाच आमच्यात काहीतरी नाते आहे, असे मला जाणवले. तो
वचनबद्धता मानणारयांपैकी आहे.
तो खूप छान फोटो
काढतो, पण अडचण ही आहे की, तो फोटोशॉप करत नाही. तो माझे सगळेच फोटो सुंदर काढतो. त्याला
मला साडीत बघायला आवडते, त्याच्या मते मी साडीत खूप सुंदर दिसते. दिवाळीत मी साडी
नेसली होती त्यात त्याला मी खूपच हॉट वाटले.
त्याला भारतीय
जेवणावळीत काय आवडते?
- डाळ आणि भेंडीची
भाजी त्याला खूप आवडते. मांसाहारापेक्षा तो
शाकाहारी राहणे आनंदाने पसंद करतो.
रेडनंतर तु
कोणता चित्रपट करत आहेस?
- मी अजुन काही ठरवलेले
नाही. तो निर्णय घेण्यासाठी मला काही महीने लागतील. सध्या तरीमी छोट्या ब्रेकवर
आहे. मला ऍंड्रयू आणि माझ्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायचा आहे. माझी आई पदवी मिळवत
आहे म्हणून मी अमेरीकेला पण जाणार आहे.
राजकुमार
गुप्ताबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता?
- खूपच चांगला..
तो काम करायला एकदम सहज आणि अगदी स्पष्ट आहे आणि मला त्याचे ते आवडते. तर तो भुमिकेला इतक्या बारकाईने तयार
करतो की, त्याला हे समजते की मालिनी हि काही टीपिकल गृहीणी नाही ते समजुन त्याने
त्यात असाधारणता जोडली आहे.